एक्स्प्लोर

Manoj Jarange Patil Azad Maidan Morcha: मराठा आरक्षणाबाबत नवा जीआर काढण्याच्या तयारीत; राज्य सरकारकडून नेमकं काय केलं जाणार?

Manoj Jarange Patil Azad Maidan Morcha: मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या जरांगेंच्या मागणीमुळे पेच निर्माण झालाय. कुणबी प्रमाणपत्राच्या सुलभतेसाठीही हालचाली सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

Manoj Jarange Patil Azad Maidan Morcha: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचं दक्षिण मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरु आहे. आज (2 सप्टेंबर) मनोज जरांगेंच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे लाखो मराठा आंदोलकांसह मुंबईत दाखल झाले होते. मनोज जरांगे यांनी कालपासून पाणी पिणंही बंद केल्याने त्यांची प्रकृती खालावल्याचे दिसून येतंय. तर दुसरीकडे राज्य सरकारच्या देखील हालचाली वाढल्या आहेत.

मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) सरकार लवकरच नवा जीआर काढण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय. कुणबी प्रमाणपत्राच्या सुलभतेसाठीही हालचाली सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. महाधिवक्त्यांच्या मान्यतेनंतर जरांगेंना मसुदा दाखवून याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल अशी माहिती समोर येत आहे. मराठा आंदोलनावर तोडगा काढण्याचा सर्वात मोठा पेच सध्या राज्य सरकारसमोर आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या जरांगेंच्या मागणीमुळे पेच निर्माण झालाय. यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, महाधिवक्ता विरेंद्र सराफ यांच्यात बैठक पार पडली.

राज्य सरकारकडून नेमकं काय केलं जाणार?

1. मराठा आरक्षणासाठी नवीन जीआर: राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी नवीन शासन निर्णय (जीआर) काढण्याच्या तयारीत? 

2. कुणबी प्रमाणपत्रासाठी सुलभता: कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी गावातील नातेवाईक किंवा कुणबी प्रमाणपत्रधारक यांच्या ॲफिडेव्हिटवर आरक्षण लागू करण्यासंदर्भात विचार

3. गाव पातळीवर स्क्रुटिनी कमिटी: कुणबी नोंदी पडताळणीसाठी तालुका आणि ग्रामपंचायत स्तरावर नवीन स्क्रुटिनी कमिटी स्थापन करून गाव पातळीवर नोंदी शोधण्याचा निर्णय

4. ⁠महाधिवक्त्यांच्या मान्यतेनंतर जरांगे पाटील यांना मसुदा दाखवून अंतिम निर्णय घेतला जाईल.

हायकोर्टाने कोणते निर्देश दिले?

आज मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा पाचवा दिवस आहे. मात्र मराठा आंदोलन हाताबाहेर गेलंय. त्यामुळे मुंबई आज (2 सप्टेंबर) दुपारपर्यंत रिकामी करा असे महत्वपूर्ण आदेश हायकोर्टानं राज्य सरकारला दिलेत. ऐन गणेशोत्सवात मराठा आंदोलनामुळे मुंबईला छावणीचं स्वरुप आलंय. त्यामुळे आंदोलकांना दक्षिण मुंबईत सोडू नका असे निर्देश कोर्टानं दिलेत. तसंच आझाद मैदान सोडून सीएसएमटी,मरीन ड्राईव्ह, हुतात्मा चौक आणि दक्षिण मुंबईतील इतर भागातून आंदोलकांना बाहेर काढण्याचे निर्देश कोर्टानं दिलेत. आझाद मैदानात जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू आहे. मात्र न्यायालयाने आता प्रशासनाला अनेक निर्देश दिले आहेत. आंदोलनाबाबत हायकोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तीवाद करण्यात आला. आंदोलकांनी सर्व नियम पायदळी तुडवल्याचं स्पष्टीकरण राज्य सरकारच्या वतीनं महाधिवक्त्यांनी कोर्टात दिलं. तर त्याचवेळी सरकारनं योग्य अंमलबजावणी न केल्यानं आंदोलकांचे प्रचंड हाल झालेत, असा युक्तिवाद जरांगेंच्या वकिलांनी केलाय. दरम्यान आज दुपारी 1 वाजता पुन्हा सुनावणी होणार असून कोर्टानं राज्य सरकारला दिलेल्या आदेशांचं पालन होतंय की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

संबंधित बातमी:

Manoj Jarange Patil Azad Maidan Morcha: आझाद मैदानात भलामोठा मंडप, गाड्या पोलिसांनी काढल्या; कोर्टाच्या निर्देशानंतर काय काय घडलं?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime News: 'ये इलाका हमारा है...'; अंधेरीत दहशत माजवणाऱ्या 'बडा कन्ना' अन् 'सत्या' टोळीवर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक; मकोकाअंतर्गत मोठी कारवाई
'ये इलाका हमारा है...'; अंधेरीत दहशत माजवणाऱ्या 'बडा कन्ना' अन् 'सत्या' टोळीवर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक; मकोकाअंतर्गत मोठी कारवाई
Vidarbha Rain Deficit Issue: पावसाची हुलकावणी; बळीराजाच्या डोळ्यात पाणी; विदर्भात तब्बल 58 टक्के पावसाची तूट; संत्र्यासह धान पिकांना मोठा फटका
पावसाची हुलकावणी; बळीराजाच्या डोळ्यात पाणी; विदर्भात तब्बल 58 टक्के पावसाची तूट; संत्र्यासह धान पिकांना मोठा फटका
Maharashtra Live News Updates: मुंबई पुणे दरम्यान सुपरफास्ट बुलेट ट्रेन सुरू करणार; रेल्वे मंत्राची माहिती
Maharashtra Live News Updates: मुंबई पुणे दरम्यान सुपरफास्ट बुलेट ट्रेन सुरू करणार; रेल्वे मंत्राची माहिती
Janmashtami 2026: जन्माष्टमी निमित्त श्रीकृष्णाला सजवताय? 'या' रंगाचे वस्त्र चुकूनही घालू नये! 'हे' रंग सुख-समृद्धीसाठी सर्वात फलदायी, ज्योतिष - वास्तुशास्त्रात म्हटलंय...
जन्माष्टमी निमित्त श्रीकृष्णाला सजवताय? 'या' रंगाचे वस्त्र चुकूनही घालू नये! 'हे' रंग सुख-समृद्धीसाठी सर्वात फलदायी, ज्योतिष - वास्तुशास्त्रात म्हटलंय...

