एक्स्प्लोर

Vasai Crime News: रागात बोलल्यानं संतापला; 15 वर्षाच्या मुलानं मित्राच्या मदतीने आत्याला संपवलं, वसईतील 60 वर्षीय महिलेच्या मृत्यूचं गूढ अवघ्या काही तासात उलगडलं

Vasai Crime News: माणिकपूर पोलिसांनी सध्या दोघांना ताब्यात घेतलं असून, त्यांच्याकडून हत्येच्या कारणांची माहिती घेत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरिलाल जाधव यांनी दिली आहे.

वसई : वसईत एका ६० वर्षांच्या महिलेची रहात्या घरात हत्या करण्यात आली होती. ही घटना सोमवारी मध्यराञी १२ च्या दरम्यान उघड झाली होती. माणिकपूर पोलिसांनी अवघ्या 2 तासात या घटनेचा छडा  (Vasai Crime News) लावून, दोन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. हे दोघे अल्पवयीन असल्याची माहिती आहे. माञ मुख्य आरोपी हा मयताच्या भावाचा  (Vasai Crime News) मुलगा आहे आणि तो घराच्या जवळच राहतो. तो अवघा 15 वर्षाचा असल्याची माहिती समोर आली आहे, त्याच्यासोबत असणारा त्याचा मिञ हा अवघा 16 वर्षाचा आहे.  माणिकपूर पोलिसांनी सध्या दोघांना ताब्यात घेतलं असून, त्यांच्याकडून हत्येच्या कारणांची माहिती घेत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरिलाल जाधव यांनी दिली आहे. (Vasai Crime News)

वसईच्या बऱ्हाणपूर उमेळमान गावात, भिमाई या बंगल्यात दुर्गा संजय बनसोडे ही ६० वर्षीय महिलेची हत्या करण्यात आली होती. ही महिला घरात एकटी रहात होती. तिचा मुलगा वालीव  (Vasai Crime News) येथे रहात होता. सोमवारी सकाळपासून दुर्गा या फोन उचलत नसल्याने मुलाने रात्री येवून, बघितल्यावर हॅालच्या आत रक्ताचे डाग दिसले, त्यामुळे पोलिसांना बोलावण्यात आले. त्यानंतर ही घटना उजेडात आली. मृतदेह बेडरूम मध्ये होता आणि बेड वरील गादी काढून बेड उघडण्यात आलं होतं. तसेच बेडरूमच्या दरवाजाला बाहेरून स्क्रूड्रायव्हर लावण्यात आलं होतं. प्राथमिक माहितीनुसार मयत आत्या काहीतरी कारणावरुन ओरडल्याने त्याच्या मनात आत्येविषयी राग होता, आणि रागातून ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.(Vasai Crime News)

तर वसईतील नगरसेविका प्रमिला पाटील यांनी माहिती देताना सांगितलं की, माझ्या गावातील गंगाविहीर परिसरात एक भीमाई निवास आहे, त्या भीमाई निवासमध्ये दुर्गा संजय बनसोडे ही ६० वर्षीय महिला राहत होती, रात्री त्या महिलेचा खून झाला असं समजलं, त्यानंतर पोलिस आले, पोलिसांनी मृतदेह पंचनाम्यासाठी नेला आहे, आणि पोलिस पुढचा तपास करत आहेत. ती महिला एकटीच राहत होती, अद्याप संपूर्ण माहिती मिळालेली नाही, मात्र पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतली असल्याची माहिती आहे. माझं पोलिसांशी बोलणं झालं पोलिस म्हणाले, आम्ही तिघांना ताब्यात घेतलं आहे. पुढचा तपास सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. 

नेमकं काय प्रकरण?

अज्ञात व्यक्तीने घरात घुसून दुर्गा नामक महिलेची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. माहितीनुसार, सोमवारी सकाळपासून दुर्गा या फोन उचलत नव्हत्या. त्यामुळे संशय आल्याने त्यांचा मुलगा रात्री घरी आला. घरात प्रवेश केल्यानंतर हॉलमध्ये रक्ताचे डाग आढळून आले. त्यानंतर तत्काळ पोलिसांना (Vasai Crime News) माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असता ही घटना उघडकीस आली. मृतदेह बेडरूममध्ये आढळून आला. बेडवरील गादी काढून बेड उघडलेला होता. तसेच बेडरूमच्या दरवाजाला बाहेरून स्क्रूड्रायव्हर लावण्यात आल्याचेही निदर्शनास आले आहे. यावरून गुन्हा नियोजनपूर्वक केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. घरातून काही चोरी झाली आहे का, याबाबत कुटुंबीयांकडून पडताळणी सुरू असून त्यानंतरच अधिक माहिती स्पष्ट होणार आहे. पुढील तपास सुरू आहे.(Vasai Crime News)

प्रकरण कसं आलं समोर

सोमवारी सकाळपासून दुर्गा या फोन उचलत नव्हत्या. त्यामुळे संशय आल्याने त्यांचा मुलगा रात्री घरी आला. घरात प्रवेश केल्यानंतर हॉलमध्ये रक्ताचे डाग आढळून आले. त्यानंतर तत्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असता ही घटना उघडकीस आली. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Asiatic Society Election : मुंबईतील ऐतिहासिक 'दि एशियाटिक सोसायटी'च्या बहुचर्चित निवडणुकीला धर्मादाय आयुक्तांकडून स्थगिती; नेमकं कारण काय?
मुंबईतील ऐतिहासिक 'दि एशियाटिक सोसायटी'च्या बहुचर्चित निवडणुकीला धर्मादाय आयुक्तांकडून स्थगिती; नेमकं कारण काय?
Maharashtra Live Blog Updates: धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या अर्चना पाटलांचा विजय 
Maharashtra Live Blog Updates: धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या अर्चना पाटलांचा विजय 
Maharashtra Goverment On LPG Cylinder Shortage: सिलिंडर नेणाऱ्या वाहनांना पोलिसांनी सुरक्षा द्यावी, कंट्रोल रुम बनवा...; राज्य सरकारच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना
सिलिंडर नेणाऱ्या वाहनांना पोलिसांनी सुरक्षा द्यावी, कंट्रोल रुम बनवा...; राज्य सरकारच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना
Stuti Sonawane Death Case Mumbai: अलिबागची ट्रिप, आंबट कँडी आणि छोटा बाथटब...; आयुष्य संपवण्याआधी मुंबईकर स्तुती काय काय म्हणाली?
अलिबागची ट्रिप, आंबट कँडी आणि छोटा बाथटब...; आयुष्य संपवण्याआधी मुंबईकर स्तुती काय काय म्हणाली?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report
Pune Drugs : पुण्यात ड्रग्जची टपरी, कासेवाडी परिसरात अवैध धंदे Special Report
Russia Oil : इराणवर हल्ले, रशियाचं बल्ले बल्ले, चढ्या दरानं तेल घ्यावं लागणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live Update: इराणनं भारतासकट जगाला गॅसवर आणलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत काय घडणार? अमेरिकेतून 2200 मरीन सैनिक, 3 युद्धनौका फायटर जेटच्या साथीनं आखाती देशाकडे रवाना!
इराणनं भारतासकट जगाला गॅसवर आणलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत काय घडणार? अमेरिकेतून 2200 मरीन सैनिक, 3 युद्धनौका फायटर जेटच्या साथीनं आखाती देशाकडे रवाना!
इराणी क्षेपणास्त्रांचा सौदीतील अमेरिकन तळावर मोठा हल्ला; हवेत इंधन भरणाऱ्या पाच टँकर विमानांची दाणादाण! हजारो कोटींच्या मालमत्तेची राखरांगोळी; काल इराकमध्येही तेच विमान जमीनदोस्त
इराणी क्षेपणास्त्रांचा सौदीतील अमेरिकन तळावर मोठा हल्ला; हवेत इंधन भरणाऱ्या पाच टँकर विमानांची दाणादाण! हजारो कोटींच्या मालमत्तेची राखरांगोळी; काल इराकमध्येही तेच विमान जमीनदोस्त
Asiatic Society Election : मुंबईतील ऐतिहासिक 'दि एशियाटिक सोसायटी'च्या बहुचर्चित निवडणुकीला धर्मादाय आयुक्तांकडून स्थगिती; नेमकं कारण काय?
मुंबईतील ऐतिहासिक 'दि एशियाटिक सोसायटी'च्या बहुचर्चित निवडणुकीला धर्मादाय आयुक्तांकडून स्थगिती; नेमकं कारण काय?
Blessing Muzarabani News : परदेशी खेळाडूचा PSL लाथ मारत IPL खेळण्याचा निर्णय; पाकिस्तानच्या तळपायाची आग मस्तकात गेली, पीसीबी करणार बॅन
परदेशी खेळाडूचा PSL लाथ मारत IPL खेळण्याचा निर्णय; पाकिस्तानच्या तळपायाची आग मस्तकात गेली, पीसीबी करणार बॅन
Virar Crime News: मोठी बातमी: विरारच्या सायंटिफिक लॅबवर आरोग्य विभागाचा छापा, अवैध स्पर्म बँकेचा भांडाफोड, नेमकं काय घडलं?
विरारच्या सायंटिफिक लॅबवर आरोग्य विभागाचा छापा, अवैध स्पर्म बँकेचा भांडाफोड, नेमकं काय घडलं?
Star Pravah Actress Entry In Zee Marathi Sanai Choughade Serial: 'आईची भूमिका करायला माझी मुळात तयारी नव्हती पण...'; स्टार प्रवाहवरची अभिनेत्री झळकणार झी मराठीवरच्या नव्या मालिकेत
'आईची भूमिका करायला माझी मुळात तयारी नव्हती पण...'; स्टार प्रवाहवरची अभिनेत्री झळकणार झी मराठीवरच्या नव्या मालिकेत
Aishwarya Narkar Slams Troll: 'निदान कॅमेरासमोर तरी पूर्ण कपडे घालून योगा करत जा मॅडम...'; युजरची कमेंट पाहून ऐश्वर्या नारकर भडकल्या, सडेतोड उत्तर देत म्हणाल्या...
'निदान कॅमेरासमोर तरी पूर्ण कपडे घालून योगा करत जा मॅडम...'; युजरची कमेंट पाहून ऐश्वर्या नारकर भडकल्या, सडेतोड उत्तर देत म्हणाल्या...
Beed Crime: जयराम चाटे तुरुंगातून बाहेर पडण्यापूर्वी गँगचा राडा , बीडमध्ये तरुणावर लोखंडी रॉड, कत्तीने हल्ला
जयराम चाटे तुरुंगातून बाहेर पडण्यापूर्वी गँगचा राडा , बीडमध्ये तरुणावर लोखंडी रॉड, कत्तीने हल्ला
Embed widget