मुंबई : अँटिलिया स्फोटकं आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एनआयएने कोर्टात सुमारे 10,000 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात एनआयएने धक्कादायक खुलासे केले आहेत. सुमारे 158 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. त्या साक्षीदारांच्या निवेदनात अशी काही विधाने आहेत, ज्यात धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. या खुलाशांमुळे सचिन वाझे याच्या जीवनातील दडलेले पैलू जगासमोर आले आहेत. सचिन वाझेच्या गुप्त आणि कथित मैत्रिणीचेही यामध्ये एक महत्त्वाचे विधान आहे, जी कधीकाळी व्यवसायाने एस्कॉर्ट सेवेशी संबंधित होती.


एस्कॉर्ट गर्लकडे एक दशकापासून वाझेचं गुपित
सचिन वाझे 2011 मध्ये एस्कॉर्ट सेवेच्या नावाखाली या मुलीला भेटले होते. महिलेसोबतच्या पहिल्या भेटीत सचिन वाझे याने स्वतःबद्दल चुकीची माहिती दिली होती. त्याने त्याचे चुकीचे नाव दिले होते आणि स्वतःला एक व्यापारी म्हणून सांगितले होते. पण, सचिन वाझेला ही एस्कॉर्ट मुलगी इतकी आवडली की त्याने या एस्कॉर्ट मुलीला पुन्हा पुन्हा भेटायला सुरुवात केली. सचिन वाझे या एस्कॉर्ट गर्लसोबत अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते.


दोन-तीन बैठकांनंतर त्यांनी स्वतःबद्दल सांगितले की ते मुंबई पोलिसांचे अधिकारी होते आणि आता ते व्यवसाय करतात. सचिन वाझे यांनी असेही सांगितले की ते मूळचे महाराष्ट्रातील कोल्हापूरचे आहेत आणि मुंबईजवळ ठाणे शहरात पत्नी आणि मुलीसोबत राहतात. एस्कॉर्ट मुलीने सांगितले की ती सचिनच्या ठाणे शहर कार्यालयातही अनेक वेळा गेली आहे. अगदी सचिनने तिला ठाण्याच्या पासपोर्ट कार्यालयात पासपोर्टसाठी अर्ज करण्यास मदत केली होती.


एस्कॉर्ट गर्लला बिझनेस वुमेन करायचं होतं
सचिन वाझे यांनी काही कंपन्या स्थापन करण्यासाठी या मैत्रिणीला मदत केली होती. दोघांच्या संयुक्तपणे चालणाऱ्या लॉकरमध्ये एनआयएला मोठ्या प्रमाणात रोकड सापडली आहे. यासोबत वाझे यांनी त्यांच्यासाठी स्थापन केलेल्या कंपन्यांमध्ये 1.5 कोटी रुपयांचे व्यवहार देखील मिळून आले आहे. सचिन वाझे यांची मैत्रिण आणि व्यवसायाने एस्कॉर्ट मुलीने एनआयएला सांगितले की सचिन वाझे यांना तिला बिझनेस वुमन बनवायचे होते, त्यासाठी त्यांनी दोन कंपन्याही सुरू केल्या. त्या कंपन्यांची नावे मयंक ऑटोमेशन आणि मयंक टूर्स अँड ट्रॅव्हल्स आहेत.


अँटिलिया आणि मनसूख हिरेन प्रकरणात सचिन वाझेने वसुली केलेल्या पैशांचा वापर: NIA 


2016 मध्ये सचिनने या कंपन्यांची नोंदणी करण्यास सांगितले होते. 2017 मध्ये, सचिन वाझे यांच्या सांगण्यावरून, एस्कॉर्ट गर्ल मोटो सर्जन ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीत संचालक बनली. मोटोसर्जन ऑटोमोबाईल कंपनी ही एक दुचाकी कामाचे दुकान होते, ज्याची चैन करण्याची योजना होती. महिलेने सांगितले की तिने तिच्या कमावलेले 17 लाख रुपये देखील या कंपनीत गुंतवले आहेत. परंतु, ही कंपनी कधीही चांगले काम करू शकली नाही.


सचिन मासिक खर्च देत असे
सचिनच्या मैत्रीणीने सांगितले की, पोलीस दलात परतल्यानंतर सचिन वाझे तिला ऑगस्ट 2020 पासून दरमहा 50 हजार रुपये देत असे. त्यानंतर तिने एस्कॉर्ट सेवेची नोकरी सोडली. महिलेने सांगितले की ते दक्षिण मुंबईतील एका हॉटेलमध्ये भेटत असे, जिथे तो तिला पैसे देत असे. व्यवसायासाठी ती बचत खात्यात किंवा ऑटोमेशन कंपनीच्या खात्यावर पैसे पाठवत असे.


सचिन आणि त्याची कथित मैत्रीण हे खाते चालवायचे
सचिनच्या महिला मैत्रीणीने सांगितले की तिचे आणि सचिनचे कोणतेही संयुक्त खाते नाही. पण, ते दोघेही मुंबईच्या वर्सोवा शाखेच्या DCB बँकेत संयुक्तपणे खाते चालवत होते. महिला मैत्रिणीने सांगितले की सचिनच्या अटकेच्या दुसऱ्या दिवशी तिने बँक खात्यातून 5 लाख काढून भावाकडे दिले होते. जर तिलाही यात अटक झाली तर या चांगला वकील नेमून जामीन मिळवण्यासाठी हे पैसे वापरण्यास सांगितले होते.