एक्स्प्लोर

BMC Budget 2026: मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पातील 10 महत्त्वाच्या घोषणा, भाजपचा शहराचा कायापालट करण्याचा प्लॅन

BMC Budget 2026: मधल्या काळात महापालिका निवडणूका झाल्या नसल्यानं ४ वर्षांनंतर नव्या सत्ताधाऱ्यांचा हा पहिलाच अर्थसंकल्प असणार आहे.

मुंबई : मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प (BMC Budget 2026) आज सादर होत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी अंदाजपत्र सादर करण्यात आलं आहे. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांच्याकडे अर्थसंकल्प सादर केला आहे. २०२६-२७ वर्षासाठीचा ८०,९५२ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. मागच्या वर्षी ७४,४२७ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. मागच्या वर्षीपेक्षा यंदा ६,५२५ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. मधल्या काळात महापालिका निवडणूका झाल्या नसल्यानं ४ वर्षांनंतर नव्या सत्ताधाऱ्यांचा हा पहिलाच अर्थसंकल्प असणार आहे. 

 मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे

मुंबई महापालिकेला राज्य शासनाकडून येणे असलेली थकबाकी

महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील राज्य शासनाच्या अखत्यारितील विविध कार्यालयांकडून सहाय्यक अनुदान, मालमत्ता कर, इत्यादीपोटी ३१ जानेवारी २०२६ पर्यंत एकूण १०९४८.५८ कोटी इतके येणे आहे. यामध्ये, राज्य शासनाच्या शिक्षण खात्याकडून सहाय्यक अनुदानापोटी येणे असलेल्या ७२४१.४४ कोटी इतक्या रकमेचा समावेश आहे.

महापालिकेत महायुतीच्या सत्तेनंतर महापालिकेच्या महसुल वाढीसाठी प्रयत्न 

मुंबई महापालिका वन टाईम प्रीमियम पॉलिसी- सुधारीत एकवेळ अधिमुल्य धोरण राबवणार आहे. याअंतर्गत एफएसआय, टिडीआर, फंजीबल एफएसआय यापोटी घेतल्या जाणाऱ्या एक वेळ अधिमुल्यात वाढ, निवासी वापराकरता एक वेळ अधिमुल्य ५ % वरुन ७.५ % तर, अनिवासी वापरासाठी एकवेळ अधिमुल्य १० % वरुन १२.५ % वाढवण्यात आले आहे. 

४०x४० पेक्षा मोठ्या जाहिरात फलकांना बंदी; पदपथ व गच्चीवरील जाहिरातींनाही मनाई 

मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या नियमांनुसार ४० बाय ४० फुटांपेक्षा मोठे जाहिरात फलक लावण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. तसेच पदपथांवर आणि इमारतींच्या गच्चींवर जाहिरात फलक लावण्यासही मनाई करण्यात आली असून अशा प्रकारच्या जाहिरातींसाठी यापुढे कोणतीही नवी परवानगी दिली जाणार नाही. या निर्णयामुळे अनधिकृत आणि धोकादायक जाहिरात फलकांवर आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मुंबई महापालिकेकडून ग्रीन बॉन्डस् वितरीत केले जाणार

मुंबईतील विवीध मोठे प्रकल्प, पायाभूत सुविधा यांकरता निधी उभारण्याकरता गुंतवणूकदारांना आकर्षित करणारे ग्रीन बॉन्डस देण्यात येणार आहेत. एकाच वेळी निर्गमीत केलेल्या १००० कोटींच्या बॉन्डस करता केंद्राकडून १०० कोटींचे अनुदान मिळणार आहे.

मिठी नदीसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात २८६.२५ कोटींची तरतूद

मिठी नदीच्या रुंदीकरणाचे खोलीकरणाचे ९५ टक्के काम पूर्ण  झाले आहे. संरक्षक भिंती बांधण्याचे ९४.६० टक्के काम पूर्णत्वास गेले आहे. मिठी नदीच्या विकास आणि प्रदूषण नियंत्रणच्या आराखड्याची अमलबजावणी चार पॅकेजेस मध्ये राबविली जाणार आहे. यावर्षी मिठी नदीसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात २८६.२५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 

मुंबई महापालिकेकडून बेस्ट साठी १००० कोटी इतकी तरतूद

सन २०१२-१३ पासून सातत्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेने बेस्ट उपक्रमास जानेवारी २०२६ पर्यंत १२०२८.८१ कोटी इतक्या रकमेचे आर्थिक सहाय्य केले आहे. बेस्ट उपक्रमाची आर्थिक परिस्थिती विचारात घेता बेस्ट उपक्रमास अनुदान म्हणून सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये १००० कोटी इतकी तरतूद प्रस्ताविण्यात आली आहे.

मुंबई किनारी रस्ता (उत्तर) प्रकल्प आणि किनारी रस्त्यासाठी ४७०० कोटीची तरतूद

मुंबई किनारी रस्ता (उत्तर) प्रकल्प आणि किनारी रस्त्याचा अंतिम भाग या प्रकल्पांकासाठी सन २०२५-२६ च्या सुधारित अंदाजामध्ये ₹२१०० कोटी देण्यात आले होते, आता सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये ₹४७०० कोटी इतकी तरतूद प्रस्ताविण्यात आली आहे.

मुंबईत जवळपास एकूण 101 पुलाची कामे

मुंबई महानगर पालिकेने पूल बांधणीचे काम हाती घेतले आहे. मुंबईत जवळपास एकूण 101 पुलाची कामे हाती घेण्यात आली आहेत यापैकी 24 कामे पूर्ण झाली असून मार्च 2026 पर्यत 23 कामे पूर्ण होणार आहेत. 2026-27 मध्ये 31 कामे पूर्ण करण्यात येतील. 2028-29 मध्ये 23 पुलांची कामे मुंबई महानगर पालिका पूर्ण करणार आहे. नवीन पूल बांधणीसाठी पूल खात्यासाठी एकूण 9 हजार 650 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये कोस्टल रोडच्या 6 व्या टप्याचा समावेश आहे. वर्सोवा दहिसरच्या कोस्टल रोडसाठी एकूण 4 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. गोरेगाव मुलुंड लिंक रोड 2 हजार 650 कोटीची तरतूद 

मुंबईतील विविध महानगर पालिकेच्या विविध रुग्णालयांसाठी 1 हजार 62 कोटीची तरतूद

मुंबईतील विविध महानगर पालिकेच्या विविध रुग्णालयांसाठी 1 हजार 62 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये सायन हॉस्पिटल, राजावाडी हॉस्पिटल, नायर रुग्णालय, वांद्रे कर्करोग रुग्णालय यांच्यासह इतर रुग्णालयांचा समावेश आहे 

स्मार्ट वाहनतळ प्रकल्प उभारला जाणार

मुंबई महानगर पालिकेच्यावतीने स्मार्ट वाहनतळ प्रकल्प उभारला जाणार ऑन स्ट्रीट (on street) आणि ऑफ स्ट्रीट (off street) वाहनतळांची उभारणी PPP तत्वावर करणार आहे. यासाठी पालिकेच्या अर्थसंकल्पमध्ये 6875 कोटी रुपये तरतूद केली आहे. कोस्टल रोडच्या बाजूच्या जागेत मुंबई महानगर पालिका हरित पट्टा निर्माण करणार जवळपास 53 हेक्टर क्षेत्रावर उद्यान आणि विकास केला जाणार यासाठी 950 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 

महसुल वाढीसाठी महापालिकेची पॉलीसी 

महापालिका आपल्या महसुल निर्माण करणाऱ्या मालमत्तांचं मुद्रितीकरण करुन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट तयार करणार, या माध्यमातून महत्वाच्या भांडवली प्रकल्पांसाठी निधी उभारण्याचा मानस आहे.पायाभूत सुविधा गुंतवणूक ट्रस्ट (InvIT) द्वारे रस्ते, महानगरपालिका मंडई, वाहनतळ, व्यावसायिक जागा इत्यादी उत्पन्न देणाऱ्या पायाभूत मालमत्तांचे मालकत्व व संचलन करुन या माध्यमातून कर्ज न वाढवता किरकोळ तसेच संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून निधी उभारला जाईल. हा निधी नवीन मालमत्तेची खरेदी, विद्यमान कर्जाची परतफेड व प्रगतीपथावरील मोठे भांडवली प्रकल्प पूर्ण करण्यासाठी वापरण्यात येईल.

ऑक्टोबरपासून करमणूक कर लागु होणार

ऑक्टोबरपासून करमणूक कर लागु होणार आहे. महाराष्ट्र शासनाकडून करमणूक शुल्कातून दिलेली सूट ३० सप्टेंबरपर्यंतच लागू आहे.  त्यानंतर महापालिका करमणूक कर वसूल करणार आहेत. तर महाराष्ट्र शासनाकडे याकरता महापालिकेनं शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे.

महायुती सरकारचं नवीन फेरीवाला धोरण

अनधिकृत बांगलादेशी फेरीवाल्यांविरोधात मोहीम हाती घेतलेली असताच आता अधिकृत फेरीवाल्यांना ओळखण्यासाठी QR code आधारित प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यापुढे मुंबई महापालिका क्षेत्रातील अधिकृत फेरीवाल्यांना QR कोड आधारित प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधातली मोहीम तीव्र होणार आहे.

आरोग्य खात्यासाठी ७ हजार ४५६ कोटींची तरतूद

मुंबई महापालिकेच्या २०२६-२७ ची  अर्थसंकल्पात आरोग्य खात्यासाठी ७ हजार ४५६ कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. आरोग्य खात्याच्या महसुली तरतूद ही ५ हजार २३७.०९ कोटी तर भांडवली तरतूद ही २ हजार २१९. ७१ कोटी इतकी तरतूद प्रस्ताविण्यात आली आहे.

रस्ते सुरक्षेला प्राधान्य; डिजिटल जाहिरात फलकांसाठी नवीन नियमावली जाहीर 

 रस्ते सुरक्षा आणि वाहनचालकांना स्पष्ट दृश्य मिळावे, यासाठी डिजिटल जाहिरात फलकांबाबत नवीन धोरण निश्चित करण्यात आले आहे. या धोरणानुसार डिजिटल फलकांच्या प्रकाशमानाची मर्यादा ३:१ इतकी ठेवण्यात आली असून, लुकलुकणाऱ्या किंवा चमचमणाऱ्या जाहिरातींवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. वाहनचालकांचे लक्ष विचलित होऊ नये आणि अपघातांची शक्यता कमी व्हावी, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे. मात्र आधुनिक जाहिरात माध्यमांचा विचार करून काही ठिकाणी एलईडी जाहिरातींना परवानगी देण्यात आली आहे. मॉल्स, मल्टिप्लेक्स, शॉपिंग कॉम्प्लेक्स, व्यापारी संकुले तसेच पेट्रोल पंप येथे एलईडी जाहिरात फलक लावण्यास मान्यता देण्यात आली आहे.

तसेच, पेट्रोल पंप, रहदारीची प्रमुख ठिकाणे आणि टोल प्लाझा येथे २० बाय २० फूट आकाराचे जाहिरात फलक लावण्यास परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय, ३० बाय २० फूट आकाराच्या जाहिरात फलकांनाही मान्यता देण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. या नव्या नियमावलीमुळे रस्ते सुरक्षेला प्राधान्य देत आधुनिक जाहिरात माध्यमांना देखील संधी देण्याचा समतोल साधण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला आहे.

मुंबईकरांची पुलकोंडी सुटण्याची चिन्हं नाहीतच

मुंबई महानगर पालिकेने मुंबईतील तब्बल १०१  पूलांची बांधणी, दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत. यापैकी 24 कामे पूर्ण झाली आहे. मार्च 2026 पर्यत 23 कामे पूर्ण होणार आहेत. 2026-27 मध्ये 31 कामे पूर्ण करण्यात येतील. 2028-29 मध्ये 23 पुलांची कामे मुंबई महानगर पालिका पूर्ण करणार आहे. त्यामुळे, पुढील ३ वर्षेतरी मुंबईकरांची पुलकोंडीतून सुटका नाही. नवीन पूल बांधणीसाठी पूल खात्यासाठी एकूण 9 हजार 650 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

पर्यावरण आणि स्वच्छता अंतर्गत पर्यावरण व वातावरणीय बदल खात्याला १५९.८१ कोटी तरतूद

मुंबई महापालिकेत अर्थसंकल्पात पर्यावरण आणि स्वच्छता अंतर्गत पर्यावरण व वातावरणीय बदल खात्याला १५९.८१ कोटी इतकी तरतूद प्रस्ताविण्यात आलेली आहे. पर्यावरण व वातावरणीय बदलासाठी थेट दुप्पट निधीचे अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.  
२०२५-२६ मध्ये यासाठी ७६.१६ कोटीची तरतूद करण्यात आलेली होती. ही थेट १५९.८१ कोटींवर नेण्यात आलेली आहे. यात वायू प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजना, हवेची गुणवत्ता सुधारणे इत्यादी बाबींचा समावेश आहे. आयआयटी कानपूरच्या धर्तीवर मुंबईतील वायू प्रदूषणाचे हॉटस्पॉट ओळखणे,

- मुंबईत लो कॉस्ट सेन्सरचे नेटवर्क तयार करणार 
- ⁠यामुळे हायपरलोकल मॉनिटरिंग द्वारे मुंबई महानगरपालिकेला वायू प्रदूषण हॉटस्पॉट ओळखण्यास मदत 
- ⁠आयआयटी कानपूरने सादर केलेल्या मूल्यांकन अहवालानुसार वायू प्रदूषण रोखण्यास मदत 
- प्रकल्पाचे नाव MANAS ( mumbai air netwrok for advance sciences) 
- ⁠वायू प्रदूषण रोखण्यासाठी १५९.८२ कोटींची तरतूद

मुंबईच्या ट्रॅफीकवर कोट्यावधींच्या मल्टी-मॉडेल टनेल कनेक्टिव्हीटीचा उतारा

एक किमी करता ७३२ कोटी आणि एकूण ६ किमी करता ४३९२ कोटींचा मल्टी मॉडेल टनेल प्रकल्प उभारण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिकेने वाढत्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून मल्टी-मॉडेल भूमिगत बोगद्यांचे जाळे प्रकल्प प्रस्तावित केला आहे. बहुस्तरीय बोगद्यांचे जाळे विकसित केलं जाणार आहे. या बोगद्यांची आखणी एका स्तरावर वाहतूक आणि दुसऱ्या स्तरावर उपयुक्तता सेवा व मलनिःसारण प्रणाली अशाप्रकारे करण्यात आली आहे. यामुळे मुसळधार पावसाच्यावेळी मुंबईतील वाहतूकीची कोंडी टाळता येईल    
सदर कामाचा अंदाजित खर्च ६ कि.मी. करीता ₹४३९२ कोटी (प्रति कि.मी. अंदाजे १७३२ कोटी) इतका असून कंत्राट कालावधी ६६ महिने इतका आहे.

सर्वसामान्यांच्या आयुष्यातील महत्वाचे अन् प्रभाव टाकणारे मुद्दे

- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाच्या माध्यमातून आतापर्यत 1.35 कोटी नागरिकांनी लाभ घेतला आहे. यामध्ये बदल करून आपला दवाखानाच्या माध्यमातून मधुमेह आणि नेत्ररोगाकरिता AI द्वारे मोफत उपचार केले जाणार आहे
- भारतीय जनगणना 2027 ला दोन टप्यात केली जाणार पहिला टप्पा एप्रिल ते सप्टेंबर 2026 दुसरा टप्पा फेब्रुवारी 2027, ही जनगणना पूर्णतः डिजिटल स्वरूपात केली जाणार आहे.
- 2026-27 च्या अर्थसंकल्पात आरोग्य खात्यासाठी 5237 कोटी प्रस्तावित 
- मुंबईतील वाढत प्रदूषण पाहता पालिकेकडून पर्यावरण आणि स्वच्छतेसाठी भरीव तरतूद, अर्थसंकल्पमध्ये एकूण 159.82 कोटींची तरतूद
- देवनार येथे कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प जुन 2026 पर्यत सुरु होणार
- मुंबई महानगर पालिकेकडून मुंबईत प्लास्टिक आणि थर्माकोल बंदी असून 2025 या वर्षात महानगर पालिकेने एकूण 5962 किलो प्लास्टिक आजी थर्मकोल जप्त केला आहे 
- प्रजन्य जलवाहिनेच्या विकासाकरिता 1800 कोटीची तरतूद 
- मोठ्या इमारतीमधील आग विझवण्यासाठी 5 हाय राईज फायर फायटिंग वाहने खरेदी केली जाणार आहे
- मुंबई अग्निशमन दलासाठी 230.90 कोटीची तरतूद 
- आपत्कालीन व्यवस्थापन खात्यासाठी 46.67 कोटीची तरतूद 
- माहिती तंत्रज्ञान खात्यासाठी 44.88 कोटीची तरतूद करण्यात आली आहे यामध्ये AI चा देखील समावेश आहे
- AI (कृत्रिम बुद्धीमत्ता) Coach - माहिती तंत्रज्ञान खात्यामार्फत भविष्यातील कृत्रिम बुद्धिमत्ता संचलित प्रणालीच्या दिशेने एक पाऊल म्हणून AI Coach उपक्रम सुरु करण्यात आला आहे....
- बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध सेवांच्या ऑनलाईन अर्जासंबंधी नागरिकांना सुलभता प्रदान करण्याकरिता BMC Citizen AI Coach हा डिजिटल वॉकथूद्वारे मार्गदर्शन करेल.
- तसेच, BMC Employee AI Coach विकसित करण्यात येणार असून त्याद्वारे कामाच्या स्वरुपानुसार, बृहन्मुंबई महानगरपालिकेतील वापरात असलेल्या विविध माहिती तंत्रज्ञानावर आधारीत प्रणालींचे स्वतः शिक्षण घेण्याकरिता व प्रणालींबाबतच्या समस्यांचे निवारण करण्यास मदत म्हणून कर्मचाऱ्यांची प्रत्यक्ष कार्यक्षमता वृद्धींगत करण्याच्या उद्देशाने डिजिटल वॉकथ्रूद्वारे मार्गदर्शन करेल.

