Mumbai Rain Updates : मुंबईत काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. पश्चिम उपनगरात मागील अर्धा तासापासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. यात पश्चिम उपनगरात अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव मालाड, कांदिवली, बोरीवली, विलेपार्ले, सांताक्रुज,वांद्रे परिसरात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. परिणामी, पुढील काही तास जर असच जोरदार पाऊस काही वेळ सुरू राहिला तर पश्चिम उपनगरात जे सखल भाग आहे त्या ठिकाणी पाणी भरायला सुरुवात होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (Maharashtra Weather Update)

Continues below advertisement

पुढील 48  तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

दरम्यान, पुढील 48  तासांत मुंबईत अधिक पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभाग (IMD) वर्तवली आहे . या काळात मुंबईच्या अनेक भागात वादळी वारा आणि विजेच्या गडगडाटासह पावसाचा जोर वाढण्याची शक्यता शक्यता आहे. तर सध्या काही शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे, अनेक प्रमुख मार्गांवर पाणी साचले होते.  ज्यामुळे मुंबईतील प्रमुख मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालीय. या आठवड्याच्या सुरुवातीलाच मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे देखील पाण्याखाली गेला होता. त्यामुळे सार्वजनिक सुरक्षेसाठी तो तात्पुरता बंद करण्यात आला होता. अशातच पुढील 48 तासांत मुंबईत पावसाचा जोर हळूहळू वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने नागरिकांनी वेळीच खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Continues below advertisement