Manoj Jarange Patil Maratha Reservation : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आणि सगेसोयऱ्यांचा निकष लावून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईच्या आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. गेल्या दोन दिवसांपासून पोटात अन्नाचा आणि पाण्याचा थेंबही न गेल्याने आता मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची प्रकृती खालावण्यास सुरुवात झाली आहे. अशातच आता मनोज जरांगेच्या सुरक्षेच्या संदर्भात एका महत्वपूर्ण बातमी समोर आली आहे.
स्टेजजवळ पोहोचला अन् व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्याचा प्रयत्न
आझाद मैदानावर रात्री 2 वाजताच्या सुमारास एक संशयित व्यक्ती मनोज जरांगे पाटलांच्या स्टेजजवळ पोहोचला आणि त्याने व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्याचा प्रयत्न केलाय. हा प्रकार लक्ष्यात येताच मनोज जरांगे पाटील संतापले आणि त्यांनी हा व्यक्ती कोण? त्याची विचारपूस करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्यात. दरम्यान संबंधित व्यक्ती नशेत असल्याची माहिती पुढे आली असून त्याची सध्या चौकशी सुरु आहे. मात्र हा प्रकार घडत असताना घटनेकवेळी पोलीस हजार नसल्याने मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय.
घटनेनंतर ही पोलीस मंडपात फिरकले नाहीत
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे 2 वाजता एक संशयित व्यक्ती मनोज जरांगे पाटील यांचा व्हिडीओ काढत होता. यावरून जरांगे पाटील त्यावर वैतागले आणि हा माणूस कोण आहे? याचा तपास घ्या, असे आपल्या कार्यकर्त्यांना आदेश दिले. त्यावेळी तो व्यक्ती नशेत होता, असे समजले आणि मी ही कार्यकर्ता आहे, असे त्याने सांगितले. परंतु असे कार्यकर्ते आमचे नाहीत, असे ठणकावून जरांगे यांनी सांगितले. तर पोलीस कुठे आहेत? असा सवाल जरांगे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना विचारला असता त्यावेळी एकही पोलीस मंडपात दिसला नाही आणि या घटनेनंतर ही पोलीस मंडपात फिरकले नाहीत. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय.
मराठा आंदोलक शनिवारी दिवसभर दक्षिण मुंबईतील विविध भागात जाताना दिसत होते म्हणून पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मंत्रालय ते एयर इंडिया सिग्नल पर्यत पूर्णपणे बॅरिकेट लावले आहे. आंदोलक मंत्र्यांच्या बंगल्यावर जाऊ शकतात म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पोलीसांकडून देण्यात आली आहे.
आणखी वाचा
Maratha Reservation LIVE: मनोज जरांगेच्या मराठा आंदोलनाचा तिसरा दिवस, तब्येत खालावली, तोडगा निघणार?