"इथे लोकांचं चालणं कठीण झालंय, तर बुलेट ट्रेन कशाला हवी? मोदींना बुलेट ट्रेन करायची असेल तर गुजरातमध्ये करावी. जबरदस्ती केली तर ती आमच्याकडूनही होईल," असा स्पष्ट इशारा राज ठाकरे यांनी दिला.
सुरेश प्रभू चांगलं काम करत होते. त्यांना का हटवलं हे मला अजूनही समजलं नाही, असं म्हणत बुलेट ट्रेनच्या लाडापायी प्रभूंना हटवून गोयल यांना आणल्याची टीका राज यांनी पत्रकार परिषदेत केली. तसंच मोदींइतकं खोटं बोलणारा पंतप्रधान कधी पाहिला नाही, असंही ते म्हणाले.
...म्हणून घटनास्थळी गेलो नाही
"एलफिन्स्टनवरची घटना अतिशय दुर्दैवी होती. पण व्यवस्था, यंत्रणेवर ताण येऊ म्हणून काल घटनास्थळी गेलो नाही. चिंतेचा आव आणून त्या गोष्टी पाहण्यात अर्थ नसतो. संजय गवते 10 ते 15 वर्ष एलफिन्स्टन पुलासाठी भांडत आहेत. तर बाळा नांदगावकरांनीही अनेक वर्ष याचा पाठपुरावा केला आहे. परंतु एवढ्या वर्षात काहीही झालेलं नाही," असं म्हणत राज ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केला.
पुलाच्या दुरुस्तीचं काम एमएमआरडीएचं
एलफिन्स्टन पुलासंदर्भात बाळा नांदगावकरांनी पत्र लिहिलं होते. या पत्रावर पुलाच्या दुरुस्तीचं काम एमएमआरडीएचं असल्याचं उत्तर आलं. पण एमएमआरडीएने हे काम पूर्ण केलं नाही, असा दावाही राज ठाकरे यांनी केला.
चर्चगेटला 5 ऑक्टोबरला मोर्चा
रेल्वे प्रशासनाच्या भोंगळ कारभाराविरोधात येत्या 5 ऑक्टोबरला मुंबईत चर्चगेट स्टेशनच्या मुख्यालयाबाहेर मोर्चा काढून जाब विचारणार असल्याचं राज ठाकरे यांनी जाहीर केलं. विशेष म्हणजे राज ठाकरे स्वत: रस्त्यावर उतरुन या मोर्चाचं नेतृत्त्व करणार आहेत. या मोर्चात सहभागी होऊन मुंबईकरांनी राग व्यक्त करावा, असं आवाहनही त्यांनी केलं.
परप्रांतियांमुळे मुंबईतील पायाभूत सुविधांचा बोजवारा
परप्रांतियांमुळे मुंबईतील पायाभूत सुविधांचा बोजवारा उडाला आहे. जोपर्यंत लोंढे आदळणं थांबणार नाहीत तोपर्यंत हे प्रकार थांबणार नाहीत. शहराच्या पायाभूत सुविधा आता पुरेशा नाहीत, असं मनसे अध्यक्ष म्हणाले.
आपल्याला दुश्मनांची गरज काय? कशाला हवा पाकिस्तान, कशाला हवा चीन?, लोकांना मारण्यासाठी रेल्वे पुरेशी असल्याचं राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
LIVE : मोदींइतकं खोटं बोलणारा पंतप्रधान कधी पाहिला नाही : राज ठाकरे http://abpmajha.abplive.in/live-tv
LIVE : बुलेट ट्रेनच्या हट्टापायी सुरेश प्रभूंना हटवून पियुष गोयल यांना आणलं : राज ठाकरे http://abpmajha.abplive.in/live-tv
LIVE : सुरेश प्रभू चांगलं काम करत होते, त्यांना का हटवलं हे मला अजून समजलं नाही : राज ठाकरे http://abpmajha.abplive.in/live-tv
LIVE : मोदींना बुलेट ट्रेन करायची असेल तर गुजरातमध्ये करावी, जबरदस्ती केली तर ती आमच्याकडूनही होईल : राज ठाकरे http://abpmajha.abplive.in/live-tv
LIVE : मुंबईत बुलेट ट्रेनची एकही वीट रचली जाणार नाही : राज ठाकरे http://abpmajha.abplive.in/live-tv
LIVE: 5 तारखेला चर्चगेट स्टेशनच्या मुख्यालयाबाहेर मोर्चा काढून जाब विचारणार, मी स्वत: रस्त्यावर उतरणार : राज ठाकरे http://abpmajha.abplive.in/live-tv
LIVE : स्थानकांची नाव बदलून प्रश्न सुटणार आहेत का? : राज ठाकरे http://abpmajha.abplive.in/live-tv
LIVE : लोकांचं चालणं कठीण झालंय, तर बुलेट ट्रेन कशाला? : राज ठाकरे http://abpmajha.abplive.in/live-tv
LIVE : अनेकांना प्रश्न पडतो, राज ठाकरे ट्रेनने गेले आहेत का? होय, मी दोन वर्ष ट्रेनने प्रवास केलाय : राज ठाकरे http://abpmajha.abplive.in/live-tv
LIVE : तीन वर्षांपूर्वी प्लॅटफॉर्मची उंची मोजणारे किरीट सोमय्या आता गप्प : राज ठाकरे http://abpmajha.abplive.in/live-tv
LIVE : परप्रांतियांमुळे मुंबईत पायाभूत सुविधांचा बोजवारा : राज ठाकरे http://abpmajha.abplive.in/live-tv
LIVE : बाळा नांदगावकरांच्या पत्रावर, पुलाच्या दुरुस्तीचं काम एमएमआरडीएचं असल्याचं उत्तर आलं : राज ठाकरे http://abpmajha.abplive.in/live-tv
LIVE : संजय गवते 10-15 वर्ष एलफिन्स्टन पुलासाठी लढत आहेत, बाळा नांदगावकरांनाही पाठपुरावा केला : राज ठाकरे http://abpmajha.abplive.in/live-tv
LIVE : व्यवस्थेवर ताण येऊ नये म्हणून घटनास्थळी गेलो नाही : राज ठाकरे http://abpmajha.abplive.in/live-tv