मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात हवाई उड्डाण मंत्रालयाच्या एएआयबी तपास यंत्रणेचा 22 पानांचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. त्यामध्ये कमी दृश्यमानता (Visibility), VFR नियमांचे संभाव्य उल्लंघन आणि अनकंट्रोल्ड एअरफिल्डवरील सुरक्षा त्रुटी याकडे गंभीर बोट ठेवण्यात आले आहे. 28 जानेवारी रोजी झालेल्या या अपघातात अजित पवारांसह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला होता. 

Continues below advertisement

अपघात कसा घडला? (Baramati Plane Crash Details)

मुंबईहून बारामतीकडे निघालेल्या नॉन-शेड्युल्ड/VIP फ्लाइटने रनवे 11 वर लँडिंगचा प्रयत्न केला. पहिल्या प्रयत्नात ‘Go-Around’ करण्यात आला. दुसऱ्या प्रयत्नात पायलटने “Field in sight” कळवले. मात्र ATC ने 3 किमी दृश्यमानता नोंदवली, जी VFR (Visual Flight Rules) अंतर्गत आवश्यक 5 किमीपेक्षा कमी होती. लँडिंग क्लिअरन्सनंतर काही क्षणांत विमान रनवेच्या डावीकडे सुमारे 50 मीटर अंतरावर झाडांवर आदळले आणि त्यानंतर आग लागून पूर्णतः नष्ट झाले असं या अहवालात म्हटलं आहे. 

प्राथमिक निष्कर्ष काय सांगतात? (Preliminary Report Highlights)

  • Visibility VFR मर्यादेपेक्षा कमी असूनही लँडिंगचा प्रयत्न.
  • VIP/Non-Scheduled फ्लाइटसाठी अनकंट्रोल्ड एअरफिल्डवरील ऑपरेशन.
  • हवामान आणि मूलभूत नेव्हिगेशन सहाय्यांमध्ये कमतरता.
  • एअरफिल्ड सुविधांचे अपुरे मानक.

हवामान आणि तांत्रिक बाबी (Weather & Technical Findings)

  • बारामती येथे अधिकृत MET सुविधा नाही.
  • उपग्रह चित्रांनुसार परिसरात हलके धुके (Shallow Fog).
  • पुणेमुंबईतही 2000–2500 मीटर visibility नोंदली गेली.

बारामती विमानतळातील सुरक्षा त्रुटी (Airport Safety Lapses)

  • रन वेवरील मार्किंग सहज दिसू शकतील असे नाही
  • रन वेवर बारीक खडी (Loose Gravels) आढळली
  • रन वेला परिपूर्ण कुंपण (Boundary Wall) नाही
  • विमानतळावर अग्निशमन (ARFF) सुविधा नाही
  • फक्त VFR ऑपरेशन्सला परवानगी
  • अनकंट्रोल्ड एअरफिल्ड, नियमित ATC सुविधा नाही.

Continues below advertisement

ब्लॅक बॉक्स (Flight Recorders)

  • FDR (Flight Data Recorder) डेटा यशस्वीरित्या डाउनलोड
  • CVR (Cockpit Voice Recorder) थर्मल डॅमेज; डेटा पुनर्प्राप्तीसाठी NTSB (USA) मदत
  • तपास अद्याप सुरू

पायलट अनुभव आणि वैद्यकीय तपासणी (Pilot Profile)

या विमानाच्या कॅप्टनला (61 वर्षे) सुमारे 18,855 तासांचा एकूण उड्डाण अनुभव होता. Learjet वर ~2,815 तास. फर्स्ट ऑफिसर (25 वर्षे) यांना ~2,490 तासांचा अनुभव. दोघांनाही बारामती व अनकंट्रोल्ड एअरफिल्डचा अनुभव होता. Breath Analyzer टेस्ट निगेटिव्ह आली असून मृत्यूचे कारण “Multiple injuries with burn injuries” असे नमूद.

सुरक्षा शिफारसी (Safety Recommendations)

  • DGCA कडून VFR ऑपरेशन्सवर कडक अंमलबजावणी.
  • अनकंट्रोल्ड एअरफिल्डवर हवामान सुविधा व लँडिंग सहाय्य वाढवणे.
  • नियमित ऑडिट व लायसेंसिंग निकष कठोर करणे.
  • VIP/Non-Scheduled फ्लाइटसाठी सुरक्षा मानके बळकट करणे.

FDR विश्लेषण सुरू असून CVR डेटा रिकव्हरीनंतर अंतिम अहवाल जाहीर होणार आहे. या अहवालातील निष्कर्षांनंतर विमान सुरक्षा नियमांमध्ये सुधारणा आणि अनकंट्रोल्ड विमानतळांवरील ऑपरेशन्ससाठी नव्या मार्गदर्शक तत्त्वांची अपेक्षा आहे.