पावसाळी वातावरणाचा आनंद वाढवण्यासाठी दादरमध्ये भजी महोत्सवाचं आयोजन
एबीपी माझा वेब टीम | 25 Jun 2017 08:44 AM (IST)
मुंबई : सध्या मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसानं दमदार हजेरी लावली आहे. पाऊस, गरमागरम भजी आणि चहा हे सगळ्यांचं अगदी आवडीचं कॉम्बिनेशन. याच पावसाळी चिंब वातावरणाचा आनंद वाढविण्यासाठी मुंबईच्या दादरमध्ये भजी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. दादर सांस्कृतिक मंचानं आयोजित केलेल्या या महोत्सवात खवय्यांना 30 प्रकारचे भजी चाखायला मिळाले. यात शाकाहारीमध्ये बटाटा भजी, कांदा भजी, वांगी भजी, मिरची भजी, पालक भजी, मूगडाळ भजी, केळ्याची भजी, कॉर्न भजी असे असंख्य प्रकार होते. तर मांसाहारी खवय्यांसाठी प्राँन्स भजी, चिकन भजी, बोंबील भजी, मांदेली भजी, पापलेट भजी असे भन्नाट प्रकार होते. या महोत्सवाला दादरकरांनी भरभरुन प्रतिसाद मिळाला. सर्व वयोगटांतील खवय्यांनी महोत्सवाला अफाट प्रतिसाद दिला.