मुंबई : महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर आता आंबेडकर बंधूही एकत्र येणार का अशी चर्चा सुरू आहे. त्यावर आनंदराज आंबेडकरांनी मोठं वक्तव्य केलं. आंबेडकरी चळवळ वाढवण्यासाठी भविष्यात आम्ही एकत्र येऊ असं मोठं वक्तव्य आनंदराज आंबेडकर म्हणाले. आनंदराज आंबेडकर सध्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत आहेत.
आम्ही शिंदेंकडे मागितलेल्या महत्त्वाच्या जागा या आम्हाला मिळाल्या नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. पण युतीचा धर्म पाळत आम्ही प्रयत्न करू असं आनंदराज आंबेडकर म्हणाले.
Prakash Ambedkar Anandraj Ambedkar : दोन भाऊ एकत्र येणार का?
आंबेडकरी चळवळीला गतीमान करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत असं आनंदराज आंबेडकर म्हणाले. ते म्हणाले की, प्रत्येक गोष्टीला एक काळ असतो, जसे ते दोन भाऊ एकत्र आलेत भविष्यात आम्हीही येऊ. दोघंही आंबेडकर विचार वाढवण्याचा प्रयत्न करतोय. आंबेडकर चळवळ वाढवायची झाल्यास आपली माणसं तिथे बसायला हवीत. आम्हा दोघांमध्येही तात्विक मतभेद आहेत. प्रयत्न झाला तर माझा नक्कीच प्रतिसाद असेल असं मत आनंदराज आंबेडकर यांनी व्यक्त केलं.
महायुतीत आयत्यावेळी अनेकांनी युती तोडली. युतीचा धर्म कोणीच पाळला नाही. परिस्थिती गंभीर आहे. आम्ही म्हणू तेच अशी मोठ्या पक्षांची भूमिका आहे. आयत्या वेळी कोण कुणाला मदत करतोय हे समजेल. या गोष्टीचा परिणाम निवडणुकीवर होऊ शकतो असं मत आनंदराज आंबेडकरांनी व्यक्त केलं.
आंबेडकरी चळवळ एकत्र यावी हा आमचा प्रयत्न आहे. मात्र सत्तेत बसून नुसत्या या गोष्टी करून चालणार नाही असा टोला आनंदराज आंबेडकरांनी रामदास आठवलेंना लगावला.
BMC Election : ठाकरे बंधूंचा कितपत परिणाम?
दोन्ही बंधू एकत्र आल्यानंतर मुंबईत फार काही चमत्कार होणार नाही असं आनंदराज आंबेडकर म्हणाले. मुंबईत यांची 25 वर्षे सत्ता असताना मराठी माणूस हद्दपार झाला. याचा परिणाम अंधभक्तावर होईल, सर्वच मराठी माणसांवर होणार नाही. धर्माच्या जातीच्या नावावर नागरिकांची विभागणी करून प्रश्न सुटणार नाही. योग्य माणूस महापौरपदी बसवावा हे कुणीच म्हणत नाही असं ते म्हणाले.
Mumbai Election : युतीत समाधानी नाही
शिंदेंच्या शिवसेनेसोबत युती झाल्यानंतर वाट्याला आलेल्या जागांवरुन आपण समाधानी नसल्याचं आनंदराज आंबेडकर म्हणाले. आम्हाला ज्या जागा हव्या होत्या त्या जागा मिळाल्या नाहीत. आता जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू असं ते म्हणाले.
ही बातमी वाचा: