Mumbai Dahisar Bank Manager Fraud:मुंबईतील दहिसरमध्ये (Dahisar) बँक मॅनेजरच्या (Bank Manager) कृत्याने खळबळ उडाली आहे.  विश्वास संपादन करुन बँक मनेजर (Crime News) जोडप्याने एका वृद्ध महिलेची आर्थिक फसवणूक केली आहे. तब्बल 76.50 लाखांना गंडा घातला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बँक मॅनेजर जोडप्याने गुंतवणुकीच्या  बहाण्यातून  वृद्धेकडून रक्कम घेतली. परताव्याचे आमिष दाखवले. तसेच वृद्धेकडून मिळालेली रक्कम थेट स्वत:च्या खात्यात वळवून घेतली.  ही बाब उघड होताच बँक मॅनेजर जोडप्याने पलायन केले. तसेच तपासात इतर चार व्यक्तींचीही फसवणूक केल्याचं समोर आलं. ही बाब समोर येताच जोडप्यासह त्यांच्या कुटुंबावरही एमएचबी कॉलनी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. या घटनेनंतर दहिसरमध्ये खळबळ उडाली आहे. 

Continues below advertisement

जय मुकेश मेहता असे दहिसर शाखेतील एका बँक मॅनेजर आरोपीचे नाव आहे. तर, सुनीता मेहता असे त्याच्या पत्नीचे नाव आहे. सीमा शरीफ निजाम असे पीडित महिलेचे नाव असून, 2018 साली जय मेहताने  सीमा निजामशी बँकेसंदर्भातील कामकाजासाठी संपर्क साधला. त्यानं पत्नी सुनीताच्या शेअर मार्केट एक्सपर्ट प्रतिमेचा वापर करुन, सीमा यांना अधिक परताव्याचे प्रलोभन दाखवलं.

गोड बोलून बँक मॅनेजरनं फसवलं (Dahisar Bank Manager Crime News)

प्रलोभन दाखवण्यात आले असले तरी त्यांनी सुरुवातीला थेट नकार दिला होता. दरम्यान, वृद्ध महिलेचा विश्वास संपादन करण्यासाठी बँक मॅनेजरने शक्कल लढवली. त्यानं सीमा यांच्या मुलाला परदेशात 5 लाख रुपये पाठवण्यास मदत केली. तसेच घरातील इतर आर्थिक कामकाजात मदत करण्यास सुरुवात केली. यानंतर त्याने वृद्ध महिलेचा विश्वास जिंकला. त्यानं आपली खेळी खेळण्यास सुरुवात केली. त्यानं मोबाईल आणि बँक खाते लिंक करुन ईमेल आयडी स्वत:च्या नियंत्रणात करुन घेतले. 

Continues below advertisement

यानंतर सेल ऑप्शन गुंतवणुकीच्या नावाखाली वृद्धेकडून 76 लाख 50 हजार रुपये जमा करुन घेतले. यावेळेस त्याने सीमा यांना 19 लाख रुपये परतावा मिळेल, असं प्रलोभन दाखवलं. दरम्यान, ही रक्कम मेहताने आपल्या खात्यात वळवून घेतली. यावेळी परतावा म्हणून तक्रारदार यांना 5 लाख रोख रक्कम देण्यात आली. मात्र, त्यानंतर त्यानं टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. परताव्याचे 14 लाख रुपये सीमा यांना मिळालेच नाही. 

बँक मॅनेजर जोडप्याचा 'असा' झाला पर्दाफाश (Dahisar Crime News)

आपल्याला जय मेहता टाळाटाळ करत असल्याचं लक्षात येताच सीमा यांनी जय मेहताकडे गुंतवलेली रक्कम मागण्यास सुरुवात केली. गुंतवलेली रक्कम मागण्यास सुरुवात केल्यानंतर जयनं तक्रारदार महिलेची बदनामी करण्यास सुरुवात केली. हे प्रकरण सीमाच्या मुलाला समजताच त्याची कानउघडणी केली. तेव्हा त्यानं पोलिसांत तक्रार करू अशी धमकी दिली.   तेव्हा मेहता जोडप्यानं पोलिसांत तक्रार करू नका अशी विनवणी केली. दरम्यान, बँक स्टेटमेंट तपासल्यानंतर पैसे जय मेहताच्या बँक खात्यात जमा झाल्याचं उघड झालं. नोव्हेंबर 2024 साली मेहताचे घर बंद आढळले. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.