- एसटीच्या 250 पैकी 142 बसेस विशेषतः मंत्रालय, 15 बसेस महापालिका भवन मार्गावर धावणार आहेत.
- उर्वरित (सुमारे 100) बसेस मुंबई महानगर प्रदेशातंर्गत अत्यावश्यक सेवेसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकरिता धावतील. (सध्या त्यांच्यासाठी सुमारे 400 बसेस धावत आहेत.)
- या सर्व बसेस योग्य रीतीने सॅनिटाराईज केलेल्या असून, प्रवासात सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचे काटेकोर पालन करण्यात येणार आहे.
- 23 मार्चपासून मुंबईत अत्यावश्यक सेवेसाठी काम करणाऱ्या डॉक्टर, परिचारिका, शासकीय कर्मचारी, मुंबई महापालिकेचे कर्मचारी, सफाई कामगार, पोलीस, अग्निशामक दलाचे कर्मचारी या सर्वांना ने-आण करण्यासाठी एसटीच्या तब्बल 400 बसेसद्वारे दररोज 800 पेक्षा जास्त फेऱ्या केल्या जातात.
- दररोज सुमारे 14-15 हजार अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांची सुरक्षित ने-आण एसटीच्या बसेसद्वारे केली जाते. गरज भासल्यास आणखीन जादा बसेस एसटीकडून सोडण्यात येतील, असे एसटी प्रशासनाने कळविले आहे.
Mission Begin Again | सोमवारपासून एसटीच्या अतिरिक्त 250 बसेस धावणार!
एबीपी माझा वेब टीम | 06 Jun 2020 09:15 PM (IST)
सोमवारपासून मुंबईत एसटीच्या अतिरिक्त 250 बसेस धावणार आहेत. मंत्रालय व अन्य शासकीय कार्यालयांमध्ये पंधरा टक्के उपस्थिती अनिवार्य केल्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीच्या सोयीसाठी ही सेवा सुरू करण्यात आली आहे.
संग्रहित छायाचित्र
मुंबई : राज्यात मिशेन बिगेन अंतर्गत लॉकडाऊन शिथील करण्यास सुरुवात करण्यता आली आहे. सोमवारपासून मंत्रालय व अन्य शासकीय कार्यालयांमध्ये पंधरा टक्के उपस्थिती अनिवार्य केल्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीच्या सोयीसाठी एसटीने अतिरिक्त 250 बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. या बसेस मुंबईच्या प्रवेशद्वारावरून म्हणजे, पनवेल, पालघर, आसनगाव, विरार, नालासोपारा, वसईबदलापूर येथून धावणार आहेत. खासगी आस्थापनातील कर्मचाऱ्यांना देखील आपले ओळखपत्र दाखवून या बसमधून प्रवास करण्याची मुभा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘पुनश्च हरिओम’ म्हणत राज्यातील लॉकडाऊन शिथील करण्यास सुरुवात केली आहे. त्याअंतर्गत खासगी, शासकीय कार्यालयांना उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांसाठी एसटीच्या 250 बस सोडण्यात येणार आहेत. लॉकडाऊनच्या अडीच महिन्यांत विकले तब्बल 20 टन अंजीर एसटी बसचे नियोजन कसे असणार?