मुंबई : माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजयेपी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभेचं मुंबईत आयोजन करण्यात आलं होतं. या शोकसभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारांना साजेसं योग्य स्मारक मुंबईत उभारण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.


अटलबिहारी वाजपेयी यांचे विचार अमर आहेत. त्यांनी दिलेल्या देशसेवेच्या, देशप्रेमाच्या मार्गाने चालणे ही त्यांना खरी श्रद्धांजली असेल, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनातीन अनेक महत्त्वाचे किस्से यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना सांगितले.


अटलजींच्या अस्थींची कलश यात्रा
अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थींची कलश यात्रा देशातील सर्व राज्यात काढण्याचा निर्णय भाजपनं घेतला आहे. भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी आज भाजपच्या सर्व प्रदेशाध्यक्षांकडे अस्थी कलश सोपवला आहे. दिल्लीच्या भाजप कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह उपस्थित होते.


विविध राज्यातील भाजप प्रदेशाध्यक्ष वाजपेयींचे अस्थी कलश घेऊन जातील. त्यानंतर राज्यातील तालुक्यात अटल कलश यात्रा आणि शोक सभेचं आयोजन केलं जाणार आहे.अस्थींना वेगवेगळ्या नद्यांमध्ये प्रवाहित केलं जाईल.


अटलबिहारी वाजयेपी यांचं 16 ऑगस्टला निधन झालं होतं. 17 ऑगस्टला अटलजींवर दिल्लीतील राष्ट्रीय स्मृती स्थळावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते.