ED Inquiry : ईडीच्या (ED) अधिकाऱ्यांची मुंबईत (Mumbai) तीन ठिकाणी झाडाझडती सुरू आहे. यात 2 ठिकाणी पत्राचाळ प्रकरणी (Patra Chawl Scam) म्हणजेच, संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या प्रकरणात छापे टाकण्यात आले आहेत. तर नॅशनल हेराल्डप्रकरणी दिल्लीप्रमाणे मुंबईतही हेराल्ड हाऊसवर छापे टाकण्यात आले आहेत.
पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. अशातच संजय राऊत यांची आज ईडी कोठडीत चौकशी होणार आहे. संजय राऊत यांची वकिलांच्या उपस्थितीत चौकशी होणार आहे. राऊत यांचे वकील सकाळी 8.30 ते 9.30 वाजता कोठडीत भेट घेतली. राऊत चौकशीत सहकार्य करत नसल्याचा आरोप ईडीनं केला होता. या पार्श्वभूमीवर आजच्या चौकशीत काय समोर येणार याची उत्सुकता सर्वांना होतीच. अशातच संजय राऊतांची ईडी चौकशी पूर्ण झाल्यानंतर ईडीनं पत्राचाळ घोटाळा प्रकरणी मुंबईतील आणखी दोन ठिकाणी छापेमारी केली आहे.
नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीकडून छापेमारी
अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाने दिल्ली आणि इतर ठिकाणाच्या नॅशनल हेराल्डच्या (National Herald Case) कार्यालयावर छापा टाकला आहे. ईडीचे (ED) अधिकारी नॅशनल हेराल्डच्या कार्यालयात उपस्थित असून शोध मोहीम सुरु आहे. या प्रकरणी यापूर्वी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचीही चौकशी करण्यात आली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात हे छापे टाकण्यात आले आहेत.
संजय राऊत यांच्यावरील कारवाईचे राज्यसभेत पडसाद
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावरील ईडी कारवाईचे जोरदार पडसाद आज राज्यसभेत उमटले. आज राज्यसभेचं कामकाज सुरु होताच विरोधकांनी हा मुद्दा उपस्थित केला. त्यावरून गदारोळ झाल्यानं कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं. खासदार संजय राऊत यांच्यावर झालेल्या कारवाईचा विरोधकांनी निषेध केला. दरम्यान, पत्राचाळ घोटाळा प्रकरणी राऊत यांना 4 ऑक्टोबरपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली असून त्यांची आज कोठडीत चौकशी करण्यात आली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
National Herald Case : ED ची मोठी कारवाई, नॅशनल हेराल्डच्या कार्यालयावर छापा