मुंबई : शिवसेना आमदार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचं नावही मंत्रिमंडळात निश्चित मानलं जात आहे. आज शपथविधी घेणाऱ्या शिवसेनेच्या आमदारांची यादी तयार झाली आहे. त्यात आदित्य यांच्या नावाचा समावेश असल्याची माहिती आहे. त्यामुळे आदित्य यांना कोणते मंत्रिपद मिळतं याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, एकाच घरात दोन मंत्रिपदे देण्यात आल्याच्या शक्यतेमुळे शिवसेना नेते नाराज असल्याचीही चर्चा आहे.


आदित्य ठाकरे सक्रीय राजकारणात आल्यापासून शिवसेनेचा तरुण चेहरा राहिलेले आहेत. युवासेना प्रमुख म्हणून त्यांनी अनेक आंदोलने केली. युवासेनेच्या माध्यमातून शिवसेनेला अधिक मजबूत करण्याचे काम त्यांनी केले आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने त्यांना मुख्यमंत्री म्हणून प्रमोट केले होते. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात संधी दिली असल्याची शक्यता आहे.

पर्यावरण, शिक्षण खाते मिळण्याची शक्यता -
आदित्य ठाकरे यांचा पहिल्यापासून पर्यावरण आणि शिक्षण खात्याकडे ओढा राहिलेला दिसून आला आहे. मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर ते स्वतः हातात झाडू घेऊन स्वच्छतेसाठी उतरले होते. त्यामुळे पर्यावरण खाते त्यांना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर, दुसरीकडे युवासेनेच्या माध्यमातून त्यांनी मुंबई विद्यापीठ आणि मुंबईतील अन्य महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी त्यांनी अनेक आंदोलने केली आहेत. केजी टू पीजी विद्यार्थ्यांसाठी त्यांनी मुंबईत मोर्चा काढला होता. ज्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे शिक्षण खातंही आदित्य घेऊ शकतात.
एकाच घरात दोन मंत्रिपदं -
आदित्य ठाकरे यांना मंत्रिपदं मिळाले तर ठाकरेंच्या घरात दोन मंत्रिपदं जातील. त्यामुळे शिवसेनेचे काही आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. मात्र, आदित्य ठाकरे हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव असल्यामुळे ही नाराजी उघड होणार नसल्याचेही बोलले जात आहे. दरम्यान, आदित्य यांना कॅबीनेट मिळतं की राज्यमंत्रीपद याचीही उत्सुकता आहेच.

कुणाला किती मंत्रिपदं मिळणार?
शिवसेनेचे 13 मंत्री शपथ घेणार आहेत, त्यामध्ये 10 कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्र्यांचा समावेश असू शकतो. राष्ट्रवादीचे 13 मंत्री शपथ घेणार आहेत त्यामध्ये कॅबिनेट 10 आणि तीन राज्यमंत्री शपथ घेऊ शकतात. काँग्रेसचे 10 मंत्री शपथ घेणार आहेत, त्यामध्ये 8 कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री शपथ घेणार आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात काही खाती रिक्त ठेवण्यात येतील अशी माहिती आधी मिळत होती. मात्र आता सर्व खाती भरण्यात येतील, असं बोललं जात आहेत.

हेही वाचा - Sanjay Raut | भावाला मंत्रिमंडळात संधी न मिळाल्याने संजय राऊत नाराज असल्याची चर्चा

Aditya Thackeray | ट्रोलर्सकडे लक्ष देऊ नका, मुख्यमंत्र्यांच्या आदर्शावर चाला : आदित्य ठाकरे | ABP Majha