पालघर : लॉकडाऊनमुळे शेकडो किलोमीटरचा प्रवास करत परराज्यातील कामगार आपल्या गावी जात असल्याचं दिसून आलं आहे. अशीच एक घटना पालघर जिल्ह्यात वाडा तालुक्यातील कुडूस या गावात निदर्शनास आली. चक्क टायर नसलेल्या सायकलवरून एक युवक मनोरच्या दिशेने निघालेल्या काही ग्रामस्थांना दिसला. विचारपूस केली असता तो दिल्ली येथील आपल्या गावी जात असल्याचे त्याने सांगितले. मुंबईसह उपनगरातील भागात हजोरांच्या संख्येने परप्रांतीय अडकले आहेत. 14 एप्रिलनंतर लॉकडाऊन संपेल या आशेवर ते दिवस काढत होते. मात्र, लॉकडाऊन वाढल्याने येथील कामगारांचा संयम तुटत चालला आहे. परिणामी घरी जाण्यासाठी आता ते वेगवगेळे मार्ग अवलंबवताना दिसत आहेत.


नवी मुंबई कोपर खैरणे येथून सोमवारी सकाळी सात वाजता सायकलवरून तो युवक दिल्लीला जाण्यासाठी रवाना झाला होता. सकाळी अकराच्या सुमारास तो कुडूस येथून जात असताना त्याला थांबवून विचारपूस केली असता त्याने सर्व प्रकार सांगितला. नवी मुंबई येथील कपिल हेयर सलून येथे काम करणारा तो युवक सकाळी सात वाजता अडगळीस पडलेली मित्राची सायकल घेऊन निघाला होता. दरम्यानच्या 80 किलोमीटरच्या प्रवासातच त्याच्या सायकलचे पुढचे टायर फुटले व प्रवासादरम्यान ते जीर्ण होऊन निघून पडले. कोपर खैरणे ते दिल्ली हा 1500 किलोमीटरचा प्रवास सायकलवरून करण्यासाठी निघालेल्या त्या युवकाला कुडूस येथील कइस पटेल, रुकसाद शेख व स्वप्नील जाधव या युवकांनी थांबवले. उपाशीपोटीच निघालेल्या त्या युवकाला खाण्यापिण्यासाठी दिले. गावातीलच एका सायकल दुकानदाराकडून स्वखर्चाने ट्यूब व टायर बसवून दिले.


Coronavirus | राज्यात आज 170 नवे कोरोना बाधित; रुग्णांची संख्या वाढून 2801 वर


प्रप्रांतिय कामगारांचा संयम सुटतोय
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने 21 दिवसांचा लॉकडाऊन संपूर्ण देशात जाहीर झाला. अचाकन लॉकडाऊन जाहीर झाल्याने हजारो कामगार वेगवेगळ्या राज्यात अडकून पडले आहेत. या कामगारांची सोय आम्ही करू असं प्रत्येक राज्य सरकार सांगत आहे. मात्र, लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर दोनतीन दिवसात दिल्ली, राजस्थान, गुजराज, महाराष्ट्र, तेलंगाणा या राज्यांच्या सीमाभागात हजारो कामगार घरी जाण्यासाठी जमा झालेले दिसले. प्रशासनाने यावर कसेतरी नियंत्रण मिळवण्यात यश आले. हळूहळू दिवस जात होते. 14 दिवसांनंतर लॉकडाऊन संपेल आणि आपण घरी जाऊ या एकाच आशेवर अनेक कामगार धीर धरुन होते. परंतु, लॉकडाऊन पुन्हा तीन मे पर्यंत वाढवल्यामुळे या कामगारांचा संयम सुटत चालला असल्याचे बोलले जात आहे.


Curfew In Malegaon | मालेगावमध्ये संचारबंदी लागू, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाचा निर्णय