MNS Sandeep Deshpande Video: संदीप देशपांडे यांनी पुन्हा एकदा मुंबईतील पीडब्ल्यूडी विभागातील भ्रष्टाचाराचा मुद्दा समोर आणला आहे. कालच (9 डिसेंबर) त्यांनी ‘कॅश बॉम्ब’ मालिकेचा भाग म्हणून कुर्ला विभागातील एका पीडब्ल्यूडी अधिकाऱ्याचा पैसे घेतानाचा व्हिडिओ सार्वजनिक केला होता. या व्हिडिओने विभागातील गैरकारभार आणि लाचखोरीबाबत गंभीर प्रश्न निर्माण केले होते. अशातच आज (10 डिसेंबर) त्यांनी आणखी एक प्रकरण उघड करत दुसऱ्या पीडब्ल्यूडी अधिकाऱ्याचा व्हिडिओ समोर आणला आहे. सलग दुसऱ्यादिवशी पुढे आलेल्या या नव्या व्हिडिओमध्येही लाच घेण्यासंदर्भात संशय निर्माण करणारा संवाद आणि दृश्ये दिसत असल्याचा आरोप संदीप देशपांडे यांनी केला आहे.

Continues below advertisement

सतत दोन दिवसांपासून समोर येत असलेल्या या ‘कॅश बॉम्ब’ व्हिडिओंमुळे पीडब्ल्यूडी विभागात मोठी खळबळ माजली असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी जोर धरत आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी विभागातील भ्रष्टाचारावर कार्यवाही करण्यासाठी सरकार आणि तपास यंत्रणांना आव्हान दिले आहे.

Sandeep Deshpande : खुलेआम भ्रष्टाचार, म्हतारी मेल्याचे दुःख नाही मात्र काळ सोखवतोय

Continues below advertisement

या संदर्भात बोलताना संदीप देशपांडे म्हणाले कि, या व्हिडीओमधील संभाषण आपण ऐकलं तर त्यात अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे आहे. त्यात अधिकारी सांगताय कि मला वरच्या अधिकाऱ्यांना 25 टक्के पेमेंट काढण्यासाठी द्यावे लागतात. पुढे ते असं हि सांगताय कि तुम्हाला मी पाच कामं देतो. अधिकाऱ्यांना कुठला आला अधिकार? खुलेआम भ्रष्टाचार यात सुरु आहे. म्हतारी मेल्याचे दुःख नाही मात्र काळ सोखवतोय. हे प्रकरण फक्त पीडब्लुडी (PWD) विभागापुरतं नाही तर मोठा भ्रष्टाचार आणि गैरप्रकार यात होत असल्याचे संदीप देशपांडे म्हणाले.

दरम्यान, मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून (Shiv Sena UBT) कॅश बॉम्बचा धमाका सुरु आहे. एकीकडे शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी शिंदेंचे आमदार महेंद्र दळवींचा (Mahendra Dalvi) कॅशसह एक व्हिडीओ समोर आणला होता. तर, मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी देखील काल (मंगळवारी) पीडब्लुडीच्या (PWD) अधिकाऱ्यांचा लाच घेतानाचा व्हिडीओ समोर आणला. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. त्यांनतर आज पुन्हा  संदीप देशपांडेंकडून नवा व्हिडीओ समोर आणत प्रशासनचा गैरकारभार आणि लाचखोरीबाबत गंभीर प्रश्न निर्माण केले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या