एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 01/02/2018

1.    अरुण जेटलींच्या अर्थसंकल्पात नोकरदारांना दिलासा नाही, प्राप्तिकराच्या दरात बदल नाहीत, सेस वाढवल्याने सर्व बिलं महागणार https://goo.gl/SUqdmv

2.    पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार नाही, अबकारी कर कमी, मात्र सेस वाढवल्याने पेट्रोल-डिझेलचे दर जैसे थे, अर्थसचिवांचं स्पष्टीकरण https://goo.gl/f69ZWn

3.    खासदारांच्या पगारवाढीसाठी कायदा बनवणार, महागाई निर्देशांकानुसार दर पाच वर्षांनी पगारवाढ, अर्थमंत्र्यांची घोषणा, तर राष्ट्रपतींसह उपराष्ट्रपती आणि राज्यपालांचाही पगार वाढवला https://goo.gl/bGoyup

4.    मोदी सरकार यंदा 70 लाख नव्या नोकऱ्या देणार, तर नव्या नोकरदारांच्या पीएफमध्ये 12 टक्के रक्कम सरकार भरणार https://goo.gl/SUqdmv

5.    रेल्वेसाठी यंदा 1 लाख 48 हजार कोटींचं बजेट, मुंबईतील 90 किमी रेल्वेमार्गासाठी 11 हजार कोटींची तरतूद, तर सर्व रेल्वेगाड्यांमध्ये वायफाय, सीसीटीव्ही बसवणार https://goo.gl/SUqdmv

6.    मोदींच्या बजेटमध्ये मिशन महिला सक्षमीकरण, उज्ज्वला योजनेतून 8 कोटी महिलांना गॅस कनेक्शन, तर सौभाग्य योजनेतून 4 कोटी गरीब कुटुंबांना मोफत वीज जोडणीचं लक्ष्य https://goo.gl/SUqdmv

7.    10 कोटी गरीब कुटुंबांना दरवर्षी 5 लाखांपर्यंत उपचाराची सोय, जेटलींकडून ‘आयुष्यमान भारत योजने’ची घोषणा https://goo.gl/SUqdmv

8.    जेटलींच्या बजेटमध्ये शेती, ग्रामीण भारत, शिक्षण आणि आरोग्यावर भर, सर्व शेतमालाला आधारभूत किंमत, शेतीला उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव देण्याचं आश्वासन https://goo.gl/SUqdmv

9.    चार वर्षानंतरही सरकार केवळ आश्वासनच देतंय, राहुल गांधींचा हल्लाबोल, तर अर्थसंकल्प जुमलेबाज, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांची टीका आणि चंद्रग्रहणानंतर सरकारने तारे दाखवले, सुनील तटकरेंचा निशाणा https://goo.gl/Aan6FH

10.    तात्काळ पासपोर्ट आता अवघ्या तीन दिवसात मिळणार, क्लास वन अधिकाऱ्याच्या प्रमाणपत्राची अट शिथील https://goo.gl/EmLXDc

11.    राजस्थानमधील पोटनिवडणुकांमध्ये भाजपला जोरदार झटका, लोकसभेच्या दोन आणि विधानसभेच्या एका जागेवर काँग्रेस विजयी https://goo.gl/RJgrFX

12.    धुळ्यात पोलिस निरीक्षकाची सर्व्हिस रिव्हॉल्वरने गोळी झाडून आत्महत्या, सेवानिवृत्तीला 4 महिने शिल्लक असताना रमेशसिंग परदेशींनी आयुष्य संपवलं https://goo.gl/3QQq7Y

13.    नियम डावलून संजय दत्तला पॅरोल-फर्लोची रजा नाही, राज्य सरकारचं म्हणणं हायकोर्टाकडून मान्य, संजय दत्त आणि फडणवीस सरकारला मोठा दिलासा http://abpmajha.abplive.in/

14.    MPSC प्रवेश प्रक्रियेला हायकोर्टाची अंतरिम स्थगिती कायम, विशेष सरकारी वकिलांच्या नियुक्तीसाठी सरकारने एक आठवड्याचा वेळ मागितला, गुरुवारपर्यंत सुनावणी तहकूब https://goo.gl/bnzBct

15.    मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीसाठी फक्त 4 रुपये मोजावे लागणार, पोर्टेबिलिटीच्या शुल्कात तब्बल 79 टक्के कपात, ट्रायची घोषणा https://goo.gl/SQTX8j

बजेट अपडेट :
▪ अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे https://goo.gl/zfiot8
▪ काय-काय महाग? https://goo.gl/EzqakQ
▪ जेटलींनी देशातील शेतकऱ्यांना काय दिलं? https://goo.gl/bqPEcu
▪ सरकारकडे पैसा येतो कसा आणि खर्च होतो कसा? https://goo.gl/v4ShW2
▪ अर्थसंकल्प कसा छापला जातो? https://goo.gl/yYJaue
▪ नोकरदार की व्यावसायिक, सर्वाधिक टॅक्स कोण भरतं? https://goo.gl/PyP8bY

माझा विशेष : जेटलींचा अर्थसंकल्प भाजपला 2019 ची निवडणूक जिंकून देणार का? पाहा विशेष चर्चा रात्री 9 वाजता

एबीपी माझाचे अपडेट सुपरफास्ट मिळवण्यासाठी फेसबुकवर हा छोटा बदल करा https://goo.gl/NzW5bs   

एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा