Beed : ऐन दिवाळीत बीड (Beed) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाणे हद्दीत एका युवकाच्या छातीत गोळी लागून त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या तरुणावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला की त्याने स्वतःवर गोळी झाडून घेतली याबाबत संदिग्धता कायम आहे. मयूर उर्फ बाळा रामदास चव्हाण असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे.
अंभोरा हिवरा रस्त्यावरील कच्च्या रस्त्यालगत येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना मयूरचा मृतदेह दिसून आला. नागरिकांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी याचा अधिक तपास केला असता मयूरच्या छातीत गोळी लागण्याची जखम आणि मृतदेहाजवळ पडलेले पिस्टल आढळून आले. मयूर चव्हाण हा मिस्त्री काम करत होता. त्यामुळे त्याच्याजवळ विनापरवाना पिस्तूल आले कुठून? त्याची हत्या की आत्महत्या याबाबतचे गूढ कायम आहे. घटनेचा अधिक तपास अंभोरा पोलीस करत आहेत. मात्र ऐन सणासुदीत घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
महत्वाच्या बातम्या: