Beed OBC Morcha: बीडमध्ये महाएल्गार सभेचे (OBC Mahaelgar Sabha) आयोजन करण्यात आले आहे. हा ओबीसीचा मोर्चा नसून विशिष्ट जातीचा मोर्चा आहे. ओबीसींच्या (OBC) हिताशी यांना काही देणं घेणं नाही. ओबीसींना बरबाद करणारे हे लोकं आहेत. ओबीसींच याच लोकांनी कधी कल्याण होऊ दिलं नाही. ओबीसींच 32 टक्के आरक्षण हे यांनीच वेगळं केलं. त्यामुळे ओबीसींना बरबाद करणारे हे लोक आहेत. मोर्चा काढणारे हेच ओबीसींचे खरे शत्रू असल्याची घणाघाती टीका मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केली आहे. ते जालना येथे बोलत होते.
Manoj Jarange Patil : आंदोलनाच्या व्यासपीठावर कोण कोण आहेत हे मराठे बघतील
घुरट अलिबाबा तुझा इतिहास तिकडं कुणाला जाऊन सांग. आता जीव गेला तर हरकत नाही पण याला मत द्द्यायच नाही. आज आंदोलनाच्या व्यासपीठावर कोण कोण आहेत हे मराठे बघतील असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले. कुणाचं टप्पर नाही जीआर रद्द करण्याचा. राजकीय स्वार्थासाठी यांचे मोर्चे आहेत. काय आणि कोणाची ताकद आहे जीआर रद्द करायची हे बघू असेही ते म्हणाले. बीडमध्ये आज ओबीसी समाजाच्या न्याय आणि हक्काच्या मागणीसाठी महाएल्गार सभेचे आयोजन करण्यात आलय.
दरम्यान हि महाएल्गार सभा मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आली असून त्यांच्यासोबत ओबीसींच्या व्यासपीठावर पहिल्यांदाच धनंजय मुंडे संबोधित करणार आहेत. त्यामुळे छगन भुजबळांच्या सोबत धनंजय मुंडे देखील या व्यासपीठावर दिसणार आहेत. सोबतच या महाएल्गार सभेमध्ये आमदार गोपीचंद पडळकर, ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि प्रकाश शेंडगे देखील उपस्थित असणार आहे.
Chhagan Bhujbal: मंत्री छगन भुजबळ यांना मराठा समाजाचा विरोध कायम
दुसरीकडे, मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांचा मंत्री छगन भुजबळ यांना विरोध कायम आहे. भुजबळ यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊनच बीडमध्ये यावं, असे मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांचं म्हणणे आहे. आज बीडमध्ये ओबीसी महाएल्गार सभा होत आहे आणि याच सभेला मार्गदर्शन करण्यासाठी मंत्री छगन भुजबळ उपस्थित राहणार आहेत. मात्र मराठा समाजाचा छगन भुजबळ यांना विरोध कायम आहे. मराठा समाजाकडून आयोजित केलेल्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे.
ही कारवाई एक तर्फी असून छगन भुजबळ यांच्या दबावात येऊन पोलिसांनी नोटीस बजावली. आमचा सभेला विरोध नाही, तर भुजबळ यांना विरोध आहे. मंत्री पदाचा राजीनामा देऊन यांनी बीडमध्ये यावं असं आमचं म्हणणे आहे. ओबीसीच्या मेळाव्याला आमचा विरोध नाही. मात्र भुजबळ येत असल्याने येथे वाद वाढत आहेत. असेही गंगाधर काळकुटे म्हणाले. छगन भुजबळ यांनी मंत्री पदाची शपथ घेतली, मात्र ते त्याचा भंग करत आहेत. त्यांनी राजीनामा देऊन यावं, अशी ठाम भूमिका मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी घेतली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या