मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात मराठीच्या (Marathi) मुद्द्यावरुन वातावरण तापलं असताना आज ठाकरे बंधू एकत्र आले. तत्पूर्वीच, राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या उद्योजक सुशील केडिया यांच्या वरळीतील कार्यालयात मनसैनिकांनी तोडफोड केली. नारळ फेकत मनसेच्या कार्यकर्त्यांनी केडियाच्या कार्यालयाच्या काचा फोडल्या होत्या. आता, मनसेचे नेते अविनाश जाधव (Avinash jadhav) यांनी मनसैनिकांच्या या कृत्याचे समर्थन केले असून केडियाचा किडा मनसैनिकांनी शांत केल्याचं म्हटलं. तसेच, मीरा भाईंदर येथे 8 जुलै रोजी मनसेचा (MNS) मोर्चा निघणार असून मीर भाईंदर येथील म मराठीचाच आहे. यापुढे आमच्या नादाला लागला तर अशाप्रकारे उत्तर दिले जाईल, असेही जाधव यांनी ठणकावून सांगितले.
केडियाला जो काही किडा होतो तो आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी शांत केला आहे. मी खात्रीने सांगू शकतो की, केडियाने जाहीर माफी देखील मागितलेली आहे. राज साहेब ठाकरे यांना मी हिरो मानतो. ज्यांचा ज्यांचा किडा वळवळतोय त्यांनी सुशील केडियासोबत काय झालंय ते पाहावे, असे म्हणत मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी मराठीला विरोध करणाऱ्यांना थेट इशारा दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या यापुढे नादी लागू नका, आमच्या नादाला लागला तर अशाच प्रकारे उत्तर तुम्हाला दिला जाणार, अशी थेट धमकीच त्यांनी दिलीय. ठाण्यामध्ये देखील एक उद्योजक आहेत, उदय परमार असं त्याचं नाव असून ते चांगले मराठी बोलतात. मात्र, केडियासारख्या प्रसिद्धीसाठी काहीही बोलणाऱ्यांची प्रसिद्धी आम्ही नक्कीच उतरवणार, असे अविनाश जाधव यांनी म्हटले. तसेच, येत्या 8 तारखेला जो मीरा भाईंदर येथे आमच्या मनसेचा मोर्चा आहे, तो मोर्चा झाल्यानंतर मीरा भाईंदरमधला 'म' हा मराठीचाच असणार हे नक्की, असेही जाधव यांनी म्हटले.
केडियाचं ऑफिस फोडणाऱ्यांना अटक
मी मुंबईत 30 वर्षांपासून राहोत, पण मी मराठी बोलणार नाही. "मै मराठी नही बोलूगा" अशी भूमिका घेणाऱ्या सुशील केडियाचं कार्यालय फोडल्याप्रकरणी पाच मनसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता, या मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सुशील केडियाच्या वरळी येथील कार्यालयावर मनसैनिकांनी नारळ फेकत तोडफोडीचं आंदोलन केलं होतं. या आंदोलनातून दंगल माजवल्याप्रकरणी वरळी पोलिसांची कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर, 5 आंदोलकांना अटक केली.
हेही वाचा
ठाकरे बंधू एकत्र आले, मुंबईत संख्याबळ किती? शिवसेना-मनसेच्या नगरसेवकांच राजकीय गणित