मुंबई : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधक आक्रमक झाले आहेत. अशातच आज (दि. ०२ ऑक्टोबर)  CJP च्या वतीने (Abhijeet Dipke CJP Protest) मुंबईत शिवाजी पार्कच्या गेट क्रमांक ६ येथे आंदोलन होणार आहे. या आंदोलनाला (Abhijeet Dipke CJP Protest) परवानगी नसली, तरी अजिबात मागे हटणार नसल्याचे दिपके यांनी स्पष्ट केले. तत्पूर्वी एक अभिजीत दिपकेंचा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. चला चहा घेऊ असं म्हणत पोलिसांनी अभिजीत दिपकेंना ऑफर दिली, त्यांना गाडीत बसवलं.(Abhijeet Dipke CJP Protest) पोलिस स्टेशनला नेलं जरा वेळ बसवून न चहा देताच परत पाठवलं.

Continues below advertisement

महिला पोलिस अधिकारी: "चहा घेऊ आपण... चला..." असे बोलून त्यांना सोबत येण्याची विनंती करतात.   अभिजीत दिपके: "मॅडम मला पुढे जायचं आहे, मी चहा पिलाय..." असे सांगून निघून जाण्याचा प्रयत्न करतात.  महिला पोलिस अधिकारी: "नाही नाही, तुम्ही आमचा शब्द नाही मानणार का? चला..." असे म्हणतात.    अभिजीत दिपके: "मॅडम मी चहा पिला आहे, मला जायचं आहे, गाडी बोलावली आहे."महिला पोलिस अधिकारी: "नाही नाही, तुम्ही आमचा शब्द नाही मानणार का?"अभिजीत दिपके: "डिटेन (Detain) करायचं असेल तर ऑफिशियली सांगा" अशी मागणी करतात.   गाडीतील प्रवास: यानंतर पोलिस त्यांना आपल्या गाडीत बसवून 'मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्या'कडे (Marine Drive Police Station) घेऊन जातात. गाडीत महिला अधिकारी अभिजीत दिपके यांची नाव-पत्ता विचारतात.   महिला अधिकारी: "तुमचं नाव काय?"   अभिजीत दिपके: "अभिजीत दिपके"   महिला अधिकारी: "तुम्ही कुठे राहता?"   अभिजीत दिपके: "मी संभाजीनगरचा (छत्रपती संभाजीनगर) आहे, आता मुंबईत राहतो" असे उत्तर देतात. त्यानंतर अभिजीत दिपकेंना पोलिस स्टेशनमध्ये नेलं जातं.

Abhijeet Dipke CJP Protest :  पोलिस ठाण्यातील संभाषण व सुटका

 पोलिस ठाण्यात पोहोचल्यावर अभिजीत दिपके आणि त्यांचे सहकारी मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात बसलेले दिसतात.  महिला पोलिस अधिकारी: वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनवर बोलून परत येतात आणि हसत म्हणतात, "वरून कॉल आलाय... चहा पण नाही पाजायचा, साहेब बोले सरांना जाऊ द्या!"   अभिजीत दिपके व मित्र: हे ऐकून सर्वजण हसायला लागतात आणि पोलिस ठाण्यातून बाहेर पडतात.   

Abhijeet Dipke CJP Protest :  बाहेर आल्यावर अभिजीत दिपके काय म्हणाले?

अभिजीत दिपके हसत प्रतिक्रिया देताना म्हणाले, "वरतून ऑर्डर आली असावी की यांचा फक्त वेळ वाया घालवा, पोलिस ठाण्यात बसवून ठेवा, बाहेर फिरू देऊ नका. म्हणून आम्हाला चहाच्या नावाखाली डिटेन केलं आणि नंतर चहासुद्धा पाजला नाही!"   पुढे ते मरीन ड्राईव्हकडे परत जाताना म्हणतात, "आता आम्ही मरीन ड्राईव्हला जाऊनच चहा पिणार आणि तेही या पोस्टर्ससोबतच पिणार!"त्यानंतर हे  सर्वजण पुन्हा मरीन ड्राईव्हच्या दिशेने निघून गेले. पोलिसांच्या या 'चहा डिप्लोमसी' आणि तातडीने सोडून देण्याच्या प्रकारामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.