Baba Siddique Resigns From Congress : आधी मिलिंद देवारा, त्यानंतर आता बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला आहे. लोकसभा निवडणुकीआधी (Lok sabha Election) काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात लागोपाठ दोन धक्के बसले आहे. बाबा सिद्दीकी यांनी ट्वीट करत काँग्रेससोबतचा 48 वर्षांचा प्रवास थांबवला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दीकी हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत.  बाबा सिद्दीकी मुंबई काँग्रेसमधील महत्वाच्या नेत्यांपैकी एक होतो. मलिंद देवरा आणि बाबा सिद्दीकी यांच्या जाण्याने मुंबई काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. बाबा सिद्दीकी यांनी मंत्री म्हणूनही काम पाहिलेय. त्याशिवाय इफ्तार पार्टीसाठीही ते फेमस आहेत. पाहूयात बाबा सिद्दीकी कोण आहेत ? त्यांच्याबद्दल माहिती जाणून घेऊयात.. 


काँग्रेसला रामराम ठोकताना बाबा सिद्दीकी यांनी ट्वीटमध्ये काय म्हटले ?


मी तरुणपणात  काँग्रेस पक्षात सामील झालो आणि हा 48 वर्षांचा महत्त्वाचा प्रवास आहे. आज मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तत्काळ  राजीनामा देत आहे. मला व्यक्त व्हायला खूप काही आवडले असते पण ते म्हणतात ना काही गोष्टी न सांगितलेल्या बऱ्या..या प्रवासात सहभागी झालेल्या सर्वांचे मी आभार मानतो.


इफ्तार पार्टीसाठी प्रसिद्ध - 


बाबा जियाउद्दीन सिद्दीकी हे ग्रँड इफ्तार पार्टीसाठी प्रसिद्ध आहेत. ईदच्या निमित्ताने ते मोठ्या पार्टीचं आयोजन करतात. या पार्टीमध्ये राजकीय नेत्यांपासून कलाकार मंडळही हजेरी लावतात. त्यामध्ये सलमान खान आणि शाहरुख खान यासारख्या स्टार कलाकारांचा समावेश असतो. इफ्तार पार्टीच्या निमित्ताने चित्रपटातील आणि टिव्हीवरील सर्व मोठे कलाकार एकाच छताखाली जमतात. बाबा सिद्दीकी यांची इफ्तार पार्टी देशभरात प्रसिद्ध आहेत. इफ्तार पार्टीचं त्यांचं निमंत्रण भलेभले टाळत नाहीत. त्यांच्या निमंत्रणाला मान दिला जातो.


कोण आहेत बाबा सिद्दीकी?


झियाउद्दीन उर्फ बाबा सिद्दीकी हे मुंबई काँग्रेसचे महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक समजले जात होते. तीन वेळा ते आमदार झाले आहेत. त्याशिवाय मंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिलेय. 1999, 2004 आणि 2009 मध्ये ते सलग तीन वेळा वांद्रे पश्चिम मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला. त्यांनी अन्न व नागरी पुरवठा, कामगार राज्यमंत्री आदी खातीदेखील सांभाळली आहेत. बाबा सिद्दीकी हे 1992 आणि 1997 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत नगरसेवक म्हणून विजयी झाले होते. 2000-2004 या कालावधीत काम करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने म्हाडा मुंबई बोर्डाचे अध्यक्ष म्हणून सिद्दीकी यांची नियुक्तीही केली होती.बाबा सिद्दीकी हे मुंबई काँग्रेस आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या समितीवर महत्त्वाच्या पदावर होते.  2014 च्या विधानसभा निवडणुकीत बाबा सिद्दीकी यांचा अशिष शेलार यांनी पराभव केला होता.  


2017 पासून तपास यंत्रणाच्या रडारावर - 


बाबा सिद्दीकी 2017 पासून तपास यंत्रणाच्या रडारावर आहेत. मे 2017 मध्ये एसआरए घोटाळ्याप्रकरणी बाबा सिद्दीकी यांच्या विविध कार्यलय आणि घरी छापेमारी करण्यात आली होती. ईडीने 2018 मध्ये बाबा सिद्दीकी यांची 462 कोटींची संपत्ती जप्त केली होती.


आणखी वाचा :


मोठी बातमी! मुंबई काँग्रेसला धक्का, बाबा सिद्दीकींनी पक्षाला केला रामराम!