मुंबई : बेस्ट कर्मचारी पुन्हा संपावर जाणार आहेत. वेतन करारासंबंधीच्या वाटाघाटी रखडल्याने 6 ऑगस्टच्या मध्यरात्री बेस्ट कर्मचारी पुन्हा संपावर जाणार आहेत. तसं पत्र बेस्ट वर्कर्स युनियनने बेस्ट प्रशासनाला दिलं आहे.
याआधी जानेवारीमध्ये बेस्टचा ऐतिहासिक 9 दिवसांचा संप झाला होता. ऑगस्टमध्ये जर संप झाला तर 7 महिन्यात दोनदा बेस्ट कर्मचारी संपाची नामुष्की ओढवेल. मध्यंतरी लोकसभा निवडणूक आणि आचारसंहिता यामुळे वेतन करारासंबंधीच्या मागण्या रखडल्या होत्या. ती चर्चा पुन्हा तातडीने सुरु करावी, अशी बेस्ट कर्मचारी युनियनची मागणी आहे.
बेस्ट कर्माचाऱ्यांच्या वेतनापासून अनेक मागण्या प्रलंबित आहेत. वारंवर आंदोलन आणि संप करुनही सरकारकडून दखल घेतली जात नाही, असं या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळेच त्यांनी पुन्हा एकदा संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
बेस्ट कर्मचारी आणि सरकारमध्ये तोडगा न निघाल्यास 7 जानेवारीपासून जवळपास 30 हजार बसेस रस्त्यावर उतरणार नाहीत, असा अंदाज आहे. बेस्ट कर्मचारी आणि सरकारच्या या संघर्षाचा मुंबईकरांना मोठा त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे 7 जानेवारीपर्यंत याबाबत काही तोडगा निघतो का, हे पाहावं लागेल.