Mumbai Maratha Morcha : मुंबईत सुरु असलेल्या मराठा आंदोलकांसाठी जेवण घेऊन जाणाऱ्या गाड्या पोलीस अधिकाऱ्याने अडवल्याने जतचे माजी आमदार विक्रम सावंत (Vikram Sawant) आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये वादावादी झाल्याचा प्रकार घडलाय. अटल सेतूवर हा प्रकार घडला असून या वादावादीचा व्हिडिओ आता समोर आलाय. या व्हिडीओत मुंबईत मराठा आंदोलकांना जेवण घेऊन जाणाऱ्या गाड्या का अडवत आहात? असा सवाल विक्रम सावंत संबंधित पोलीस अधिकाऱ्याला करत आहेत. यावेळी दोघांमध्ये प्रचंड वादावादी देखील झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. शेवटी पोलीस अधिकाऱ्यांने जेवण घेऊन जाणाऱ्यांना सोडल्याने हा वाद मिटला. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या मराठा आंदोलकासाठी राज्यभरातून जेवण पोचवले जात आहे. अशातच या गाड्यांची अडवणूक केल्याने आंदोलकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

Continues below advertisement

मराठा आंदोलकांसाठी मुंबईकर सरसावले

राज्याच्या कानाकोपऱ्यातून मुंबईत दाखल झालेल्या मराठा आंदोलकांचे आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशीही हाल होत असल्याचे चित्र समोर येत होते. मात्र आता या बाहेरून आलेल्या आंदोलकांसाठी मुंबईकर सरसावले आहेत, स्थानिक मराठा बांधव स्वतःहून नाश्ता, जेवण बनवून या मराठा आंदोलकांना देत आहेत. अनेक ठिकाणी बॅनर लावून, सोशल मीडियावर संदेश पाठवून एक भाकरी, ठेचा, वरण भात घेऊन येण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मानखुर्द येथे असेच चित्र दिसून येत आहे. स्थानिकांनी चहा आणि पोहे बनवले आहे आणि मराठा आंदोलकांना देत आहेत.

.....अन् मनोज जरांगे पाटील भडकले

रात्री सुमारे 2 वाजता एक संशयित वेक्ती मनोज जरांगे पाटील यांचा व्हिडीओ काढत होता. यावरून जरांगे पाटील त्यावर वैतागले आणि हा माणूस कोण आहे? याचा तपास घ्या, असे आपल्या कार्यकर्त्याना आदेश दिले. त्यावेळी तो वेक्ती नशेत होता, असे समजले आणि मी ही कार्यकर्ता आहे, असे त्यांनी सांगितले. परंतु असे कार्यकर्ते आमचे नाहीत, असे ठणकावून जरांगे यांनी सांगितले. तर पोलीस कुठे आहेत? असा सवाल जरांगे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना विचारला असता त्यावेळी एकही पोलीस मंडपात दिसला नाही आणि या घटनेनंतर ही पोलीस मंडपात फिरकले नाहीत. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय.

Continues below advertisement

आणखी वाचा

स्वतःचं पोरगं निवडणुकीत पाडलं, कधीपर्यंत भाजपची री ओढणार? फडणवीस तुम्हाला संपवून टाकतील; मनोज जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल

Maratha Reservation LIVE: मनोज जरांगेच्या मराठा आंदोलनाचा तिसरा दिवस, तब्येत खालावली, तोडगा निघणार?