Aaditya Thackeray on Dharmendra Pradhan Resigns : गेल्या 35 दिवसांपासून दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरु असलेल्या कॉकरोच जनता पार्टी आणि विद्यार्थ्यांकडून सुरु असलेल्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. NEET पेपर फुटीप्रकरणी देशभरातून तीव्र लाट उसळल्यानंतर अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. धर्मेंद्र प्रधान हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील अत्यंत महत्त्वाचे आणि पॉवरफुल मंत्री मानले जात होते. त्यांच्या या राजीनाम्यानंतर देशभरातील राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. या घटनेवर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हीच भारताची ताकद आहे असं आदित्य ठाकरेंनी ट्वीट करुन म्हटलं आहे. याचबरोबर आदित्य ठाकरेंनी तीन महत्वाचे मुद्दे देखील मांडले आहेत.
आदित्य ठाकरेंनी तीन मागण्या केल्या
NEET पेपर फुटीप्रकरणी देशभरातून तीव्र लाट उसळल्यानंतर अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यानंतर विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया समोर येत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हीच भारताची ताकद आहे असं त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर आता राजीनामा झाला आहे, तर तरुण भारतीयांवर केलेल्या अमानुष लाठीमाराबद्दल भाजप सरकारकडून माफी मागितली जावी. तसेच विद्यार्थ्यांवर लाठीमारीचे आदेश कोणी दिले, याची चौकशी व्हावी. तसेच सरकारच्या या क्रूरतेविरुद्ध आंदोलन करणाऱ्या भारतीयांवरील सर्व एफआयआर (FIR) मागे घेतले जावेत, हे महत्त्वाचे आहे, अशा तीन मागण्या आदित्य ठाकरेंनी केल्या आहेत.
Dharmendra Pradhan Resign: धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनाम्यात नेमकं काय म्हटलंय?
माझ्या तरुण सहकाऱ्यांनो,
मी गेल्या ४ दशकांपेक्षा जास्त काळापासून विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण सुधारणेसाठी समर्पित राहिलो आहे. एक सशक्त, सर्वसमावेशक आणि दूरदृष्टी असलेली शिक्षण व्यवस्थाच एका सशक्त राष्ट्राची पायाभरणी असते, यावर माझा नेहमीच विश्वास राहिला आहे.
मी देशातील तरुणांच्या आकांक्षा, भावना आणि त्यांच्या रास्त अपेक्षांचा मनापासून आदर करतो. भारतातील तरुण पिढीची स्वप्ने साकार करणे हा आपल्या सर्वांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाचा नैतिक संकल्प राहिला आहे. आदरणीय पंतप्रधानांच्या दूरदृष्टी नेतृत्वाखाली राष्ट्रसेवा करण्याची जी संधी मला मिळाली, त्याबद्दल मी मा. पंतप्रधानांचे आभार व्यक्त करतो.
परंतु, ३ मे २०२६ रोजी झालेल्या NEET-UG च्या परीक्षेत अनियमितता आढळून आली. भारत सरकारने याची तत्काळ दखल घेत तपास सीबीआयकडे (CBI) सोपवला, परीक्षा रद्द केली आणि पुनरुपरीक्षेची तारीख घोषित केली. यासोबतच पुढच्या वर्षापासून ही परीक्षा सीबीटी (Computer-based-test) मोडमध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
या कालावधीत २० लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची परीक्षा सुरळीत पार पडावी, ही आमची मुख्य प्राथमिकता होती. यासाठी 'संपूर्ण सरकार दृष्टिकोन' (whole of government approach) ठेवून काम करण्यात आले. यामध्ये भारत सरकारसोबतच राज्य सरकारे, विशेषतः जिल्हा प्रशासनाची अत्यंत महत्त्वाची भूमिका राहिली. तसेच विद्यार्थी, पालक आणि माता-पित्यांच्या सहकार्याने २१ जून २०२६ रोजी ही परीक्षा पूर्ण झाली.