*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मे 2026 |शनिवार*

Continues below advertisement

1.मनोज जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं हत्यार, कुणबी प्रमाणपत्रांसाठी 30 मे पासून अंतरवालीत आमरण उपोषण, जरांगेंची घोषणा, तर जरांगेंच्या मागण्यांवर स्थानिक पातळीवर काम सुरू विखे पाटलांची माहिती https://tinyurl.com/4jvz67h5  मराठा उपसमिती बरखास्त करा, 58 लाख मराठ्यांना तातडीने कुणबी प्रमाणपत्र द्या; मनोज जरांगेंच्या 10 प्रमुख मागण्या https://tinyurl.com/wp8tujm9  

2. राज्य सरकारला मराठा आरक्षणासाठी आठ महिने दिले, आता मी आणखी वेळ देऊ शकत नाही, जरांगे पाटलांनी पुन्हा रणशिंग फुंकलं https://tinyurl.com/5exfer4d  ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का बसल्यास रस्त्यावर उतरणार, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंचा इशारा https://www.youtube.com/watch?v=gbS0Q4X8czA 

Continues below advertisement

3. नीट पेपरफुटीप्रकरणी महाराष्ट्रातून आणखी एक प्राध्यापक अटकेत, पुण्यातील बायोलॉजीच्या प्राध्यापिका मनीषा मांढरेही एनटीएशी संबंधित, सीबीआयकडून आतापर्यंत 9 जणांना अटक https://tinyurl.com/ys2ws7ks  नीट घोटाळ्याचा मास्टरमाईंड पुण्यातील प्राध्यापक प्राध्यापक पी व्ही कुलकर्णी केमिस्ट्रीचा पेपर, नाशिकचा शुभम खैरनार बायोलॉजीचा पेपर फोडायचा, 28 वर्ष प्राध्यापक राहिल्यानंतर पेपर फोडीचा गोरखधंदा https://tinyurl.com/3a6czav7  नीट परीक्षा रद्द झाल्याचा धसका, नैराश्याच्या भरात तीन विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल https://tinyurl.com/yc7t22nf 

4. प्रफुल पटेलांनीही घेतली शरद पवारांची भेट, 12 मे रोजी तटकरे-पटेलांची पवारांशी चर्चा, पक्षात सध्या सुरू असलेल्या घडामोडींबाबत बैठकीत चर्चा झाल्याची माहिती https://www.youtube.com/watch?v=5b5cjpLsoug  पार्थने व्हीएसआरच्या विमानातून प्रवास केल्यानं आणि सुनेत्रा पवार केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री राममोहन नायडूंशेजारी बसल्याने त्यांच्याशी चर्चा करायची इच्छा नाही, रोहित पवारांची नाराजी https://tinyurl.com/4jp3ca83 

5. बँकेच्या कर्जापायी रचला स्वतःच्या मृत्यूचा कट, दारू पाजून शेजारच्या मित्रालाच संपवलं; 8 महिन्यानंतर थरारक घटनेचा उलगडा, गोंदियात खळबळ https://tinyurl.com/w5kx9rm3  गुरु-शिष्य नात्याला काळिमा; चौथीतील विद्यार्थिनीसोबत शिक्षकाकडूनच संतापजनक कृत्य, आईच्या तक्रारीवरून पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल, जळगावातील घटना https://tinyurl.com/498n2umu 

6. कोल्हापुरात ज्या ठिकाणी भीषण अपघातात डोळ्यादेखत पत्नी अन् दोन लेकरांना गमावलं त्याच ठिकाणी वडिलांकडून विष प्राशन करत आयुष्याचा शेवटhttps://tinyurl.com/5n8s8awc  मुलीच्या लग्नाचा आनंद क्षणात विरला; बायकोसमोर अपमान झाल्याने पोटच्या मुलानेच आई-वडिलांना मुसळाने संपवलं, धुळ्यात खळबळ https://tinyurl.com/52c5a8y9 

7. जेलमध्ये बसून अशोक खरातची कमाई सुरुच, कुंभमेळा रिंगरोडसाठी जमीन गेली, तीन कोटींचा सरकारी मोबदला मिळणार https://tinyurl.com/4326kx9p 

8. मान्सून अंदमान आणि निकोबारच्या बेटांपर्यंत दाखल, बंगालच्या उपसागरातील काही भागही व्यापला,भारतीय हवामान विभागाची माहिती https://tinyurl.com/dcdfh5yu  एल निनो जूनमध्येच सक्रिय होणार असल्यानं संपूर्ण मान्सून हंगामावर प्रभावाचा अंदाज, एल निनोचा प्रभाव डिसेंबरच्याही पुढे राहिल्यास पुढल्या वर्षीच्या मान्सूनलाही फटका बसण्याची शक्यता https://tinyurl.com/mrzv9tuy 

9. बीडच्या गेवराईतील गोदावरीचे नदीपात्र कोरडंठाक, गोदाकाठच्या गावांना पाणीटंचाईच्या झळा, तर मुंबई पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणातील पाणीसाठा 40 टक्क्यांवर https://www.youtube.com/watch?v=lgzOrMcvUUE   मुंबईत पावसाळ्यात पाणी साचू नये म्हणून विशेष खबरदारी, पालिकेकडून कामाला सुरुवात https://www.youtube.com/watch?v=zFiZCNBDB5o 

10. प्लेऑफसाठी KKRचा जीव टांगणीला, गुजरातच्या शुभमन गिलच्या वादळासमोर कोलकात्याच्या अजिंक्य रहाणेची प्रतिष्ठेची लढाई, आज लढत https://tinyurl.com/mtn4yh8k  मुंबई आयपीएलमधून बाहेर पडताच हार्दिक पांड्या दुसऱ्यांदा लगीनगाठ बांधणार असल्याच्या चर्चा https://tinyurl.com/3ty7xshy 

एबीपी माझा स्पेशल

बारामतीचा पुढचा दादा कोण? तटकरे-पटेलांचा 'तो' ऑडिओ कोणता? कॉफी विद कौशिकमध्ये रोहित पवारांच्या दिलखुलास गप्पा https://www.youtube.com/watch?v=sz3mu2jabWo 

एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w