ZP and Panchayat Samiti Elections Voting 2026 LIVE : जिल्हा परिषद, पंचायत समितीचा धुरळा! 125 पंचायत समित्यांच्या कारभाऱ्यांसाठी आज मतदान; वाचा सर्व अपडेट्स
Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?
LIVE

Background
ZP and Panchayat Samiti Elections Voting 2026 LIVE: राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी आज मतदान होत असून यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्हा परिषदेच्या 731 तर पंचायत समित्यांच्या 1,462 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. एकूण 7,438 उमेदवार रिंगणात असून 2 कोटी 8 लाख 20 हजार 702 मतदान मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे असे आवाहन राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केले आहे.
Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी किती टक्के झालं मतदान
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 53.43 टक्के मतदान झाले.
Solapur News: बार्शीतील पानगावमध्ये नवरदेवाने लग्नाआधी बजावला मतदानाचा अधिकार
बार्शीतील पानगावमध्ये नवरदेवाने लग्नाआधी बजावला मतदानाचा अधिकार
घोड्यावरील वरात थेट मतदान केंद्रात नेत बजावला मतदानाचा अधिकार
पानगाव येथील आनंद जयराम मोरे यांच्या कृतीमुळे मतदाराची सर्वत्र चर्चा रंगलीय
जयराम मोरे हे प्रशिक्षणार्थी बीडीओ म्हणून कार्यरत आहेत मात्र विवाहासाठी ते गावी आले होते.
मतदानाबाबत जागृती व्हावी म्हणून त्यांनी बोहल्यावर चढण्यापूर्वी मतदानाचा हक्क बाजवला.
























