ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मे 2025 | शनिवार
ABP Majha Top 10 Headlines : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मे 2025 | शनिवार
1. स्वप्नातली घरं डोळ्यादेखत बेचिराख, पिंपरी चिंचवडमधील 36 बंगले जमीनदोस्त,मनोज जरे या बिल्डरकडून फसवणूक https://tinyurl.com/puv39m5p पालिका अधिकाऱ्यांनी पैसे खाल्ले,राजकारण्यांनी शब्द दिले, 29 बंगले मालकांचा दावा, बंगले उभे राहताना का रोखलं नाही, पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे म्हणतात दोन वर्षांपासून प्रक्रिया सुरु https://tinyurl.com/68tkhzf7 स्वप्नातलं घर पै-पै जमा करुन उभारलं, घरासाठी 1 कोटी 35 लाखांचा खर्च, 47 लाखांचं कर्ज बाकी, ज्यांचे बंगले पाडले त्या मालकांनी सांगितली आपबिती https://tinyurl.com/p7wbvtfh
2. 'ऑपरेशन सिंदूर'ची यशोगाथा 'खासदारांची टीम इंडिया' अवघ्या जगाला सांगणार,पाकिस्तानचा दहशतवादाबाबतचा खरा चेहरा जगासमोर आणणार, शशी थरुर, सुप्रिया सुळे, श्रीकात शिंदेंसह 7 खासदार शिष्टमंडळाचं नेतृत्व करणार https://tinyurl.com/yexeymnr शशी थरुर अमेरिकेला भेट देणार, सुप्रिया सुळे दक्षिण आफ्रिका तर श्रीकांत शिंदे यूएईमध्ये भारताची बाजू मांडणार,पाकिस्तानचे खोटे दावे खोडून काढणार https://tinyurl.com/5fhjn26f
3. ईडीच्या अटकेपूर्वी एकनाथ शिंदेंनी मला फोन करुन मी वरती बोलू का?, अमित शाह यांना सांगू का? असं विचारलं, संजय राऊत यांचा पुस्तकात दावा, नरकातील स्वर्ग पुस्तकाचा उद्धव ठाकरे, शरद पवारांच्या उपस्थितीत मुंबईत प्रकाशन सोहळा https://tinyurl.com/43es7yyj ईडी अधिकाऱ्याने वरती बोलून घेण्याचा सल्ला दिला,आपल्या वरती केवळ बाळासाहेब ठाकरे म्हणत सुनावलं, संजय राऊत यांचा पुस्तकात उल्लेख https://tinyurl.com/34z77kx6
4. हल्ल्याच्या सुरुवातीला पाकिस्तानला माहिती देणं गुन्हा, त्यासाठी परवानगी कुणी दिली? परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा व्हिडिओ शेअर करत राहुल गांधी यांचा सरकारला सवाल, https://tinyurl.com/zf988kn3 भारताने पाकिस्तान नाही, चीनवर सर्वाधिक फोकस करावा;'ऑपरेशन सिंदूर'चा उल्लेख करत किंग्ज कॉलेज लंडनमधील आंतरराष्ट्रीय संबंध तज्ज्ञ वॉल्टर लाडविग यांचा सल्ला https://tinyurl.com/3w93m6nt
5. बीडच्या शिवराज दिवटेला लोखंडी रॉड, कत्तीने मारहाण,...याचा संतोष देशमुख पार्ट-2 करायचा, मारहाण करणऱ्यांची भाषा, समाधान मुंडे आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल https://tinyurl.com/mrnszvm3 शिवराज दिवटेच्या मारहाण प्रकरणाला जातीय रंग देऊ नका, बीड पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांचं आवाहन, https://tinyurl.com/mu9bkrf6 धनंजय देशमुख यांनी घेतली शिवराज दिवटेची भेट, प्रकृतीची विचारपूस करत धीर दिला https://tinyurl.com/uz9nuufb
6. पुणे महापालिका निवडणुकीत महायुतीचे पक्ष स्वतंत्रपणे लढण्याची शक्यता, अजितदादांच्या राष्ट्रवादीला सोबत घेण्यात भाजपला अडचण, देवेंद्र फडणवीसांनी 105 नगरसेवकांचं टार्गेट दिलं, शहराध्यक्ष धीरज घाटेंची माहिती https://tinyurl.com/97a734s6
7. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारेंनी मारहाण केल्याचा भाजप कार्यकर्त्याचा आरोप,जीवे मारण्याची धमकी दिली,पोलीस दखल घेत नसल्याचा मारहाण झालेल्या भाजप कार्यकर्ता कैलास पवारचा दावा https://tinyurl.com/b5ekkvs2
8. पुणे आयसिस मोड्यूल प्रकरणी दोघांना अटक;दोन वर्षांपासून फरार असलेल्या दोघांना इंडोनेशियातून अटक,राष्ट्रीय तपास यंत्रणेची मोठी कारवाई https://tinyurl.com/3mwb9mhx
9. युट्युबर ज्योती मल्होत्राच्या मुसक्या आवळल्या; पाकिस्तानी गुप्तचर एजंटांशी संपर्क ठेवत संवेदनशील माहिती शेअर केल्याचा आरोप https://tinyurl.com/y9f8xve8
10. आजपासून पुन्हा आयपीएलचा थरार रंगणार, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्स आमने सामने,अजिंक्य रहाणेच्या टीमला विजय आवश्यक, मॅचवर पावसाचं सावट https://tinyurl.com/yc6neda6
एबीपी माझा स्पेशल
Vastav 163 : पुण्यातील कोंढव्यात आयसिस अड्डा कुठे सुरू होता? वास्तव 163 : https://www.youtube.com/watch?v=78rl7DVB3XE&ab_channel=ABPMAJHA
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w



















