एक्स्प्लोर

मुंबईत 23 मतदान कक्षात मतमोजणी होणार, 23 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती, कोणत्या प्रभागाची कुठे होणार मतमोजणी? 

सकाळी 10 वाजल्यापासून विविध ठिकाणच्‍या 23 मतमोजणी कक्षात मतमोजणी होणार आहे. महानगरपालिका कार्यक्षेत्रातील एकूण 227 निवडणूक प्रभागांकरिता एकूण 23 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलीय.

Mumbai Municipal Corporation Election Result :  बृहन्‍मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 अंतर्गत आज 15 जानेवारीला झालेल्या मतदानाची मतमोजणी प्रक्रिया उद्या शुक्रवार दिनांक 16 जानेवारीला पार पडणार आहे. सकाळी 10 वाजल्यापासून विविध ठिकाणच्‍या 23 मतमोजणी कक्षात मतमोजणी होणार आहे. महानगरपालिका कार्यक्षेत्रातील एकूण 227 निवडणूक प्रभागांकरिता एकूण 23 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

मतमोजणीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी पोलीस विभागाशी समन्वय 

मतमोजणी प्रक्रियेकरिता प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय अंतर्गत अभिरक्षा कक्ष (Strong Room) व मतमोजणीची ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. या सर्व ठिकाणांना सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), पोलिस खात्‍याकडून आवश्यक ती मान्यता प्राप्त झाली आहे. मतमोजणी केंद्रांची रचना व नियोजन, टेबल मांडणी, अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक, सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही यंत्रणा, तसेच अग्निशमन व वैद्यकीय सुविधा यांचा सविस्तर आढावा घेऊन त्याबाबतचा तपशील अंतिम करण्यात आला आहे. मतमोजणीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी पोलीस विभागाशी समन्वय साधण्यात आला आहे. आवश्यक सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे

मतमोजणीसाठी 759 पर्यवेक्षक आणि 770 सहायक यांच्‍यासह 770 चतुर्थश्रेणी कर्मचारी नियुक्त

मतमोजणीसाठी 759 पर्यवेक्षक आणि 770 सहायक यांच्‍यासह 770 चतुर्थश्रेणी कर्मचारी यांची नियुक्त करण्यात आली आहे. मतमोजणी अधिकारी, पर्यवेक्षक व सहाय्यक कर्मचाऱ्यांना पूर्व प्रशिक्षण देण्यात आले आहे. मतमोजणी केंद्र परिसरात वाहतूक नियंत्रण, वाहनतळ व्यवस्था तसेच प्रसारमाध्यमांसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आले आहेत. निकाल जाहीर करताना अचूकता व पारदर्शकता राखण्यासाठी संगणकीय प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे.

कोणत्या प्रभागाची मतमोजणी कुठे होणार मतमोजणी? 

१. आर उत्तर विभाग : प्रभाग क्रमांक १ ते ८ करिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्रीमती शीतल देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे निवडणूक मत्तमोजणी कक्ष बृहन्मुंबई महानगरपालिका मंडई तळघर, रूस्तमजी संकूल, जयवंत सावंत मार्ग, दहिसर (पश्चिम) मुंबई - ४०० ०६८ येथे आहे,

२. आर मध्य विभाग : प्रभाग क्रमांक ९ ते १८ करिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्रीमती गितांजली शिर्के यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे निवडणूक मतमोजणी कक्ष नागरी प्रशिक्षण संस्था व संशोधन केंद्र, अभिनव नगर, नॅशनल पार्कजवळ, बोरीवली (पूर्व), मुंबई ४०० ०६६ येथे आहे.

३. आर दक्षिण विभाग : प्रभाग क्रमांक १९ ते ३१ करिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री. सचिन गिरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे निवडणूक मतमोजणी कक्ष बजाज महानगरपालिका शाळा, बजाज मार्ग, कांदिवली (पश्चिम) मुंबई ४०० ०६७ येथे आहे.

४. पी उत्तर विभाग प्रभाग क्रमांक ३२ ते ३५ व प्रभाग क्रमांक ४६ ते ४९ करिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री. विकास सूर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे निवडणूक मतमोजणी कक्ष मुंबई पब्लिक स्कूल (सीबीएसई), मालवणी टाऊनशीप मालाड मार्वे रस्ता. अस्मिता ज्योती हौसिंग सोसायटी समोर, मालाड (पश्चिम) मुंबई ४०० ०९५ येथे आहे.