व्हिडीओ

Majha Infra Vision Siddhesh Kadam Manisha Khatri : 'डीजे' ते कुंभमेळा, शाश्वत विकासाचा रोड मॅप
Devendra Fadnavis Majha Infra Vision : CM फडणवीसांनी माझा इन्फ्रा व्हिजनमध्ये मांडला विकासाचा रोडमॅप
Majha Infra Vision Eknath Shinde : समृद्धी, कोस्टल, जरांगे ते DJ; एकनाथ शिंदेंचं माझा इन्फ्रा व्हिजन
Majha Infra Vision Mahendra Kalyankar: धारावीमधील झोपडपट्टी धारकांना 350 चौरस फूट घरे मोफत; महेंद्र कल्याणकर काय म्हणाले?
Majha Infra Vision Nitesh Rane: जिहादमुक्त किनारपट्टी, वाढवण बंदर, दिशा सालियान; नितेश राणे UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil Protest: मनोज जरांगेंकडून 11 सप्टेंबरची डेडलाईन, अंतरवालीत हायहोल्टेज ड्रामा; विखे-पाटील, सामंत, लाड यांच्यासमोर रात्री काय काय घडलं?
मनोज जरांगेंकडून 11 सप्टेंबरची डेडलाईन, अंतरवालीत हायहोल्टेज ड्रामा; विखे-पाटील, सामंत, लाड यांच्यासमोर रात्री काय काय घडलं?
 Chhatrapati Sambhajinagar Fire News : मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरच्या एशियन हॉस्पिटलमध्ये भीषण आग; 9 चिमुकल्यांसह 58 रुग्ण थोडक्यात बचावले
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरच्या एशियन हॉस्पिटलमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या जवानांचे शर्थीचे प्रयत्न, 9 चिमुकल्यांसह 58 रुग्ण थोडक्यात बचावले
Vidyanand Bapat : विद्यानंद बरा आहेस ना, तुझी तब्येत कशी आहे, जास्त लागलं नाही ना? रत्नागिरीतून आई वडिलांचा विद्यानंद बापट यांना भावनिक फोन
विद्यानंद बरा आहेस ना, तुझी तब्येत कशी आहे, जास्त लागलं नाही ना? आई वडिलांचा भावनिक फोन
Goa : गोव्यात लाभार्थ्यांना एका वर्षात तीन एलपीजी सिलेंडर मोफत मिळणार, बँक खात्यात दरवर्षी 3000 रुपये जमा होणार, भाजप सरकारची मोठी घोषणा 
गोव्यात लाभार्थ्यांना एका वर्षात तीन एलपीजी सिलेंडर मोफत मिळणार, बँक खात्यात दरवर्षी 3000 रुपये जमा होणार
Smriti Mandhana: स्मृती मंधानाचा डबल धमाका! आंतरराष्ट्रीय धावांचा विक्रम मोडित काढला, शतकांमध्येही विश्वविक्रम
स्मृती मंधानाचा डबल धमाका! आंतरराष्ट्रीय धावांचा विक्रम मोडित काढला, शतकांमध्येही विश्वविक्रम
Rohit Sharma : रोहित शर्माच्या रिटायरमेंटच्या दिवसभर चर्चा, अखेर बीसीसीआयचे सचिव मैदानात, हिटमॅनच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज
रोहित शर्माच्या रिटायरमेंटवरुन तर्क वितर्क, अखेर BCCI चे सचिव समोर आले अन् सगळं स्पष्ट केलं
सातारा, कोल्हापूरचा जीआर काढा, प्रमाणपत्र काढताना वंशावळ ग्राह्य धरली जात नाही, मंत्रालयामध्ये कधी मराठा-कुणबी स्वतंत्र कक्षाची स्थापना करणार? जरांगे पाटलांची सरकारच्या शिष्टमंडळासमोर प्रश्नांची सरबत्ती
सातारा, कोल्हापूरचा जीआर काढा, प्रमाणपत्र काढताना वंशावळ ग्राह्य धरली जात नाही, मंत्रालयामध्ये कधी मराठा-कुणबी स्वतंत्र कक्षाची स्थापना करणार? जरांगे पाटलांची सरकारच्या शिष्टमंडळासमोर प्रश्नांची सरबत्ती
BCCI : अखेर युवा खेळाडूचा फसवाफसवीचा खेळ संपला, बीसीसीआयनं थेट दोन वर्षाची बंदी घातली  
युवा खेळाडूचा फसवाफसवीचा खेळ संपला, बीसीसीआयनं थेट दोन वर्षाची बंदी घातली
Embed widget