Mumbai Metro 3 Update : एका बाजूला महायुती सरकारला 100 दिवस पूर्ण होत आहेत. तर दुसऱ्या बाजूला मुंबईकरांना सरकारकडून आणखीन एका मेट्रोच्या टप्प्याचे गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. 10 एप्रिल ते 15 एप्रिलच्या दरम्यान एक्वा लाईन म्हणजेच मेट्रो-3 मार्केटच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या या मेट्रो तीनच्या दुसऱ्या टप्प्याचे अंतिम टप्प्यातील काम सुरू आहे. पुढच्या आठवड्यात या दुसऱ्या टप्प्याचे सीएमआरएस इन्स्पेक्शन होण्याची शक्यता आहे. ते झाल्यानंतर या मेट्रोच्या लोकार्पणाचा दिवस निश्चित करण्यात येईल. अशीही माहिती पुढे आली आहे.
दरम्यान, उर्वरित फायर एनओसी आणि सीएमआरएस सर्टिफिकेट लवकरात लवकर मिळावे, यासाठी एम एम आर सी प्रशासन जोरदार प्रयत्न करत आहे. दोन्ही प्रमाणपत्र वेळेत मिळाल्यास 10 ते 15 एप्रिल च्या दरम्यान दुसरा टप्पा कार्यान्वित केला जाईल. हा दुसरा टप्प्यात बीकेसी ते आचार्य अत्रे चौकापर्यंत भूमिगत मेट्रो धावेल. बीकेसीसोडून सहा स्थानके आहेत, यामध्ये धारावी, शितलादेवी, दादर, सिद्धिविनायक मंदिर, वरळी आणि आचार्य अत्रे चौक अशी स्थानके आहेत. भूमिगत मेट्रोचा दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर मध्य मुंबईला एक महत्त्वाचा वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. सर्वाधिक वाहतूक कोंडी आणि ब्रिटिश कालीन रस्ते असलेल्या या भागात रस्त्यावरचा भार हलका होईल. त्यामुळे या मार्ग लवकरात लवकर तयार व्हावा, अशी अपेक्षा आता मुंबईकरांकडून केली जात आहे.
...तर आपण स्वतः हातोडा घेऊन या मशिदी जवळ येऊ- किरीट सोमय्या
भांडुपच्या एलबीएस मार्गावर असलेल्या सुन्नी कादरिया मशिदीचे बांधकाम हे अनधिकृत असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच या मशिदीचे पदाधिकारी शेजारीच असलेल्या ग्रेट ईस्टर्न गार्डन सोसायटीच्या नागरिकांना आम्ही सोसायटी समोर आता नमाज पडू असे धमकावत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. यासाठी आज शुक्रवारी नमाज वेळी किरीट सोमय्या हे या मशिदीच्या स्थळावर आले आणि त्यांनी येथील जागेची पुन्हा एकदा पाहणी केली.
जर या ठिकाणी पालिका प्रशासनाने कार्यवाही केली नाही, तर पुढच्या पंधरा दिवसात आपण स्वतः हातोडा घेऊन या मशिदी जवळ येऊ असा इशाराच किरीट सोमय्या यांनी पालिका कर्मचाऱ्यांना दिला आहे. दरम्यान किरीट सोमय्या हे मशीद परिसरात येत असल्यामुळे या ठिकाणी पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता.
हे ही वाचा