५. पी पूर्व विभाग: प्रभाग क्रमांक ३६ ते ४५ करिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री. दयालसिंह ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे निवडणूक मतमोजणी कक्ष कुरार गाव, मुंबई पब्लिक स्कूल संकुल, शांताराम तलावाजवळ, कुरार गाव, मालाड (पूर्व) मुंबई ४०० ०९७ येथे आहे.

६. पी दक्षिण विभाग प्रभाग क्रमांक ५० ते ५८ करिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री. जयराम पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे निवडणूक मतमोजणी कक्ष उन्नत नगर महानगरपालिका शाळा, उन्नत नगर, क्रमांक २. वाहतूक पोलिस विभागाजवळ, गोरेगाव (पश्चिम) मुंबई ४०० १०४ येथे आहे.

७. के पश्चिम विभाग प्रभाग क्रमांक ५९ ते ७१ करिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री. प्रशांत ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे निवडणूक मतमोजणी कक्ष शहाजी राजे भोसले क्रीडा संकुल, तळमजला, बॅडमिंटन हॉल, अंधेरी (पश्चिम) मुंबई- ४०० ०५३ येथे आहे.

८. के उत्तर विभाग प्रभाग क्रमांक ७२ ते ७९ तसेच के पूर्व विभाग प्रभाग क्रमांक ८०,८१,८६ करिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री. राजीव शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे निवडणूक मतमोजणी कक्ष गुंदवली महानगरपालिका शाळा, बिमा नगर, नटराज स्टुडिओच्या मागे, अंधेरी कुर्ला मार्ग, अंधेरी (पूर्व) मुंबई- ४०० ०६९ येथे आहे.

९. के पूर्व विभाग प्रभाग क्रमांक ८२ ते ८५, एच पश्चिम विभाग प्रभाग क्रमांक ९७ ते १०२ करिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री. प्रशांत ढगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे निवडणूक मतमोजणी कक्ष प्रशासकीय इमारत, तळमजला, एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ, जुहूतारा मार्ग, सांताक्रुझ (पश्चिम), मुंबई ४०० ०४९ येथे आहे.

१०. एच पूर्व विभाग : प्रभाग क्रमांक ८७ ते ९६ करिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री. गजेंद्रकुमार पाटोळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे निवडणूक मतमोजणी कक्ष प्रभात कविवर्य कुसुमाग्रज मराठी भाषा आणि साहित्य भवन इमारत, मुंबई विद्यापीठ, कलिना, विद्यानगरी, सांताक्रुझ (पूर्व), मुंबई-४०० ०९८ येथे आहे.

११. टी विभाग: प्रभाग क्रमांक १०३ ते १०८, एस विभाग प्रभाग क्रमांक १०९, ११०, ११३ आणि ११४ करिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्रीमती उज्वला भगत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे निवडणूक मतमोजणी कक्ष बॅडमिंटन कोर्ट, प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकूल, महाकवी कालिदास नाट्यगृहाच्या मागे, पु. सौ. मार्ग, मुलुंड (पश्चिम), मुंबई- ४०० ०८० येथे आहे.

१२. एस विभाग प्रभाग क्रमांक १११, ११२, ११५ ते १२२ करिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्रीमती वैशाली ठाकूर परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे निवडणूक मतमोजणी कक्ष सेंट झेवियर हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, लाल बहादूर शास्त्री मार्ग, कांजूरमार्ग (पश्चिम), मुंबई -४०० ०७८ येथे आहे.

१३. एन विभाग : प्रभाग क्रमांक १२३ ते १३३ करिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री. बाळासाहेब खांडेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे निवडणूक मतमोजणी कक्ष पंतनगर महापालिका शाळा क्रमांक ०३, पंतनगर, घाटकोपर (पूर्व), मुंबई ४०० ०७५ येथे आहे.

१४. एम पूर्व विभाग: प्रभाग क्रमांक १४५ ते १४८, एम पश्चिम विभाग प्रभाग क्रमांक १४९ ते १५५ करिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्रीमती प्रियंका पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे निवडणूक मतमोजणी कक्ष बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग, कलेक्टर कॉलनी, महानगरपालिका शाळा संकुल, शिवशक्ती नगर, आर. सी. मार्ग, चेंबूर, मुंबई ४०० ०७४ येथे आहे.

