ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2026 | रविवार

Continues below advertisement

1. दिल्लीनंतर आता मुंबईत कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन, दादरच्या शिवाजी पार्क परिसरला छावणीचं स्वरूप, पोलिसांकडून सीजेपी कार्यकर्ते, आंदोलकांची धरपकड सुरू, तर आंदोलनातून दंगल घडवण्याचा पोलिसांचा प्रयत्न, मनसेचा आरोप https://tinyurl.com/2jwk7wpw सेनाभवनासमोर पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये तुफान राडा, ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना सोडा, आदित्य ठाकरेंचा पोलिसांना इशारा https://tinyurl.com/3vfk3afs 

2. कायदा-सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाली तरच मेट्रो, रेल्वे बंद करा, सुप्रीम कोर्टाच्या केंद्र सरकारला सूचना, शांततेत आंदोलन करणाऱ्यांना हात लावू नका, इंटरनेट सेवाही सुरू ठेवण्याचे कोर्टाचे आदेश https://tinyurl.com/ybfphyre तुमच्यावर कोर्टाच्या अवमाननेचा खटला का चालवू नये, सुप्रीम कोर्टाची दिल्ली पोलिसांना नोटीस, मंगळवारपर्यंत उत्तर देण्याच्या सूचना, मेट्रो, रेल्वे का बंद ठेवली याचं मागितलं स्पष्टीकरण https://www.youtube.com/watch?v=eh8aAY7cGqY 

Continues below advertisement

3. कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही, त्यामुळे ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आम्ही आंदोलन करतच राहणार, दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच अभिजित दिपकेंनी जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला https://tinyurl.com/72c77tua  दिल्लीतील आंदोलन पुन्हा पेटणार, अभिजीत दिपकेंसह सौरभ दास आणि रांका यांची कोर्टाकडून जामिनावर सुटका https://tinyurl.com/4v7c8jrd 

4. आजीच्या निधनाची बातमी मिळाली, पण दिल्ली पोलिसांनी अभिजीतला भावाशी किंवा वडिलांशी बोलू दिलं नाही, पोलिसांच्या ताब्यात असताना घडलेलं आशुतोष रांकांनी सांगितलं, तर दिपकेला गावी जाण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची तयारी दर्शवली पण त्याने ती नाकारली, दिल्ली पोलिसांचा दावा https://tinyurl.com/267nj9zf  आजीच्या निधनानंतर अभिजीत दिपके घरी परतले, सुटकेनंतर पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, मोदी पंतप्रधान असणे ही भारतासाठी शरमेची गोष्ट, इतका भित्रा पंतप्रधान पाहिला नाही https://tinyurl.com/378hvwe3 

5. एमपीएसीच्या विद्यार्थ्यांना काही तरी निरोप द्या अन्यथा विद्यार्थी उद्या वेगळा निर्णय घेतील, रोहित पवारांचा सरकारला इशारा, अध्यक्षांचा सोडा, सरकारचाच राजीनामा घ्यावा लागेल असंही वक्तव्य https://tinyurl.com/37nacrbt 

6. राज्यात दुष्काळामुळं कापूस, सोयाबीन, तुरीचे उत्पादन घटले, केंद्राच्या दुष्काळ पथकाची माहिती, मुख्यमंत्र्यांकडून अधिकाधिक मदतीची अपेक्षा https://www.youtube.com/watch?v=voy87O5D8qM  दुष्काळाचं सावट, नागपूर जिल्ह्यात बोअरवेल खोदकामांवर पुढील आदेशापर्यंत बंदी; संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा मोठा निर्णय https://tinyurl.com/3zwszv9s 

7. पुणे जिल्ह्यातील पुरंदरच्या आडाचीवाडी ग्रामपंचायतीला सर्वोच्च ग्रामपंचायतीचा पुरस्कार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव https://tinyurl.com/mr5tj27m 

8. महायुतीचे नेते सहा महिने भांडले, आता गळ्यात गळे घातले, सतेज पाटलांचा महायुतीला टोला, शिट्टी वाजवा आणि यांचा तमाशा संपवा, गोकुळ निवडणूक प्रचाराच्या शुभारंभावेळी सतेज पाटलांचे मतदारांना आवाहन https://tinyurl.com/y7byw7nc 

9. खोटं बोलत असल्याचा संताप, इंजिनियर मुलाने जन्मदात्या आईचाच बळी घेतला, अमरावतीतील धक्कादायक घटना https://tinyurl.com/3ahpu2y2  लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात प्रियकराने प्रेयसीला संपवलं, कोल्हापुरातील घटना https://tinyurl.com/muzzzva2 

10. रणजी ट्रॉफीत पहिल्याच दिवशी हायव्होल्टेज ड्रामा, अरुणाचल प्रदेशचा संघ मैदानात आलाच नाही, नागालँडचा संघ सामना न खेळताच पुढील फेरीसाठी पात्र https://tinyurl.com/2p6a7jwm 

एबीपी माझा स्पेशल

शांततेत आंदोलन करणाऱ्यांना हात लावू नका, ताब्यात घ्यायचं नाही, सुप्रीम कोर्टाचा दिल्ली पोलिसांना झटका, सुनावणीतील 10 मोठे मुद्देhttps://tinyurl.com/nhz5stp2 

एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w