मुंबई : स्कॉटलंड बँकेच्या माजी सीईओ मीरा सन्याल यांचे कर्करोगाच्या आजारानं 57 व्या वर्षी निधन झालं आहे.  2014 साली मीरा सन्याल दक्षिण मुंबईमधून आपकडून निवडणूक लढल्या होत्या. त्या नौसेनेचे अधिकारी माजी व्हाईस एडमिरल गुलाब मोहनलाल हिरानंदानी यांच्या कन्या होत्या. मागील 30 वर्षांपासून त्या बँकींग क्षेत्रात सक्रीय होत्या. रॉयल बँक ऑफ स्कॉटलंडमधून बाहेर पडल्यावर 2014 साली त्यांनी आपमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता.

रॉयल बँक ऑफ स्टॉटलँडच्या मुख्याधिकारी म्हणून काम पाहिल्यानंतर त्यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला होता. 2014 मध्ये त्यांनी मुंबईतून आपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला होता.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सन्याल यांच्या निधनाबाबत दुःख व्यक्त करताना आपण फार दु:खी असून निशब्द झाल्याचे ट्विट  केलं आहे.


दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सन्याल यांच्या निधनाबाबत दुःख व्यक्त केलंय. सन्याल यांच्या निधनानं आपण एक चांगला अर्थतज्ज्ञ आणि चांगलं व्यक्तिमत्त्व गमावलं, असं ट्विट त्यांनी केलं आहे.