मुंबई : मालाडमधील एका सोसायटीत चोरट्याने ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावल्याची घटना समोर आली आहे. चोरीचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.


सोसायटीमधील घरात जाताना एका वृद्ध महिला लिफ्टच्या जवळ गेली असता चोरट्याने महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली आणि पळ काढला.


आजपर्यंत सोनसाखळी हिसकावण्याचे प्रकार रस्त्यांवर  घडत होते. मात्र या प्रकारामुळे  सोसायट्यांच्या आवारातही महिला सुरक्षित नसल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली असून पोलीस सध्या सोनसाखळी चोराचा शोध घेत आहेत.