१५. एम पूर्व विभाग प्रभाग क्रमांक १३४ ते १४४ करिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्रीमती स्नेहा उबाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे निवडणूक मतमोजणी कक्ष तळमजला, महानगरपालिका प्रसुतीगृह व रुग्णालय (नवीन इमारत), लल्लुभाई कंपाऊंड, हिरानंदानी आकृती इमारत क्रमांक २६ वी च्या समोर, मानखुर्द, मुंबई- ४०० ०४३ येथे आहे.

१६. एल विभाग : प्रभाग क्रमांक १५६ ते १६२ आणि १६४ करिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री. रविंद्र बोंबले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे निवडणूक मतमोजणी कक्ष नेहरू नगर महानगरपालिका शाळा, नेहरू नगर, केदारनाथ मंदिर मार्ग, कुर्ला (पूर्व), मुंबई- ४०० ०२४ येथे आहे.

१७. एल विभाग: प्रभाग क्रमांक १६३, १६५ ते १७१ करिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्रीमती रोहिणी फडतरे आखाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे निवडणूक मतमोजणी कक्ष शिवसृष्टि कुर्ला कामगार, महानगरपालिका शाळा संकुल, एस.टी. आगारासमोर, नेहरु नगर, कुर्ला (पूर्व), मुंबई- ४०० ०२४ येथे आहे.

१८. एफ उत्तर विभाग प्रभाग क्रमांक १७२ ते १८१ करिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री. प्रशांत पानवेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे निवडणूक मतमोजणी कक्ष नवीन महानगरपालिका शाळा, जैन सोसायटी, प्लॉट क्रमांक १६० / १६१, वल्लभदास मार्ग, सायन (पूर्व), मुंबई- ४०० ०२२ येथे आहे.

१९. जी उत्तर विभाग प्रभाग क्रमांक १८२ ते १९२ करिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री, अजित नैराले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे निवडणूक मतमोजणी कक्ष डॉ. ऍन्टोनियो दा सिल्या हायस्कूल ऍन्ड ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स, एस. के. बोले मार्ग, कबुतरखाना जवळ, दादर (पश्चिम) मुंबई ४०० ०२८ येथे आहे.

२०. जी दक्षिण विभाग प्रभाग क्रमांक १९३ ते १९९ करिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्रीमती वर्षाराणी भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे निवडणूक मतमोजणी कक्ष बृहन्मुंबई महानगरपालिका वरळी अभियांत्रिकी संकुल, तळमजला, डॉ. अॅनी बेझंट रोड, वरळी, मुंबई ४०० ०१८ येथे आहे.

२१. एफ दक्षिण विभाग प्रभाग क्रमांक २०० ते २०६ करिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री. अभिजीत भांडे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे निवडणूक मतमोजणी कक्ष पहिला मजला, पोलीस संकुल हॉल, दादर नायगाव, मुंबई ४०००१२ येथे आहे.

२२. डी विभाग प्रभाग क्रमांक २१४ ते २१९ व सी विभाग प्रभाग क्रमांक २२० ते २२२ करिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री. बाळासाहेब वाकचौरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे निवडणूक मतमोजणी कक्ष विल्सन महाविद्यालय, नेताजी सुभाषचंद्र मार्ग, गिरगाव चौपाटी, सीफेस रोड, मुंबई - ४०० ००७ येथे आहे.

२३. ई विभाग प्रभाग क्रमांक २०७ ते २१३. बी विभाग प्रभाग क्रमांक २२३.२२४ आणि ए विभाग : प्रभाग क्रमांक २२५ ते २२७ करिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री. कृष्णा जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे निवडणूक मतमोजणी कक्ष रिचर्डसन ऍन्ड क्रुडास कंपनी प्रायव्हेट लिमिटेड, सर जे. जे. रोड, व्ह्युम हायस्कुल शेजारी, भायखळा, मुंबई ४०० ००८ येथे आहे.

About the author अजय माने

अजय माने
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking LIVE: बेरोजगार तरुणांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्रात 29 सप्टेंबरला ‘विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ'चं आयोजन
Maharashtra Breaking LIVE: बेरोजगार तरुणांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्रात 29 सप्टेंबरला ‘विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ'चं आयोजन
ABP Majha Top 10, 12 September 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा - Afternoon
ABP Majha Top 10, 12 September 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा - Afternoon
Laxman Hake on Manoj Jarange : जरांगे तुझी नौटंकी फार झाली; तीन वर्ष महाराष्ट्र तुला सहन करतोय आता बास..., लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगेंना इशारा, म्हणाले, 'मीही मेंढपाळाचा पोर...'
जरांगे तुझी नौटंकी फार झाली; तीन वर्ष महाराष्ट्र तुला सहन करतोय आता बास..., लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगेंना इशारा, म्हणाले, 'मीही मेंढपाळाचा पोर...'
S Sreesanth Father Dies : क्रिकेटपटू श्रीसंतचा खंदा आधार हरपला, वडिलांचे निधन, 89व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
क्रिकेटपटू श्रीसंतचा खंदा आधार हरपला, वडिलांचे निधन, 89व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

व्हिडीओ

Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report
Pune Fake Khawa : भेसळखोरीचा खवा, मुंढेजी धडा शिकवा Special Report
Navi Mumbai MPSC Mahendra Harpalkar News : MPSC सचिवांना काळं फासलं,संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका
Nitin Gadkari On Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्ग १६-१७ वर्षे रखडल्याबद्दल लाज वाटते, उद्घाटनाला जाणार नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Laxman Hake on Manoj Jarange : जरांगे तुझी नौटंकी फार झाली; तीन वर्ष महाराष्ट्र तुला सहन करतोय आता बास..., लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगेंना इशारा, म्हणाले, 'मीही मेंढपाळाचा पोर...'
जरांगे तुझी नौटंकी फार झाली; तीन वर्ष महाराष्ट्र तुला सहन करतोय आता बास..., लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगेंना इशारा, म्हणाले, 'मीही मेंढपाळाचा पोर...'
EPF Advance New Rules: पीएफ खात्यातून ॲडव्हान्स म्हणून किती वेळा पैसे काढता येणार? ईपीएफओकडून नव्या नियमांची अपडेट जारी
पीएफ खात्यातून ॲडव्हान्स म्हणून किती वेळा पैसे काढता येणार? ईपीएफओकडून नव्या नियमांची अपडेट जारी
Bachchu Kadu : निसर्गाच्या कुशीत फिरले, खाण्याचाही आनंद लुटला, सह्याद्रीच्या कुशीत बच्चू कडूंचा साहसी अनुभव; लिंग्या वॉटरफॉलवर केले वॉटरफॉल रॅपलिंग
निसर्गाच्या कुशीत फिरले, खाण्याचाही आनंद लुटला, सह्याद्रीच्या कुशीत बच्चू कडूंचा साहसी अनुभव; लिंग्या वॉटरफॉलवर केले वॉटरफॉल रॅपलिंग
Crime News : हॉटेल रूममध्ये सापडला ब्युटिशियनचा मृतदेह, ती आल्यानंतर एक व्यवसायिक आला अन्...., 40 मिनिटांमध्ये नेमकं काय घडलं?
हॉटेल रूममध्ये सापडला ब्युटिशियनचा मृतदेह, ती आल्यानंतर एक व्यवसायिक आला अन्...., 40 मिनिटांमध्ये नेमकं काय घडलं?
Manoj Jarange Patil and Chandrashekhar Bawankule: मनोज जरांगेंच्या भूमिकेपेक्षा दुष्काळाचा मुद्दा महत्त्वाचा, गणेशोत्सवात मुंबईला आंदोलन करु नये: चंद्रशेखर बावनकुळे
मनोज जरांगेंच्या भूमिकेपेक्षा दुष्काळाचा मुद्दा महत्त्वाचा, गणेशोत्सवात मुंबईला आंदोलन करु नये: चंद्रशेखर बावनकुळे
Rohit Pawar on MPSC Paper Leak: एमपीएससी पेपरफुटीत सरकारच्या जवळच्या लोकांचा संबंध, रोहित पवारांचा धक्कादायक आरोप
एमपीएससी पेपरफुटीत सरकारच्या जवळच्या लोकांचा संबंध, रोहित पवारांचा धक्कादायक आरोप
Congress Ratnakar Mahajan Passes Away: मोठी बातमी: काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचं पुण्यात निधन
मोठी बातमी: काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचं पुण्यात निधन
रिटायरमेंट अवघ्या 5 दिवसांवर असताना IAS अधिकाऱ्याविरोधात ACB कडून गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल!
रिटायरमेंट अवघ्या 5 दिवसांवर असताना IAS अधिकाऱ्याविरोधात ACB कडून गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल!
Embed widget