मुंबई : मुंबई महापालिकेत आता भाजप विरोधी पक्षाच्या भूमिकेत आवाज उठवणार आहे. भाजप शिवसेना युती असताना महापालिका निवडणुकीत भाजपने 83 जागा जिंकल्या होत्या. मात्र, महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर आता ही युती संपुष्टात आल्यानंतर विरोधी पक्ष म्हणून सक्षमपणे भाजप आता कामाला लागणार आहे आणि नागरी समस्यांबाबत आवाज उठवणार आहे. आज मुंबई भाजपची संघटनात्मक बैठक भाजप प्रदेश कार्यलायत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झाली. या बैठकीत विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, अतुल भातखळकर, राम कदम यांच्यासह मुंबईतील आमदार खासदार, पदाधिकारी, महत्वाचे नेते उपस्थित होते. या दरम्यान हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचं आमदार राम कदम यांनी सांगितलं.
त्यामुळे राज्यात ज्याप्रकारे विरोधी पक्षाची भूमिका आक्रमक भूमिका पाहायला मिळते आता तशीच भूमिका मुंबई महापालिकेत पाहायला मिळणार आहे. तसे आदेश पक्षश्रेष्ठींकडून भाजप नगरसेवकांना देण्यात आले आहे. ही मुंबई महापालिकेतील भूमिका सुरुवात असून इतर महापालिकांमध्ये सुद्धा जिथे भाजप सत्तेत नाही तिथे लवकरच भूमिका स्पष्ट केली जाणार आहे. याशिवाय आजच्या बैठकीत आगामी महापालिका निवडणुकीत भाजपचा विजय होणार असा आत्मविश्वास भाजप नेत्यांनी व्यक्त केला आहे. शिवाय, भाजप मुंबई अध्यक्ष याची धुरा इतर कोणाला देणार का? हा प्रश्न विचारला ठेवला असता अद्याप त्याबाबत कोणताही निर्णय झाला नसून याबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील असं आमदार राम कदम म्हणाले.
2022 साली मुंबईचा महापौर भाजपाचाच होणार
2022 साली मुंबईचा महापौर भाजपाचाच होणार असल्याचा दावा देखील राम कदम यांनी केला. आतापर्यंत विरोधी पक्षनेतेपदाचा दावा भाजपने केला नव्हता नव्हता मात्रा आता तो दावा आम्ही करणार आहोत, असेही कदम यांनी सांगितलं. आता आक्रमकपणे विरोधी पक्षाचं काम भाजप करणार आहे. यापुझे महापालिकेतील सर्व भ्रष्टाचार बाहेर काढणार असून त्याविरोधात लढा देणार असल्याचं देखील राम कदम यांनी सांगितलं आहे.
मुंबई महापालिकेत आता भाजप विरोधी पक्षाच्या भूमिकेत आवाज उठवणार
वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
21 Jan 2020 10:26 PM (IST)
मुंबई महापालिकेत शिवसेना आणि भाजपची सत्ता आतापर्यंत होती. मात्र आता महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर भाजप सेनेचा काडीमोड झाला आहे. महाविकास आघाडीने अनेक महापालिकांमध्ये एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपने देखील आता एकट्याने लढण्याची तयारी केली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -