मुंबई : मुंबईतील उपनगरीय रेल्वेचा व्याप आता आणखी वाढणार आहे. पश्चिम रेल्वेवर आता नवीन आठ स्थानकांचा समावेश होणार आहे. डहाणूपर्यंत सध्या पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे सुरु आहे. यात आता डहाणूच्या पुढील 8 नव्या स्थानकांची भर पडली आहे.
मुंबईतील उपनगरीय रेल्वेची क्षमता वाढवण्यासाठी एमयूटीपी 3 अंतर्गत डहाणूपर्यंतच्या प्रवाशांना लोकलच्या जास्त जास्त फेऱ्या मिळणार आहेत. रेल्वच्या सुविधेमुळे विरार ते डहाणू मार्गावर मोठे गृहनिर्माण प्रकल्प तयार होऊ लागले आहेत. साहजिकच या परिसरात राहणाऱ्या नागरिकांची संख्याही वाढली आहे. वाढलेली प्रवासी संख्या लक्षात घेत, विरार डहाणू मार्गावर लोकलची संख्या वाढवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेनं घेतला आहे.
तसंच पश्चिम रेल्वेवर विरार डहाणू चौपदरीकरण प्रकल्पात 8 नव्या स्थानकांचा समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे 64 किमीच्या या पट्ट्यातील प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.
कोणती असतील नवी स्थानक?
बीएसईएस कॉलनी, वंजारवाडा, पांचाली, खराळे रोड, चिंतुपाडा, माकुन्सर, वाधवी, सारतोडी.
ही स्थानके वैतरणा-सफाळे दरम्यान 2 , सफाळे-केळवे दरम्यान 1, केळवे-पालघर दरम्यान 1, पालघर-उमरोली दरम्यान 1, उमरोली-बोईसर दरम्यान 1, बोईसर-वाणगाव दरम्यान 1, वाणगाव-डहाणू रोड दरम्यान 1 या सध्याच्या स्थानकांदरम्यान बांधली जाणार आहेत. तसंच या मार्गावर सरासरी दर 4 किलोमीटरवर 1 स्थानक असेल, असे एमआरव्हीसीच्या अहवालात स्पष्ट करण्यात आलंय.