मुंबई: मुंबईत गेल्या सहा वर्षात आगीच्या तब्बल 29 हजार 140 घटना घडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांना मुंबई अग्निशमन दलाने ही माहिती दिली. मुंबईत 2012 ते एप्रिल 2018 पर्यंत एकूण 29 हजार 140 आगीच्या घटना घडल्या. यामध्ये तब्बल 300 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 925 जण आगीच्या दुर्घटनेत जखमी झाले आहे. आग विझवताना अग्निशमन दलाचे एकूण 120 अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले आहेत.

कोणत्या वर्षी आगीच्या किती घटना
मुंबईत 2012-2013 मध्ये एकूण 4756 आगीच्या घटना घडल्या. यामध्ये 62 जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये 44 पुरुष आणि 18 स्त्रियांचा समावेश आहे. या आगीत 177 जण जखमी झाले. यामध्ये अग्निशमन दलाच्या 13 अधिकारी /कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

2013-14
या वर्षात आगीच्या 4400 घटना घडल्या. त्यामध्ये 58 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये 39 पुरुष आणि 19 स्त्रीयांचा समावेश आहे. स्त्रियांचा समावेश आहे. या आगीत 141 जण जखमी झाले. यामध्ये अग्निशमन दलाच्या 29 अधिकारी /कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

2014-2015

मुंबईत 2014-15 मध्ये 4842 आगीच्या घटना घडल्या. त्यावेळी 20 पुरुष आणि 12 स्त्रियांसह एकूण 32 जणांचा मृत्यू झाला. तर 125 जण जखमी झाले होते.

2015-16
यावर्षी आगीच्या 5212 घटना घडल्या. यामध्ये 47 लोकांचा मृत्यू झाला. त्यात 34 पुरुष आणि 13 स्त्रियांचा समावेश आहे.

2016-17
2016-2017 मध्ये एकूण 5021 आगीच्या घटना घडल्या. यावेळी 18 पुरुष आणि 16 स्त्रियांसह 34 जणांचा मृत्यू झाला. तर 115 जण जखमी झाले.

2017-18
यंदा 4927 आगीच्या घटना घडल्या असून यामध्ये आतापर्यंत 55 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 37 पुरुष आणि 18 स्त्रियांचा समावेश आहे.

2018 एप्रिलपर्यंत 710 आगीच्या घटना घडल्या आहेत. यात 5 लोकांचा  मृत्यू झाला आहे.