विनोद तावडे म्हणाले की, काल रात्री राज ठाकरेंच्या टुरींग टॉकिजचा शो पाहिला. राज यांनी ते कोणत्या पक्षाचे स्टार प्रचारक हे आता जाहीर करावं. राज यांनी केलेल्या आरोपांवर उत्तर न देता तावडे म्हणाले की, समज कमी असली की असे आरोप केले जातात.
राज यांच्या म्हणण्याप्रमाणे, जर आमच्या योजना फसलेल्या असतील तर ग्रामपंचायत, जिल्हापरिषद, नगरपालिका, महानगरपालिका येथे होणारा भाजपचा विजय आणि मनसेचा गाशा गुंडाळला जाणं हे कशाचं प्रतीक आहे? असा सवालही तावडे यांनी उपस्थित केला आहे.
VIDEO | शरद पवार आणि राज ठाकरे एकाच हॉटेलात वास्तव्याला | सोलापूर | एबीपी माझा
दरम्यान, भारतातलं पहिलं 'डिजिटल गाव' अशी ओळख मिळालेल्या हरिसाल या गावाचं खरं सत्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जगासमोर मांडलं होतं. राज ठाकरेंच्या दणक्यानंतर सरकारला जाग आली आहे. या गावातले जे काही तांत्रिक प्रश्न असतील ते सोडवले जातील, असे आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले आहे.
वाचा : राज ठाकरेंच्या दणक्यानंतर सरकारला जाग, 'डिजिटल गाव हरिसाल'मधले प्रश्न सोडवण्याचे विनोद तावडेंचे आश्वासन
VIDEO | राज ठाकरेंकडून मोदींच्या 'डिजिटल भारता'ची पोलखोल | सोलापूर | एबीपी माझा
UNCUT | राज ठाकरेंचे सोलापूर येथील संपुर्ण भाषण | सोलापूर | एबीपी माझा