मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मुंबईकरांना महागात पडण्याची शक्यता आहे. बेस्ट सध्या आर्थिक संकटात आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी बेस्ट प्रशासनानं 4 रुपये ते 23 रुपयांपर्यंत भाडेवाडीचा प्रस्ताव तयार केला आहे. बेस्ट प्रशासनाने हा प्रस्ताव मुंबई महापालिका आयुक्तांकडे सुपूर्द केला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे.


बेस्टची आर्थिक सुधारणा होण्यासाठी बस तिकीट दरवाढ होणे आवश्यक असल्याचं मुबंई महापालिकेनं सुचवलं होतं. बेस्ट संपावर आणि बेस्टच्या आर्थिक प्रश्नावर उतारा म्हणून बेस्ट भाडेवाडीचा प्रस्ताव आयुक्तांना सुपुर्त करण्यात आला आहे.


बेस्ट प्रशासनाकडून 4 रुपये ते 23 रुपयांपर्यंतची भाडेवाड प्रस्तावित असून 2 किमी ते 45 किमीच्या टप्प्यांवर भाडेवाडीचा प्रस्ताव आहे. या भाडेवाढीमुळे बेस्टचा तोटा कमी होणार असला तरी याचा थेट परिणाम प्रवाशांवर होणाार आहे.


बेस्ट कशी तोट्यात?


- 'बेस्ट'वर सध्या अडीच हजार कोटींच कर्ज आहे.
- महिन्याला सुमारे 200 कोटींची तूट.
- बेस्टला दरवर्षी सुमारे 900 कोटींचा तोटा सहन करावा लागत आहे.
- दरमहिन्याला कर्मचाऱ्यांचे पगार भागवण्यासाठी कर्ज काढावे लागते.
- परिवहन विभागाचं एका दिवसाचं उत्पन्न 3 कोटी तर खर्च 6 कोटी आहे.
- वीजचोरी आणि वीजगळतीमुळे 200 कोटींचा तोटा होतो.
- बेस्टला पर्याय असणाऱ्या जलदगती वाहतूक सुविधांमुळे प्रवासी संख्या घटली
- ओला-उबेरमुळे बेस्टला मोठा फटका बसला.
- मेट्रोमुळेही ट्रॅफीकजाममुक्त प्रवास उपलब्ध झाला. त्यामुळे बेस्टची प्रवासी संख्या घटली.
- मुंबईकर प्रवासी बेस्टऐवजी इतर वाहतूक सेवांकडे आकर्षित झाला.


संबंधित बातम्या

बेस्ट प्रशासनाचं कुठे अडलंय?

बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरूच राहणार, उद्धव ठाकरेंची शिष्टाई अपयशी

बेस्ट संपाविरोधात हायकोर्टात याचिका, उद्या सुनावणी

बेस्टचा संप : तिसऱ्या दिवशीही बस रस्त्यावर नाही, बत्तीही गुल होणार?

बेस्ट संप चिघळला, कर्मचाऱ्यांना मेस्माअंतर्गत नोटीस देण्यास सुरुवात

दुसऱ्या दिवशीही बेस्टचा संप सुरुच

बेस्टचा संप : टॅक्सीचालकांची मुजोरी, एसटी मुंबईकरांच्या मदतीला

मुंबईत बेस्ट कर्मचारी बेमुदत संपावर, बस वाहतूक ठप्प