Continues below advertisement

मुंबई : भाजप हा कुणाच्या कुबड्या घेऊन चालणारा पक्ष नाही, स्वबळावर चालतो असं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी (Amit Shah) केलं. मुंबई महापालिका निवडणुकीच्या (BMC Election) पार्श्वभूमीवर अमित शाहांनी केलेल्या या वक्तव्यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत. तर महाराष्ट्रात भाजप दोन कुबड्यांवर उभा आहे अशी टीका खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली. त्यावर कुबड्या या शब्दाचा अर्थ वेगळा लावू नये, मित्र हे कुबड्या नसतात असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.

केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते मुंबईमध्ये भाजपच्या प्रदेश कार्यालयाचे भूमिपूजन पार पडले. त्यावेळी अमित शाहांनी कार्यकर्त्यांना संबोधित करत महापालिका निवडणुकीसाठी तयार राहण्याचे आदेश दिले. तसेच भाजप आता कुणाच्या कुबड्या घेऊन चालणारा पक्ष नाही, भाजप हा स्वबळावर चालणारा पक्ष आहे असं त्यांनी ठामपणे सांगितलं.

Continues below advertisement

खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कुबड्यावरुन केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं. भाजप देशात अनेक ठिकाणी कुबड्यावर सत्तेत आहे. महाराष्ट्रातही दोन कुबड्या आहेत असा टोला राऊतांनी अमित शाहांना लगावला.

Amit Shah Mumbai Speech : विरोधकांचा सुपडासाफ करा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी मुंबईत एकप्रकारे पालिका निवडणुकांच्या प्रचाराचं रणशिंग फुंकलं आहे. आता डबल इंजिन सरकार नको तर ट्रिपल इंजिन सरकार हवंय, असं वक्तव्य अमित शाहांनी केलं. मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयाच्या भूमिपूजन सोहोळ्याला शाह उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांनी असे लढावे की, विरोधकांचा सुपडासाफ झाला पाहिजे, दुर्बिण लावूनही विरोधक सापडता कामा नयेत, अशी घोषणाही शाहांनी केली.

अमित पुढे म्हणाले की, इमारत पाहून मी अभिनंदन करतो. 55 हजार चौरस फुटाचे हे कार्यालय आहे. लायब्ररी, कॉन्फरन्स रूम, प्रदेशाध्यक्षांसोबत इथे मुख्यमंत्र्यांचे देखील कार्यालय आहे. हे कार्यालय मुख्यमंत्र्यांना आठवण करून देईल की येथूनच निवडून जायचे आहे. मला आनंद आहे की, महाराष्ट्र भाजपने आपल्या परंपरा लक्षात ठेवल्या आहेत. जनसंघानंतर भाजप निर्माण झाले, तेव्हा अटलजी बोलले होते की कमल खिलेगा. तेव्हा पहिले पंतप्रधान अटलजी झाले. त्यानंतर 11 वर्षे मोदी जी पंतप्रधान आहेत. देशाचे पंतप्रधान हे भाजपचे नेते झाले ही आपल्यासाठी गौरवाची बाब आहे, असे देखील त्यांनी म्हटले.

Amit Shah On Election : आमचा पक्ष घराणेशाहीनुसार चालत नाही

ज्या नेत्यांनी कठीण परिस्थितीत पक्ष मजबूत केला, पक्षाच्या विचारांचे बीज लावून त्याचे वटवृक्ष केले, त्या सगळ्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना मी प्रणाम करतो. मला देखील अध्यक्ष होता आले. भारतात एकमेव भाजप हा पक्ष आहे, जिथे बुथ प्रमुख हा पक्षाचा, देशाचा अध्यक्ष होऊ शकतो. आमचा पक्ष घराणेशाहीनुसार चालत नाही. ज्याच्यात क्षमता आहे तोच या ठिकाणी मोठा नेता होता. आम्ही हे सिद्ध केले की, घराणेशाही या देशात चालणार नाही. तुम्हाला परफॉर्मन्स दाखवावाच लागेल, असे देखील अमित शाह म्हणाले.

ही बातमी वाचा: