भारतीय हवाई दलाच्या 88 व्या वर्धापन दिनानिमित्त ते म्हणाले की हवाई दलाच्या भारतीय आकाश सुरक्षित करण्यासोबतच देशभरात मानवतावादी कार्य आणि आपत्तीच्या काळातील केलेल्या कार्याबद्दल देश त्यांच्या नेहमी ऋणात राहील. येत्या काळात भारतीय हवाई दल त्यांची वचनबध्दता आणि कौशल्य यांची गुणवत्ता कायम ठेवतील असा मला विश्वास आहे असे रामनाथ कोविंद यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हंटले आहे.
भारतीय हवाईस दल दिनानिमित्त आम्ही हवाई योध्दे, दिग्गज अधिकारी आणि हवाई दलातील सदस्यांच्या कुटुबीयांचा आम्ही अभिमानपूर्वक सन्मान करतो असेही ते त्यांच्या ट्विटमध्ये म्हणाले.
भारतीय हवाई दलाचा आज 88वा स्थापना दिवस आहे. गेल्या काही महिन्यांपासून लडाखच्या सीमेवर भारताचा चीनसोबत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवाई दलाच्या गाझियाबादमधील हिंडन एअरबेसवर वायुसेनेच्या कसरतींकडे सगळ्या जगाचे लक्ष होते. आजच्या स्थापना दिवसाच्या कार्यक्रमात यंदा एकूण 56 विमानांनी आपला सहभाग नोंदवला. यामध्ये राफेल, सुखोई, मिग-29, मिराज, जॅग्वार, तेजस विमानांसोबत चिनूक, अपाचे हेलिकॉप्ट यांनी फ्लाय पास्टमध्ये भाग घेऊन जगाला आपली ताकद दाखवली. स्वदेशी रडार सिस्टमचा देखील यात समावेश होता. भारतीय हवाई दलात नव्याने दाखल झालेले राफेल लढाऊ विमान हे यंदाच्या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते.
रामनाथ कोविंद यांच्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रंदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हवाई दलानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
भारतीय वायुदल आपल्या नेक्स्ट जनरेशन स्टेल्ट फिचर असलेल्या अॅडवान्स कॉंबॅट एअरक्राफ्टची संख्या वाढवायचा विचार करता आहे. याबाबत भारतीय हवाई दल हे काही हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लि., एअरोनॉटिक्स डेवलपमेंट एजन्सी आणि DRDO यांच्यासह काही परदेशातील कंपन्यांच्या मदतीने काम करणार आहे.
भारतीय हवाई दल हे जगातील प्रबळ हवाई दलांपैकी एक समजले जाते. राफेलचा समावेश झाल्याने हवाई दलाची ताकद अधिकच वाढली आहे.
भारतीय हवाई दलाची स्थापना 1932 साली ब्रिटीश-भारतात झाली होती. दुसऱ्या जागतिक महायुध्दाच्या काळात हवाई दलाने केलेल्या पराक्रमाने भारावून इंग्लंडचा राजा जॉर्ज पाचवा याने त्यांना रॉयल ही उपमा दिली होती. स्वातंत्र्यानंतर 1950 साली भारतीय हवाई दलाने ही उपमा वापरायची बंद केली.
संबंधीत बातम्या: