मुंबई : मुंबई मेट्रोचा विस्तार करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. अंधेरी-दहिसर मेट्रो मार्ग मीरा-भाईंदरपर्यंत वाढवण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितंल.
कुलाबा – सीप्झ मार्गावरील मेट्रो विमानतळापर्यंत वाढवण्यात येणार आहे. यासाठी 23 हजार 136 कोटींचं कर्ज ‘जायका’ कंपनी देणार आहे. 2020 सालापर्यंत या मार्गावरील मेट्रो धावणार आहे.
अंधेरी- दहिसर मेट्रो मीरा-भाईंदरपर्यंत वाढवण्यात येणार आहे. या मेट्रोला ‘मेट्रो 9’ या नावाने ओळखले जाईल. या 13 किलोमीटरच्या मार्गावर 10 मेट्रो स्थानकं असतील. यासाठी एकूण 6 हजार 518 कोटींचा खर्च येणार आहे.
येत्या काही काळात मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे मीरा-भाईंदर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना खुश करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केल्याचं बोललं जात आहे.
Exit Poll 2024
(Source: Poll of Polls)
मुंबई मेट्रोचा मीरा-भाईंदरपर्यंत विस्तार होणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Mar 2017 08:03 PM (IST)
प्रातिनिधिक फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -