Manoj Jarange Patil On BMC: मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. मराठा आरक्षणासाठी सरकारशी लढा सुरू आहे. मात्र आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी आंदोलकांचे कमालीचे हाल झाले. तसेच मनोज जरांगेंसह राज्यभरातून हजारो आंदोलक गाड्या घेऊन मुंबईत दाखल झाल्याने कालपासून दक्षिण मुंबईत प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. दरम्यान, मनोज जरांगे यांचं आझाद मैदानात आंदोलन सुरु आहे. मात्र याच आझाद मैदानात लाईट्स उपलब्ध नाहीय. यावरुन मनोज जरांगे यांनी काल (29 ऑगस्ट) सायंकाळी मुंबई महानगरपालिकेवर हल्लाबोल केला. 

Continues below advertisement

आझाद मैदानात महानगरपालिकेच्या लाईट्स नाहीय. काय भिकारचाळे आहेत तुमचे...50-60 वर्षे तुम्ही सत्ता भोगल्या. भिकार आहेत तुम्ही, स्वत:चे घरं भरुन घेतली. आझाद मैदानात साध्या लाईट्स नाहीय. पोरांनो...लगेच 10-12 फोकस विकत आणा...या महानगरपालिकेला आपण फुकटात देऊन जाऊ...हे भिकार आहेत..., असं मनोज जरांगे म्हणाले. सरकारने पार्किंगची जागा घोषित केली पाहिजे. पोलीस आणि सरकारने पार्किंगचा मॅप टाकावा. तुम्ही जसा विलंब कराल तसं मराठे मुंबईत वाढतील, असा इशारा मनोज जरांगेंनी दिला. तसेच आझाद मैदानाच्या आजूबाजूची मैदाने पार्किंगसाठी मोकळी करा, मराठे शांततेत आंदोलन करतील हा सरकारला शब्द आहे असं मनोज जरांगे म्हणाले. 

लाखो आंदोलक आझाद मैदानावर उपोषणासाठी दाखल-

मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये म्हणून मुंबई पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. मराठा आंदोलनात सुरक्षेसाठी चार सुरक्षा पथक तैनात, मुंबई पोलीस, सीआयएसएफचे जवान, धडक कृती दलाचे पोलीस आणि सीआरपीएफचे जवान सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेयत.  आझाद मैदानात आंदोलनासाठी 5 हजार लोकांना परवानगी देण्यात आली होती, परंतु लाखो आंदोलक आझाद मैदानावर उपोषणासाठी दाखल झाले आहेत. त्यामुळे पोलिसांनीही योग्य ती सुरक्षा व्यवस्था तैनात केलीय. मराठा आंदोलकांसोबत पोलीस अधिकाऱ्यांनी समजूतही घालण्याचा प्रयत्न केला. 

Continues below advertisement

मनोज जरांगे पाटील यांच्या नेमक्या मागण्या कोणत्या? (What are the exact demands of Manoj Jarange Patil?)

1. मराठा कुणबी एक आहेत. याची अंमलबजावणी झाली पाहिजे, 

2. हैदराबाद गॅझेटियर लागू करा...सातारा, बाँबे गॅझेटियर लागू करावे.

3. ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे घ्या...सगे सोयरे पोट जात म्हणून घ्या.

4. मराठा आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे घ्या.

5. आमचं कायद्यात बसणारे आरक्षण द्या.

मनोज जरांगेंचा महानगरपालिकेवर हल्लाबोल, VIDEO:

संबंधित बातमी:

Manoj Jarange Patil Maratha Mumbai Morcha: मराठा समाजासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; मनोज जरांगेंचं मुंबईत आंदोलन सुरु असताना वेधलं लक्ष

Manoj Jarange Patil Maratha Mumbai Morcha: मराठा आंदोलकांचे प्रचंड हाल, गर्दीमुळे मोठी वाहतूक कोंडी; सरकारने CRPF अन् CISF ची तुकडी मैदानात उतरवली!