(Source: DV Research)
Mumbai News: मुंबईच्या केईएम रुग्णालयातील 'त्या' दोघांचा मृत्यू, कोरोना झाल्याची चर्चा, हॉस्पिटलकडून महत्त्वाचं स्पष्टीकरण
Mumbai News: मुंबईतील केईएम (KEM) रुग्णालयात दोन कोरोना (Corona Virus) संशयितांचा मृत्यू झाल्याचे समोर आलं होतं. मात्र या दोन मृत्यूच्या घटना कोरोनाने झाल्या नसल्याच आता समोर आले आहे.

Mumbai News: मुंबईतील केईएम (KEM) रुग्णालयात दोन कोरोना (Corona Virus) संशयितांचा मृत्यू झाल्याचे समोर आलं होतं. दरम्यान या बातमीने सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. मात्र या दोन मृत्यूच्या घटना कोरोनाने झाल्या नसल्याच आता समोर आले आहे. स्वत: केईएम प्रशासनाकडून हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. मुंबईच्या केएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र हा मृत्यू कोरोनामुळे झाला नसल्याचं केईएम रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आला आहे. या दोन रुग्णांपैकी एक 14 वर्षीय मुलीला गेल्या काही वर्षांपासून किडनीचा त्रास होता, तर 59 वर्षीय महिलेला कॅन्सर असल्याचे समोर आले आहे.
भारतात गेल्या आठवड्यात 58 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
अशातच केईएम रुग्णालयात उपचारादरम्यान या दोघांचीही कोरोना टेस्ट करण्यात आली होती. शनिवारी या दोन्ही रुग्णांचा मृत्यू झाला. मात्र मृत्यूनंतर कोरोना टेस्टचा अहवाल आला आणि त्यात ते पॉझिटिव्ह असल्याचा समोर आलं. त्यामुळे या मृत्यूनंतर मृत्यू कशामुळे झाला? या संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. तर दुसरीकडे भारतात गेल्या आठवड्यात 58 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 46 रुग्ण तामिळनाडू, केरळ आणि पुदुचेरी या राज्यांमधील आहेत. दरम्यान या प्रकरणी आता स्वत: केईएम रुग्णालय प्रशासनाकडून स्पष्टीकरण देण्यात आल्याने हा दावा खोटा ठरला आहे.
सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये रुग्ण वाढले
संयुक्त राष्ट्रांच्या कोरोनाच्या टास्क फोर्सचे स्ट्रॅटेजिस्ट आणि सार्वजनिक आरोग्य आणि आरोग्य सर्व्हिसेसचे सल्लागार सबाइन कापसी यांनी भारतात कोरोनाची स्थिती स्थिर आहे. सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या देखील कमी आहे. केरळ, तामिळनाडू या सारख्या राज्यात अधिक तपासणी होत असल्यानं तिथं संख्या अधिक असल्याचं ते म्हणाले.
कोरोना डॅशबोर्डच्या आकडेवारीनुसार भारतात गेल्या आठवड्यात 58 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 85 टक्के रुग्ण म्हणजेच 46 रुग्ण तामिळनाडू, केरळ आणि पुदुचेरीमधील आहेत. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये देखील वाढली आहे. सिंगापूरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संंख्या मे महिन्यात पहिल्या आठवड्यात 28 टक्क्यांनी वाढली आहे. तर, रुग्णसंख्या 14200 वर पोहोचली आहे. हाँगकाँमधील कोरोना रुग्णांचा आकडा समोर आला नसला तरी तिथल्या कोरोना चाचण्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या



















