Mumbai Fire Accident : मोठी बातमी! मुंबईत कैसर हिंद बिल्डिंगमध्ये भीषण आग; इमारतीतील ED ऑफिसही आगीच्या भक्ष्यस्थानी
Mumbai Fire Accident News : मुंबईतल्या बॅलेट पिअर परिसरातून भीषण आगीची घटना समोर आली आहे. यात कैसर हिंद बिल्डिंगमध्ये आज(27 एप्रिल) अडीच वाजताच्या सुमारास भीषण आग लागली आहे.

Mumbai Fire Accident News : मुंबईतल्या बॅलेट पिअर परिसरातून भीषण आगीची घटना समोर आली आहे. यात कैसर हिंद बिल्डिंगमध्ये आज(27 एप्रिल) अडीच वाजताच्या सुमारास भीषण आग (Fire Accident News) लागली आहे. दरम्यान याच इमारतीमध्ये एक. ईडी (ED) ऑफिस असल्याची माहिती समोर आली असून या ED ऑफिसपर्यंत ही आग पसरण्याची शक्यता बळावली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि रात्रीपासूनच आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
ऑफिसमध्ये महत्त्वाच्या फाईल्स आणि कागदपत्रं असल्याची माहिती
पुढे आलेल्या माहितीनुसार, सध्या आगीवर नियंत्रण मिळवलं गेलं असलं, तरी इमारतीतून मोठ्या प्रमाणावर धूर (Fire Accident) निघताना दिसतोय. दरम्यान याच इमारतीमध्ये एक ED ऑफिस असल्याची माहिती समोर आली असून या ED ऑफिसमध्ये अनेक राजकीय नेते आणि व्यावसायिक चौकशीसाठी येत असतात. अशातच आगीचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाहीये. मात्र, या इमारतीतल्या ऑफिसमध्ये अनेक महत्त्वाच्या फाईल्स आणि कागदपत्रं असल्याची माहिती आहे. त्यामुळे या आगीत या कागदपत्रांचं काही नुकसान झालं आहे का, याबाबतची स्पष्ट माहिती काही वेळातच मिळण्याची शक्यता आहे.
तुमसर पंचायत समितीच्या इमारतीला ही भीषण आग
दरम्यान, तुमसर पंचायत समितीच्या इमारतीला ही भीषण आग लगाची घटना घडली असून यात रेकॉर्ड रूमला लागलेल्या आगीत संपूर्ण रेकॉर्ड जळून खाक झालंय. भंडाऱ्याच्या तुमसर पंचायत समितीच्या रेकॉर्ड रूमला भीषण आग लागली आहे. या आगीत रेकॉर्ड रूमधील संपूर्ण महत्वाचे दस्तावेज आगीच्या विळख्यात आल्यानं ते पूर्णपणे जळून खाक झाले आहे. या आगीत पंचायत समितीमधील 1965 पासूनचा संपूर्ण रेकॉर्ड जळून खाक झाल्याची भीती वर्तविण्यात येत आहे. सकाळच्या सुमारास फिरायला जाणाऱ्या नागरिकांना पंचायत समितीच्या रेकॉर्ड रूममधून धूर निघत असल्याचं लक्षात आलं. त्याची माहिती पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना आणि तुमसर नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला देण्यात आली.
दरम्यान, आग आटोक्यात आणण्याचा शर्तीचा प्रयत्न सुरू असून आतापर्यंत संपूर्ण रेकॉर्ड या आगीत जळून खाक झाल्याची भीती वर्तविण्यात येत आहे. मात्र आगीचं नेमकं कारण सध्या तरी कळू शकलं नाही.
इतर महत्वाच्या बातम्या
















