Bandra Terminus Stampede: वांद्रे टर्मिनसवर रविवारी चेंगराचेंगरी झाली, ज्यानंतर रेल्वे प्रशासन खडबडून जागे झाले आहे, वांद्रे-गोरखपूर एक्सप्रेसच्या दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यामध्ये ऐन सणासुदीच्या काळात अतिरिक्त गर्दी रोखण्यासाठी 8 नोव्हेंबरपर्यंत काही महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावरील फलाट तिकीट (Platform Ticket) विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने (Railway) घेतला आहे. तर यात वृद्ध व्यक्ती आणि वैद्यकीय गरजा असलेल्या व्यक्तींना या निर्बंधातून मुभा देण्यात आली आहे. अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.


रेल्वेचा मोठा निर्णय


सणासुदीच्या काळात गर्दी वाढल्याने तसेच त्यांच्यासह रेल्वेगाडीपर्यंत गेलेल्या इतर व्यक्तींमुळे स्थानकात अतिरिक्त गर्दी होताना दिसते. नातेवाईक किंवा कुटुंबातील व्यक्तींना गावी सोडण्यासाठी अनेकजण फलाट तिकीट काढून रेल्वे गाडीपर्यंत जातात. त्यामुळे रेल्वे स्थानकावरील या गर्दीचे योग्य नियोजन करण्यासाठी तसेच त्यातील सुसूत्रतेसाठी मुंबई विभागीय पश्चिम रेल्वे आणि मध्ये रेल्वेच्या स्थानकात फलाट तिकीट विक्री बंद करण्यात आली आहे.


8 नोव्हेंबरपर्यंत फलाट तिकीट विक्रीवर बंदी


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पुणे, नागपूर, मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे टर्मिनस, बोरिवली, वसई रोड, वापी, वलसाड, बोरिवली, वसई रोड, उधना, सुरत आदी रेल्वे स्थानकात 8 नोव्हेंबरपर्यंत फलाट विक्री बंद ठेवण्यात आली आहे.


कोणत्या स्थानकात फलाट विक्री बंद?


मध्य रेल्वेची स्थानकं - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पुणे, नागपूर


पश्चिम रेल्वेवरील स्थानकं - मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे टर्मिनस, बोरिवली, वसई रोड, वापी, वलसाड, बोरिवली, वसई रोड, उधना, सुरत 


कोणाला असेल मुभा? 


वृद्ध व्यक्ती आणि वैद्यकीय गरजा असलेल्या व्यक्तींना या निर्बंधातून मुभा देण्यात आली आहे.


दिवाळी आणि छट पूजेमुळे प्रवाशांची मोठी संख्या


वांद्रे टर्मिनसवर रविवारी चेंगराचेंगरी झाली. यावेळी वांद्रे ते गोरखपूर या रेल्वेमध्ये चढण्यासाठी प्रवाशांनी मोठी गर्दी केली होती. या रेल्वेतून प्रवास करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रवासी जमले होते. याच गर्दीमध्ये ही चेंगराचेंगरीची घटना घडल्याचं सांगण्यात येतंय. रात्री उशिरा ही दुर्दैवी घटना घडली.  चेंगराचेंगरी झाल्याने एकूण नऊ जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेतील सर्व जखमींवर भाभा रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. दिवाळी आणि छट पूजेमुळे बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. त्यामुळे  याच गर्दीमध्ये चेंगराचेंगरीची घटना घडली. एबीपी माझ्याच्या प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार ही रेल्वे गोरखपूरला जाते. सध्या दिवाळी आणि छटपूजा आहे. त्यामुळे 


 


हेही वाचा>>


Bandra Terminus Stampede: रात्री पावणेतीन वाजता वांद्रे टर्मिनसवर भयावह किंकाळ्यांचा आवाज , प्रत्यक्षदर्शीने सांगितला आँखो देखा थरार