पाण्याची मागणी आणि पुरवठ्यामधील तफावत दूर करण्यासाठी पाणीपुरवठ्यात वाढ

 मनोर येथे प्रतिदिन 200 दशलक्ष लिटर क्षमतेचा निकषारीकरण प्रकल्प - 026-27 साठी 500 कोटींची तरतूद मनोरी निकषाधिकरण प्रकल्पाते चारकोप व पुढे महावीर नगर कांदिवली दरम्यान उंदन केंद्र बोगद्याचे बांधकाम - 026 -027 साठी 270 कोटींची तरतूद 
भांडुप संकुल येथे नवीन 2010 लिटर प्रति दिन क्षमतेचे शुद्ध पाणी उंदन केंद्र विकसित करण्यासाठी आरेखन बांधकाम आणि प्रचालन या तत्त्वावर स्थापत्य यांत्रिकी विद्युत उपकरणाची कामे - 026-027 साठी  250 कोटींची तरतूद 
गुंदवली जल बोगद्याच्या उपकापासून वाईट जंक्शन जवळील दोन पर्यंत तीन हजार मिनी व्यासाच्या नवीन जलवाहिनीचा आराखडा व बांधकाम - 026-027 साठी 1100 कोटींची तरतूद 
वर्सोवा येथे प्रतिदिन 200 दशलक्ष लिटर क्षमतेच्या निशारीकरण प्रकल्प  - 0.25 कोटी तरतूद 
नवीन तुळशी जलशुद्धीकरण केंद्र बांधण्याकरिता सल्लागाराची नियुक्ती  - 0.50 कोटीची तरतूद 
उदंचन केंद्र पिसे पांजरापूर येथे कार्यव्यवस्थापन प्रणाली कार्यान्वित - 26.75 कोटीची तरतूद

प्रगतीपथावरील कामे

 गारगाई प्रकल्प - 437.51 कोटी 
 कुलाबा येथील मलजल प्रक्रिया केंद्र जलशुद्धीकरण प्रकल्प - 30 कोटीची तरतूद 
हेडगेवार उद्यान(अमरमहल) ढवन उद्यान(वडाळा) जल बोगद्याचे बांधकाम (परेल) - 60 कोटीची तरतूद 
हेडगेवार उद्यान ट्रॉम्बे निमस्तर जलाशय जल बोगदा बांधणे  - 25 कोटींची तरतूद 
येवई महासंतुलन जलाशय ते कशेळीदरम्यान जल बोगद्याचा आराखडा - 790 कोटींची तरतूद 
कशेळी ते मुलुंड पर्यंत चल बोगद्याचे बांधकाम - 640 कोटींची तरतूद 
घाटकोपर मूलचलप्रक्रिया सुविधा केंद्र धारावी मलजल प्रक्रिया सुविधा केंद्र पवई ते घाटकोपर जलाशया दरम्यान जल बोगद्याचे बांधकाम मांजरापुर येथे प्रतिदिन 910 दशलक्ष लिटर क्षमतेचा नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प भांडुप संकुल येथील विद्युत उपकरणाची कामे अशा विविध प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात तरतूद 
पाणीपुरवठा प्रकल्प खात्यासाठी 2025 26 च्या अर्थसंकल्पीय अंदाज 4800 कोटी
2026 27 च्या अर्थसंकल्पी अंदाज 6,475 कोटींची तरतूद

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
अमेरिकेचे नेतेही सांगतात, जगात संघर्ष थांबवण्याची क्षमता मोदींमध्ये; देवेंद्र फडणवीसांनी दिलं उदाहरण
अमेरिकेचे नेतेही सांगतात, जगात संघर्ष थांबवण्याची क्षमता मोदींमध्ये; देवेंद्र फडणवीसांनी दिलं उदाहरण
गेल्या सहा महिन्यांच्या तुलनेत सर्वाधिक सिलेंडर मार्च महिन्यात उपलब्ध; पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी दिली माहिती
गेल्या सहा महिन्यांच्या तुलनेत सर्वाधिक सिलेंडर मार्च महिन्यात उपलब्ध; पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी दिली माहिती
Mumbai News: डॉक्टर ऑपरेशनसाठी आल्याच नाहीत; फोनाफोनी, शोध अन् रुग्णालयात धावाधाव, त्यांच्या केबिनमध्ये पाहिलं, जमिनीवर पडलेला मृतदेह, मुंबईतील घटना
डॉक्टर ऑपरेशनसाठी आल्याच नाहीत; फोनाफोनी, शोध अन् रुग्णालयात धावाधाव, त्यांच्या केबिनमध्ये पाहिलं, जमिनीवर पडलेला मृतदेह, मुंबईतील घटना
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCL Pune labrotary : पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचं मोठं संशोधन, एलपीजीला पर्यायी इंधन शोधलं
Sangli News : IPS झालेल्या आटपाडीच्या सुपुत्राची हत्तीवरून वाजतगाजत मिरवणूक, पडळकरांनी वाटली साखर
Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
कागलमध्ये ₹357.99 कोटींचा सर्व्हिस रोडसह 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा; सीएम फडणवीस म्हणाले, कोल्हापूरच्या विकासाला नवे पंख
कागलमध्ये ₹357.99 कोटींचा सर्व्हिस रोडसह 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा; सीएम फडणवीस म्हणाले, कोल्हापूरच्या विकासाला नवे पंख
200 रुपये द्या, सिलेंडर देतो; बीडमधील गॅसटंचाईत ग्राहकांकडून पैशांची लूट, एबीपी माझाचं स्टिंग ऑपरेशन
200 रुपये द्या, सिलेंडर देतो; बीडमधील गॅसटंचाईत ग्राहकांकडून पैशांची लूट, एबीपी माझाचं स्टिंग ऑपरेशन
विश्वचषक ट्रॉफीसह गौतम गंभीर अन् सूर्या सिद्धिविनायक मंदिरात, कर्णधाराने उंदीरमामाच्या कानात काय मागितलं?
विश्वचषक ट्रॉफीसह गौतम गंभीर अन् सूर्या सिद्धिविनायक मंदिरात, कर्णधाराने उंदीरमामाच्या कानात काय मागितलं?
Iran : अमेरिकेनं रशियन तेलाची आयात नको यासाठी महिने घालवले, आता रशियाचं तेल घ्या म्हणून भारतासह जगाला विणवण्या, इराणच्या विदेश मंत्र्यांचं ट्रम्प यांच्या वर्मावर बोट
अमेरिका भारतासह जगाला रशियन तेल खरेदीसाठी विणवण्या करतेय, इराणच्या विदेश मंत्र्यांचा हल्लाबोल
इकडं इराणचा संयुक्त अरब अमिरातीला गर्भित इशारा अन् तिकडं लेबनॉन-इस्रायल युद्ध थांबवण्यासाठी युरोपमधून पहिला आवाज; थेट मध्यस्थीची तयारी दाखवत ठिकाण सांगितलं, तोडगा निघणार?
इकडं इराणचा संयुक्त अरब अमिरातीला गर्भित इशारा अन् तिकडं लेबनॉन-इस्रायल युद्ध थांबवण्यासाठी युरोपमधून पहिला आवाज; थेट मध्यस्थीची तयारी दाखवत ठिकाण सांगितलं, तोडगा निघणार?
पीएम मोदींच्या रॅलीपूर्वी बंगालमध्ये भाजप आणि टीएमसीचे कार्यकर्ते भिडले; एकमेकांवर तुफान दगडफेक
पीएम मोदींच्या रॅलीपूर्वी बंगालमध्ये भाजप आणि टीएमसीचे कार्यकर्ते भिडले; एकमेकांवर तुफान दगडफेक
Embed widget