Mohan Bhagwat on RSS : छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांना एकत्रित करून एक प्रयोग केला. त्यांच्या या प्रयोगाकडे संपूर्ण भारताचे लक्ष होते. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि सर्वांना पटलं की शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) प्रयोग यशस्वी प्रयोग आहे. त्यानंतर मोगल हे राजस्थानच्या खाली कधीच आपलं राज्य विस्तार करू शकले नाही. मात्र हा प्रयोग अखेरपर्यंत राबवणारं घराणं म्हणजे नागपूरचे भोसले घराणं होय, असे गौरवोद्गार सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी केले.

Continues below advertisement


सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांच्या हस्ते नागपूरकर (Nagpur) भोंसले घराण्यावरील श्रीमंत राजे रघुजी महाराज भोंसले (प्रथम), श्रीमंत राजे जानोजी महाराज भोंसले (प्रथम),श्रीमंत राजे मुधोजी महाराज भोंसले (प्रथम),श्रीमंत राजे मुधोजी महाराज भोंसले (दुसरे) या सर्व भोसले राजांच्या पराक्रमी कारकिर्दीवर आधारित उदय जोशी लिखित चार कादंबऱ्या आदिपर्व, संघर्षपर्व, कलहपर्व आणि ऱ्हासपर्व या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. तसेच डॉ.भालचंद्र हरदास लिखित महालची भ्रमंती आणि श्रीमंत राजे लक्ष्मणराव महाराज भोंसले या दोन पुस्तकाचे ही प्रकाशन यावेळी करण्यात आले. नागपूरच्या सिनिअर भोसला पॅलेस येथे हा पुस्तक प्रकाशन समारोह संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.


Mohan Bhagwat on RSS: ....म्हणून संघ येथे निर्माण झाला आणि अखिल भारतीय झाला


दरम्यान, 1857च्या उठावात सुद्धा शिवाजी महाराजांची प्रेरणा मूळ धरून होती. म्हणून पुढे इंग्रजांनी या प्रेरणा कायम राहू दिल्या नाही. त्या मोडून काढण्याचे प्रयत्न केले. नागपूरचा इतिहास, भोसले यांचा इतिहास, आपला इतिहास असूनही हवा त्याप्रमाणे आपल्याला माहित नाही. ज्यांच्याकडे पाहून प्रेरणा मिळावी, असे आदर्श त्या काळात निर्माण झाले. त्यांनी कीर्ती मिळवली, उत्तम प्रशासन असलेले राज्य उभे केले. आता लोकतंत्र आहे, राजांचा काळ नाही, मात्र त्या राजांचा आजही आदर कायम आहे. तो त्यांच्या पदामुळे नाही. तर त्यांच्या आपलेपणामुळे आहे. म्हणून सर्व इतिहास आपण जाणून घेतला पाहिजे. हिंदूसाठी काम करणारे लोकं अनेक त्या ठिकाणी होते, मात्र सर्वांना सोबत घेऊन संघटन निर्माण करून काम करणारे नागपुरात होते. म्हणून संघ येथे निर्माण झाला आणि अखिल भारतीय झाला. ज्याचा देश चांगला त्यांची प्रतिष्ठा आणि सुरक्षा जगात आहे. असेही सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) म्हणाले.