Shivendrasinh Bhonsle on Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. सातारा गॅझेटियर (Satara Gazette) बाबत लवकरच बैठक होणार असून यातून पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाला (Maratha Reservation) दिलासा मिळेल, असा दावा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या समितीचे सदस्य शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले. सातारा गॅझेटियरमध्ये नोंदी आडनावासह क्लियर असल्याने हैदराबादपेक्षा (Hyderabad Gazette) लवकर या भागातील मराठा समाजाला न्याय देता येऊ शकणार असल्याचेही शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले.
आरक्षणमध्ये काम करताना अतिशय काळजीपूर्वक अभ्यास करून हे काम करावे लागते. ज्यामुळे उद्या कोर्टात जरी चॅलेंज झालं तरी हे आरक्षण टिकले पाहिजे, हा मुख्यमंत्र्यांचा आदेश असल्याने हैदराबाद गॅझेटियर लागू करतानाही हीच काळजी घेतली होती. ज्यामुळे तीन वेळेला न्यायालयात चॅलेंज होऊनही हे टिकू शकले आहे. तशाच पद्धतीने सातारा गॅझेटियर बाबत काम सुरू असून लवकरच या संदर्भातली बैठक होईल आणि पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाला न्याय देता येईल. असे त्यांनी सांगितले. राज्यात आलेले अतिवृष्टी आणि महापुराच्या संकटामुळे या बैठकीला थोडा उशीर झाला असला तरी सर्व कायदेशीर बाबी तपासून लवकरच हाही निर्णय होईल, असा दिलासा शिवेंद्रराजे यांनी दिला आहे.
What Is Satara Gazette : सातारा गॅझेटियर म्हणजे काय?
सातारा गॅझेटियर हा एक जुना सरकारी दाखला / किंवा दस्तऐवज आहे. ब्रिटिश काळात (1820-1830 च्या सुमारास) सातारा प्रांतात जमिनी, शेती, कुळी, जाती, पिकं, महसूल या सगळ्याची नोंद करून जी कागदपत्रं तयार झाली, त्याला सातारा गॅझेटियर म्हटलं जातं. यात गावनिहाय वंशावळी, कुळाच्या नोंदी, जात नोंदी यांचा समावेश आहे.
Kunbi Certificate Satara Gazette : आरक्षणाच्या लढाईत मुख्य पुरावा
ब्रिटिश सरकारला महसूल आणि कर आकारणीसाठी जमीन, लोकसंख्येची नोंद तयार करायची होती. म्हणूनच सातारा गॅझेटियर तयार करण्यात आलं. याचा मूळ उद्देश हा फक्त प्रशासन आणि महसूलासाठी होता. पण सध्याच्या स्थितीत या गॅझेटियरमधील जुन्या सरकारी नोंदी या आरक्षणासाठी मुख्य पुरावा म्हणून महत्त्वाची ठरतात.
सातारा जिल्ह्याच्या सरकारी संकेतस्थळावर या 'कुणबी- मराठा दस्त नोंदी' तालुकावार उपलब्ध आहेत. कराड, वाई, माण, फलटण, खटाव, पाटण, कोरेगाव यासह अनेक तालुक्यांतील गावांमध्ये अशी नोंद मिळते.
थोडक्यात, सातारा गॅझेटियर हा केवळ महसूल नोंदीसाठी तयार केलेला जुना दस्तऐवज असला तरी, त्यातल्या 'मराठा-कुणबी' नोंदींमुळे आज तो मराठा आरक्षण लढाईतील एक महत्त्वाचा पुरावा ठरला आहे.
ही बातमी वाचा: