भाजप नेत्यांना मारहाण प्रकरणी पाच शिवसैनिकांना पोलिस कोठडी
एबीपी माझा वेब टीम | 12 Oct 2016 05:58 PM (IST)
मुंबईः मुलुंडमध्ये रावण दहनावेळी भाजप नेत्यांना मारहाण प्रकरणी पाच शिवसैनिकांना एक दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. भाजप नेत्यांवर हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक करुन आज कोर्टात हजर केलं. सर्व कार्यकर्त्यांवर 326, 504, 506, 323, 143, 147, 149, 137, 135 या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप खासदार किरीट सोमय्यांनी कालच्या दसरा कार्यक्रमात मुंबई महापालिकेतील माफियाचं रावण दहन केलं. त्यामुळे काही संतप्त कार्यकर्त्यांनी सोमय्या आणि रावण दहन करणाऱ्या सामाजिक महिला कार्यकर्तीवर हल्ला करत मारहाण केली. यानंतर कार्यकर्त्यांच्या अटकेसाठी भाजप नेत्यांनी रात्री 12 वाजेपर्यंत ठिय्या आंदोलन केलं. यानंतर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार करत गुन्हा नोंदवण्यात आला आणि 5 जणांना अटक केली. किरण नांदे, निलेश सावंत, निलेश ठक्कर, सुनिल संतुगरे, किशोर भोईर अशी या कार्यकर्त्यांची नावं आहेत.