Worli Hit And Run : मुंबई : वरळी (Worli News) हिट अँड रन प्रकरणात (Hit And Run Case) पोलीस (Mumbai Police) तपासातून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्याप फरार असून त्याच्या वडीलांना पोलिसांनी अटक केलेली. पण, सोमवारी मिहीरचे वडील शिवसेना उपनेते राजेश शाह (Rajesh Shah) यांना जामीन मंजूर करण्यात आला. याप्रकरणात पुण्यातील पोर्शे अपघात (Pune Porsche Accident Case) प्रकरणाप्रमाणेच धक्कादायक आणि संतापजनक खुलासे होत आहेत. या प्रकरणातही शाह कुटुंबानं मुख्य आरोपी मिहीरला वाचवण्यासाठी दिसतील ते सर्व मार्ग अवलंबल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे पुण्यातील लाडोबाच्या कुटुंबाप्रमाणेच आता याप्रकरणातही संपूर्ण शाह कुटुंब दोषी असण्याची शक्यता असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. सध्या फरार मिहीरचा पोलिसांकडून कसून शोध सुरू आहे. 


वरळी हिट अँड रन प्रकरणात ज्या गाडीने अपघात झाला ती मुख्य गाडीच आरोपीकडून लपवण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी कोर्टात दिली. तसेच, आरोपीच्या वडिलांकडून गाडीची नंबर प्लेट बदलण्याचा प्रयत्न झाल्याचीही माहिती पोलीस तपासात समोर आलं आहे. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी घटनास्थळाचं सीसीटीव्ही फुटेजही तपासलं होतं. तसेच, मिहीरनं ज्या-ज्या रस्त्यांवरुन पळून जाताना गाडी नेली, त्या-त्या ठिकाणचेही सीसीटीव्ही पोलिसांनी तपासले आहेत. या सीसीटीव्हीमधून अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक गोष्ट समोर आली आहे. 


निर्दयी... आधी दोन किलीमीटरपर्यंत फरफटलं, नंतर पुन्हा चिरडलं 


अपघातानंतर पळून जाणाऱ्या शिवसेना उपनेत्याचा मुलगा मिहीरनं निर्दयी कृत्य केल्याचं समोर आलं आहेय. मिहीरनं मृत कावेरी नाखवा यांना दीड किलोमीटरपर्यंत फरफटत नेलंच, पण त्यानंतर पुढे सीलिंकवर गाडी थांबवून त्यांना बाजूला काढलं आणि पुन्हा त्यांच्याच अंगावरुन गाडी घालून पळून गेला. 


सीसीटीव्ही फुटेज तपासताना पोलिसांच्या हाती लागलेल्या माहितीनुसार, शिवसेना उपनेत्याचा मुलगा मिहीर शाह यानं मुलानं कावेरी नाखवा यांना गाडीनं धडक दिल्यानंतर त्यांना दोन किलोमीटरपर्यंत फरफटत नेलं होतं. पुढे जाऊन वरळी सीलिंक येथे मिहीरनं गाडी थांबवली. त्यानंतर त्यांनी बंपरमध्ये अडकलेल्या कावेरी यांना बाहेर काढलं, ड्रायव्हर राजऋुषी गाडीच्या स्टेअरिंगवर बसला. त्यावेळी दोघांनी गाडी बाजून घेऊन जाणं अपेक्षित होतं. मात्र, त्यानं गाडी पाठीमागे घेतली आणि थेट कावेरी यांच्या अंगावर घालून तिथून पळ काढला. सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली आहे.


नेमकं काय घडलं? 


मुंबईतील वरळीत असलेल्या प्रसिद्ध अॅट्रिया मॉलजवळ हिट अँड रनची घटना घडली आहे. अॅट्रिया मॉलजवळच असणाऱ्या वरळी कोळीवाडा परिसरात राहणारं कावेरी आणि प्रदीप नाकवा हे कोळी दाम्पत्य सकाळी माशांच्या लिलावासाठी ससून डॉकला जाण्यासाठी घराबाहेर पडलं होतं. मासे घेऊन दुचाकीवरुन परतत असताना दाम्पत्याच्या दुचाकीला एका चारचाकी गाडीनं धडक दिली. धडक दिल्यानंतरही चारचाकी गाडीच्या चालकानं गाडी न थांबवता तशीच पळवली. त्यात त्यानं बोनेटवर पडलेल्या कावेरी नाकवा यांना फरफटत नेलं. या अपघातात प्रदीप नाकवा हे थोडक्यात बचावलं. मात्र कावेरी या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यानंतर कावेरी यांना तात्काळ मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता. डॉक्टरांनी कावेरी नाकवा यांना मृत घोषित केलं. या प्रकरणात आरोपी असलेल्या मिहीर शाह हा फरार असून त्याचे वडील हे राजेश शाह हे शिवसेना शिंदे गटाचे उपनेते आहेत. राजेश शाह यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून मिहीरचा शोध सुरू आहे. या प्रकरणात मिहीर सोबत असलेल्या ड्रायव्हरला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे. 


पाहा व्हिडीओ : Worli Hit & Run case : अपघात चालकाच्या नावावर टाकण्याचा राजेश शहांचा प्रयत्न



महत्त्वाच्या इतर बातम्या :